STORYMIRROR

Pallavi Loke

Inspirational Others

4  

Pallavi Loke

Inspirational Others

साडी व्यवसाय

साडी व्यवसाय

4 mins
484

" काय ग दिवसाला किती साड्या विकतेस. कोणी घेत की नाही. बघते मी रोज तुझे स्टेटस. " सीमा आरती ला म्हणाली. सीमा आरती दोघी एकाचं कॉलनीतील जवळपास एकाच वयाच्या. दोघी ही नोकरी ला होत्या. पण या लॉकडाऊन मध्ये आरती चा जॉब गेला. गेला म्हणजे त्या तुटपुंज्या पगारासाठी तिने त्या कोरोना महामारीत सोडला. अर्ध्या पगारासाठी घरच्यांचे जीव धोक्यात घालने तिला पटत नव्हते. सीमा ने नाही कोणाचं ऐकल किती ही विरोध झाला तरी ती नोकरी ला गेलीच. बस, टॅक्सी मिळेल ते पकडुन. आरती ने जॉब सोडला सुरवातीला सगळ आलबेल होत. पण नंतर हातातला पैसा कमी झाला आणि भविष्याची चिंता होतीच म्हणून मग तिने घरीच ऑनलाईन साडी विकण्याचा व्यवसाय चालू केला. सुरवातीला सगळ्यांनी नाक मुरडलित. ' जमेल का तुला ? लॉस झाला तर ? तुझ्या कडून कोण घेणार ? भांडवल च काय ? ' अस बरच काही. पण आरती 

 स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे कोणत्याही प्रलोभनांना न बळी पडता काम करायचं असं तिने ठरवले. 

आज वर्ष झाले. कोरोना मुळे बंदिस्त असलेलं जग आता मुक्त होऊ पाहत होत. आता कॉलनितल्या बायकांचे कार्यक्रम पण ठरू लागले होते. 

आरती ने ऑनलाईन साड्यांचा व्यवसाय सुरू केल्याचे आता सगळ्यांनाच माहीत होते. आरती कोणतीही भीती न बाळगता आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग सोशल मीडिया, ग्रुप सगळीकडे करत असे. 

काही काही बायका तर तिच्या समोर साडी हा विषय च काढत नसत. उगाच आपल्याला तिने एखादी साडी घेण्याचा आग्रह केला तर. सीमा आणि आरती सख्ख्या शेजारी पण कोरोना मुळे घरी येजा बंद झाली होती. आणि हीचा जॉब गेला.. मला जॉब आहे म्हणून ही ची नजर लागले म्हणून सीमा आरती पासून चार हात लांबच असे. 

आज वर्ष भरा नंतर १५ ऑगस्ट च्या ध्वजवंदन निमित्त सगळे जमले होते. सीमा, आरती आणि खूप जनी होत्या. 

बसल्या बसल्या पण आरती साडी चे फोटो कोणाला तरी पाठवत आहे हे पाहून सीमा ने आरतीला विचारले, " काय ग दिवसाला किती साड्या विकतेस. कोणी घेत की नाही. बघते मी रोज तुझे स्टेटस. " आरती ने मोबाईल बंद केला आणि सीमा कडे स्मित हास्य करत पाहिले, " अग हो ना , घेतात की साड्या. गुणवत्ता आणि जिव्हाळा जपला की व्यवसाय होतोच. विश्वास हीच व्यवसायाची गुरू किल्ली". सीमा ला तिचे फिलॉसॉफीकल उत्तर जरा आगाऊपणा वाटला पण तरी ती ने पुन्हा तोच सुर लाऊन विचारलं, " अग हे बोलायला झालं. पण सुरवातीला अस कोणी कस घेत असेल. मला तर अजिबात पटत नाही हे. आज काल किती जणी अशा ऑनलाईन पोस्ट टाकून फसवणूक करतात. फोटोत एक साडी आणि हातात दुसरी च. माझं ऐक तू, नोकरी ला लाग. हे एक दोन साडी विकून काय मिळणार तुला " 


आरती ला राग आला होता आता सीमा चा .. कारण ती स्वतः प्रोत्साहन तर नव्हतीच देत पण बाकी स्त्रियांच्या मनात पण ऑनलाईन व्यवसाय विषयी भीती शंका उत्पन्न करत होती. जे चुकी चे होते. ठरल्या वेळा प्रमाणे ध्वजारोहण झाले. नगरसेविका दोन शब्द बोलुन निघुन गेल्या, सगळे घरी जाणार इतक्यात आरतीने माईक घेतला. आणि मला माझ्या व्यवसाय विषयी बोलायचं आहे असं सांगून सगळ्यांना थांबण्याची विनंती केली.


सकाळचे ८ च वाजले होते आणि सुट्टी चा दिवस म्हणून सगळेच थांबले. तिथे बहुतांश व्यक्तींच्या मनात 'आता ही माझ्याकडुन साडी घ्या. ऑफर आहे.' हे सांगणार बहुतेक असा विचार करत हसत उभ्या होत्या. आरती ला हे पक्क माहीत होत की, आपल्याला स्वतः ला सिद्ध करायचं असेल तर गप्प बसून चालणार नाही. तिने माईक घेतला,

" नमस्कार, तुम्हाला सर्वांना स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही फक्त ५ मिनिट. माझा व्यