STORYMIRROR

Ramesh Dongare

Tragedy Action

4  

Ramesh Dongare

Tragedy Action

गुरूदक्षिणा

गुरूदक्षिणा

9 mins
221

सकाळी अकराची वेळ . सांगली कोर्टाचा हाँल माणसानी खचाखच भरला होता.मी बरोबर अकरा वाजताच कोर्टात हजर होतो.वास्तविक मी अशीलाचा वकील असल्याने निकालाचे दिवशी कोर्टात सहसा हजर रहात नाही.पण या खटल्याच्या निकलाकडे जिल्हाचे नव्हते तर तमाम महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिले होते.आरोपी होती सेक्स स्कँन्डल प्रकरणातील शिव छत्रपती पुरस्कार विजेती मेघना सावंत.पण मला मात्र एक एक क्षण युगा युगासारखा वाटत होता. वास्तविक वकीलाने केस कडे त्रयस्थपणे पाह्यचं असतं हे माहित असूनही मी या केस मध्ये इतका का गुंतून गेलो होतो हे माझे मलाच समजत नव्हते.

सांगली हे माझे गाव.लहानाचा मोठा मी इथेच झालो.दहावीला सांगली केंन्दात बोर्डात पहिला आल्यावर पुढील शिक्षण पुण्यात पूर्ण केले.पुणे इथे कायद्याची पदवी घेतली.दोन तीन वर्षे पुण्यातील प्रसिद्ध अँडव्हाकेट मुतालिक सरांचा असिस्टंट म्हणून काम केले आणि कामाचा अनुभव घेऊन जन्मगावी सांगली इथे वर्षांपूर्वी प्राँक्टिस सुरू केली.

एके दिवशी सकाळी चहाचा घोट घेत असताना फोन वाजला” अँडव्हाकेट डोंगरे आहेत का? “आवाज तर ओळखीचा वाटत होता.आवाजात भीती आणि कंप जाणवत होता.होय मी डोंगरेच बोलतोय.असं सांगील्यावर पलीकडून मी सावंतसर बोलतोय.आपल्याकडे महत्वाचे काम आहे.भेटायला येऊ का? असं विचारल्यावर मी लगेच त्याना या म्हणून सांगितले.


फोन ठेवल्यावर मी विचार करू लागलो .सावंतसराचे माझ्या कडे काय काम असावे.पैशाची काही अडचण नसेल ना?

सावंतसर मला नेहमी रम्या म्हणायचे.सावंतसर म्हणजे ऋषितुल्य आचार विचारांचे मूर्तीमंत प्रतिक . आठवी, नववी व दहावी पर्यत मी सरांचा विद्यार्थी होतो.गणित, सायन्स व इंग्रजी हे सरांचे हातखंडा विषय.निस्पृहपणे त्यानी विद्यदानाचे पवित्र व्रत आंगिकारले होते. खरं तर अभ्यासाची गोडी मला सरांमुळेच लागली.आज जो काही मी त्याचे सारे श्रेय सरांकडे जाते.ते सलग तीन वर्षे वर्ग शिक्षक असल्याने आम्हा काही विद्यार्थ्यांवर त्यांचा विशेष लोभ होता. बरेच वेळा मी व इतर तीन चार विद्यार्थी शंका विचारण्यासाठी व अभ्यासासाठी त्यांचे घरी जात असू.त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच असावी असे घरातील एकूण वातावरणा वरून लक्षात येत असे पण घर संस्कारी होत.माझ्या शाळेचे विद्यार्थी बोर्डात आले पाहिजेत या एकमेव ध्येयाने प्रेरीत होऊन ते आमची तयारी करून घेत असत. सरांच्या घरी त्यांच्या सौ.त्याना आम्ही काकू म्हणत असू. त्याना मेघना नावाची मुलगी होती.ती कन्या शाळेत शिकत असून तिने आंतर शालेय मैदानी स्पर्धे मध्ये अनेक बक्षीसे मिळविली होती.आम्ही विद्यार्थी असल्याने त्यांच्या इतर कुटुंबाशी तसा आमचा संबंध नव्हता.पण सरांचे टेबलावर दोन मुलींचा फोटो आम्ही नेहमी पहात असू.त्या पैंकी एक मेघना होती. सरांचा वर्गात जसा दरारा होता तसाच घरातही असावा. त्यामुळे आम्ही विद्यार्थी मांजरीच्या पाऊलानी जात असू व अभ्यास झाला की तडक घरी येत असू.त्यामुळे फोटोतील दुसरी मुलगी कोण तिचं नांव काय याची आम्ही कधी चौकशी केली नाही. दहावीचा रिझल्ट लागला.मी बोर्डात पहिला आलो.मला व घरच्याना खूप आनंद झाला.चोहिकडून माझं कौतुक होत होतं.शाळेत सरांचा व आम्हा विद्यार्थ्यांचा जंगी सत्कार झाला.शाळेची मुले बोर्डात आल्याबद्दल वर्गशिक्षक म्हणून सरांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला.सरानी विनम्रपणे सर्व श्रेय विद्यार्थ्याच्या चिकाटीला व परिश्रमाना दिले. एके दिवशी मी पेढे व सराना भेट म्हणून चांदीचा गणपती घेऊन गेलो.सरानी पेढे स्विकारले पण भेट वस्तू परत केली.सरांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसत होती.ते म्हणाले तू माझे स्वप्न पूर्ण केलेस , आजच्या इतका आनंद मला या पूर्वी कधीच झाला नाही.मी भीत भीतच सराना म्हणालो सर पाहिजे.तर गुरूदक्षिणा समजा पण नाही म्हणू नका.त्यानी मला जवळ घेऊन शाबासकी दिली व म्हणाले पुढच्या शिक्षणासाठी पुण्यास जात आहेस तेंव्हा माझे अशिर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत.


ठरल्याप्रमाणे सर दोन तीन लोकाना बरोबर घेऊन आले. सरांचा चेहरा उतरलेला दिसत होता. भीतीने अंगातील अवसान गळून गेलं आहे असे वाटत होते.मी सर्वांना बसण्यास सांगितले व चहाची आर्डर दिली.सर खुर्चीतही अंग चोरून बसले होते.त्याना काय झालं असावं याचा अंदाज येत नव्हता.”सर काय काम काढलत.” असं म्हणताच त्यानी कोटाचे खिशातून एक वर्तमानपत्र काढून माझ्या समोर ठेवलं.


पेपरच्या पहिल्या पानावरील ठळक मथळ्यातील बातमी वाचून मी सुन्न झालो. माझ्या पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला.मग सरांची काय अवस्था झाली असेल याची मी कल्पनाच करू शकत नव्हतो.

”शहरातील प्रसिद्ध नवरंग लाँजवर पोलीसांनी छापा टाकून सेक्स स्कँन्डल मधील चार तरूणीना अटक करून त्यांची पोलीस कोठडी मध्ये रवानगी केली.त्या मध्ये प्रसिद्ध खेळाडू मेघना सावंत हिचाही समावेश होता.” अटक करण्यात आलेल्या तरूणींपैंकी तीन तरूणी अज्ञान असल्याने त्याना ताकीद देऊन सुधारगृहात पाठविण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वस़ंत आगलावे हे करीत आहेत.

मी स्वतःला सावरून सराना धीर देण्याचा प्रयत्न करीत होतो.त्यानी माझे हात हातात घेतले व ही केस मी लढवावी अशी विनंती केली.सांगलीत मी नव्यानेच प्रँक्टीस सुरू केली आहे तरी त्यानी ही केस एखाद्या नामवंत वकीलाकडे द्यावी असे प्रामाणिकपणे सुचवत होतो.सरांच्या डोळ्यातील पाणी मला दिसत होते.ते म्हणाले तुझ्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे.नाही म्हणू नकोस माझी लाज तुझ्या हातात आहे.पण मला काय करावं ते सुचत नव्हते.सरांचे माझ्यावर खूप उपकार होते.ही केस तशी गुंतागुंतीची होती. काही बरं वाईट झालं तर मी मला कधीच माफ करू शकणार नव्हतो.

शेवटी काकुळतीला येऊन ते म्हणाले माझी गुरूदक्षिणा समज पण नाही म्हणू नकोस. यावर मी निरूत्तर झालो .नाही म्हणण्याचा कोणताच पर्याय माझ्याजवळ उरला नव्हता आणि मी केस स्विकारली. सरांबरोबर आलेल्या मंडळींची विचारपूस केली . मेघनाचे कोच रजनीकांत याना थांबवून घेतलं व इतराना निरोप दिला.

“बोला रजनीकांत काय म्हणताय” सर आंतरराज्य स्पर्धेच्या वेळी प्रथम मेघना सोळा वर्षाखालील मुलींची कर्णधार झाली. त्या वेळेपासून मी तिचा कोच म्हणून कायम तिच्या बरोबर होतो. ती अतिशय सालस, मनमिळवू मेहनती असून सरांप्रमाणेच करारी आहे. तिला अन्याय खपत नसे. ही घटना घडली त्या दिवशी मी पुणे येथील बालेवाडी क्रीडानगरीत मिटींग साठी गेलो होतो.ही घटना समजल्यावर मी पुरता गोंधळून गेलो होतो.असं होणच शक्य नाही.या मध्ये नक्कीच काहीतरी काळंबेरं असाव. चंदीगडला राष्ट्रीय स्तरावर शंभर मीटर रनिंग स्पर्धेत तिचा चुकीचा फाऊल दिला. त्या दिवशी ती ईव्हेंट सोडून तडक परत आली. त्या स्पर्धेचे मानधनही तिने परत केले.सर सांगा अशी मुलगी अस काही करेल का? रजनीकांत अगदी कळकळीने सांगत होते. आपण परत भेटू असं सांगून मी त्याना निरोप दिला.

काही कामानिमित्त सरांच्या घरावरून जात असता सरांची आठवण झाली. मी त्यांचे घर गाठले. सर बाहेर गेले होते. काकू एका लहान मुलाला खेळवत होत्या.मला पहाताच त्याना खूप बरं वाटलं असावं असं त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं.घरातील कोणत्याच गोष्टी बदलल्या नव्हत्या.मी कशी सुरूवात करावी या विचारात असताना मला तो टेबलावरचा फोटो दिसला.मी एकटक फोटोकडे पहात आहे हे लक्षात आल्यावर काकू सांगू लागल्या. हा फोटो मेघना व तिची मोठी बहीण मेघावतीचा आहे.मेघावतीने दहा बारा वर्षांपूर्वी पळून जाऊन एका परजातीच्या मुलाशी लग्न केलं. सरानी मेघावतीशी कायमचे संबंध तोडले. तिची साधी आठवण काढली तरी त्याना खपत नाही.सरांचा स्वभाव तुला ठाऊक आहे.मी आयुष्यात प्रथमच बंड करून हा फोटो मात्र हालवू दिला नाही.

मी लहान मुलाची चौकशी केली. तेव्हा त्यानी मेघनाची कहाणी सांगण्यास सुरूवात केली.तिला शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यावर तिची पाठदुखी खूप वाढली.म्हणून तिने मैदानी खेळ स्पर्धातून भाग घेणे सोडून दिले. तिच्या मर्जीप्रमाणे तिचं लग्न करून दिलं.एक दोन वर्षे सुखाचा संसार केल्यावर तिचा नवरा ब्लड काँन्सरने मागच्या वर्षी गेला.तिचे तिच्या नवर्‍यावर खूप प्रेम होतं. खेळ स्पर्धा मध्ये बक्षीस रूपाने तिला जे काही पैसे मिळाले होते ते सर्व हाँस्पीटलच्या खर्चासाठी संपून गेले. म्हणून मीच तिला व तिच्या मुलाला इथे घेऊन आले. मेघनाने खेळाडू म्हणून नोकरीसाठी प्रयत्न चालू होते. तिला आयर्विमा कंपनीत नोकरी मिळाल्याचं पत्र आलं असून ती एक दोन दिवसात हजर होणार होती.

ही घटना घडली त्या दिवशी विशेष काही घडलं का?

असे विचारताच त्या सांगू लागल्या दुपारी 2 ते 3 सुमारास कोणाचा तरी मोबाईल वर फोन आला होता. जसा वेळ मिळेल तसे येऊन जाईन असे ती म्हणाली. सर बीपी चेअपसाठी रात्री साडेसातचे सुमारास आमच्या फँमेली डॉक्टरांकडे गेल्यावर अध्यातासात येते असे सांगून गेली आणि हे असं घडलं. मला तर काही समजेनासे झाले आहे. हे सांगताना त्याचा कंठ दाटून आला होता.तूच आता यातून वाचवू शकतोस.मी त्याना धीर देऊन बाहेर पडलो.

काकू आणि कोच रजनीकांत यांच्या बोलण्यातून मेघना निर्दोष आहे याची मला खात्री पटली पण कोर्टाला पुरावा लागतो.

घड्याळात दुपारचे दोन वाजत आले होते.उद्या मेघना विरूद्ध पोलीस आरोपपत्र दाखल करणार होते. मलाही वकीलपत्र तयार करून त्यावर तिची सही घेणे जरूरीचे होते. त्यासाठी पोलीस निरीक्षक वसंत आगलावे याना भेटणे आवश्यक होते.

वकील चेंबरमध्ये पाय ठेवताच अज्या भेटला. रम्या लेका तू नवीनच करिअरला सुरूवात केली असून अशी गुंतागुंतीची केस घेण्याची कोणती अवदसा आठवली? अज्या म्हणजे अजय कोटणीस. तोही आमच्याच वर्गात होता. अज्या ते जाऊदे प्रथम हे सांग.हा पोलीस निरीक्षक आगलावे कोण? अरे तो आपल्याच वर्गात शेवटच्या बाकावर बसायचा. कायम उचापत्या,भांडणे व मारामाऱ्या करायचा. अरे तो जवळ आला की तू म्हणायचास “वशा आज कुठे आगलावणार .तोच हा इतके दिवस रत्नागिरीला होता. नुकताच इथे बदलून आला आहे.

मी निरीक्षक आगलावे यांच्या आँफीसमध्ये जाऊन मेघना सावंत हिचे वकीलपत्र घेतलं आहे असे सांगताच त्याना खूप आनंद झाल्याचे त्यांचे चेहऱ्यावरून जाणवत होते.मी केसच्या संदर्भात मला सहकार्य करण्याची विनंती केली.तेंव्हा ते म्हणाले रम्या मी हल्ली आग लावणे सोडले आहे. मी हल्ली आग विझविण्याची कामे करतो. त्याच्या वाक्यावर पोलीस स्टेशनच्या गंभीर वातावरणात आम्ही दोघे खळखळून हासलो. सावंतसरांशी तुझा जेव्हढा संबंध आला तेवढा माझा आला नाही.पण तो देव माणूस आहे.त्यांच्यावर ही वेळ यायला नको होती.पण नशीबाचे भोग कोणाला चुकलेत.?

मी मेघना बद्दल चौकशी केली तेंव्हा तो म्हणाला ती काहीच बोलत नाही. रडून रडून तिचे डोळे सुजलेत. तिच्या बद्दल तू काळजी करू नकोस. त्यावर मी म्हणालो मित्रा माझ्यासाठी एक काम करशील. तुम्ही मेघनाचा मोबाईल जप्त केला आहे त्या मध्ये दुपारी दोन ते तीनचे या वेळेत तिला कोणाचा फोन आला होता त्या व्यक्तीचे नाव पंचनाम्याची काँपी दे. त्यानी मला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

मेघनाला जामीन मिळवून देणे माझे प्रथम कर्तव्य होते.मी तिला लाँक रूम मध्ये भेटलो तेंव्हा ती निराश व विमनस्क मनस्थितीत मान खाली घालून अश्रू ढाळत होती. मला काही सांगायचे नाही. तुम्ही जा असा घोश्या लावला होता.तिचे न ऐकताच मी सांगू लागलो . हे बघ मी तुझे घरी जाऊन आलो. तुझा मुलगा तुझी आठवण काढून सारखा रडत आहे.सावंतसर आणि काकू तर फार खचून गेलेत.अग वाईट वेळ कोणावर येत नाही.पण असं खचून जायचं नसतं. धीराने सामोरे जायचे असते.तू तर खेळाडू होतीस.असे सांगीतल्यावर ती थोडी नर्मली.

माझ्या एकूण उपदेशाचा तिच्यावर थोडा परिणाम झाला असावा.तिने सांगण्यास सुरुवात केली.सावंतसरांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहेच.माझ्या मोठ्या बहि‍णीने मेघावतीने पळून जाऊन परजातीच्या मुलाशी लग्न केले.ते त्याना मान्य नव्हते.ती पुण्यात असते.अधून मधून आम्ही बहिणी घरच्यांच्या नकळत एकमेकीना भेटतो. पण सरानी तिचे नांव टाकलय..मेघावतीच्या नवर्‍याचा बिझनेस आहे. त्या दिवशी तो कामानिमित्त सांगलीस आला होता.त्याचे बरोबर मेघावतीही आली होती. तिनेच मला दोन तीनचे सुमारास फोन फोन करून ते सांगलीत उतरलेल्या लाँजवर भेटायला बोलावले होते.त्यावेळी सावंतसर घरी असल्याने लगेच जाऊ शकले नाही.

सर साधारपणे साडेसात चे सुमाराला बीपी चेक करण्यासाठी आमचे फँमेली डाँक्टरांकडे गेल्यावर मी आईला अध्या तासात येते असे सांगून बाहेर पडले.लाँजचे काउंटरवर मँनेजरशी मेघावतीची व तिच्या यजमांनांची चौकशी करीत होते.मँनेजरने त्यानी पाच वाजताच लाँज सोडले असे सांगीतले. मी तेथून परत फिरणार तोच अचानक लाईट गेले त्याच वेळी एक मुलगी अंधारात माझ्या पुढून वार्‍याच्या वेगाने धावत बाहेर पळाली.काहीतरी विपरीत घडलं असावं असे वाटून मी ही तिच्या मागोमाग बाहेर पडून रस्ता गाठावा म्हणून गेट पर्यत गेली असेन तोच पोलीसांनी अडवून मला ताब्यांत घेतले. पोलीस माझे काही म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.”पळून जात होतीस काय “ असे सारखे म्हणत होते.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मेघनावर आरोप पत्र दाखल केले.मी देखील मेघनाचे वकीलपत्र दाखल केले आणि तिला जामीन मिळाला.

यथावकाश केस कोर्टात उभी राहली.पोलीसानी सायंकाळी साडेसात चे सुमारास धाड टाकून चार मुलीना लाँजवर पकडलं. पंचनामा चालू असताना रात्री आठचे सुमारास अचानक लाईट गेले. अंधाराचा फायदा घेऊन चौघीपैंकी एक मुलगी पोलीसाना गुंगारा देऊन तेथून पळाली. पण पळालेली मुलगी समजून पोलीसानी मेघनाला गेट पाशी ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्या त्या तीन मुलीनी कोर्टा समोर उलट तपासणीत मेघना आमच्या बरोबर नव्हती. मेघनाला आम्ही ओळखत नाही आणि आमच्यातील पळून गेलेली मुलगी ही मेघना नाही अशी साक्ष दिली.

हाँटेलच्या मँनेजरला साक्षी साठी बोलावलं होतं.त्याने मेघावती व तिचा नवरा पाच वाजता लाँजवरून निघून गेले. मेघना ही आठचे सुमारास तिच्या बहिणीच्या चौकशी साठी आली होती अशी साक्ष नोंदवली. मेघावती व तिच्या नवर्‍याचीही साक्ष नोंदविली. सावंत सराना सर्व गोष्टी समजावून सांगीतल्या होत्या. कोर्टात दाखल केलेल्या साक्षी पुराव्याच्या आधारे मेघना निर्दोष आहे याची मला खात्री होती.

कोर्टात घड्याळात आठेअकराचा ठोका पडला तेंव्हा मी भानावर आलो.कोर्टाच्या शिरस्त्याप्रमाणे मी उभा राहिलो. न्यायाधीश महाशयानी स्थापन्न होऊन मेघना सावंतला निर्दोष घोषीत केले.

सरानी माझे दोन्ही हातात घेतले .त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू माझ्या हातावर पडत होते.”रम्या मला आज खरी गुरूदक्षिणा मिळाली."


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy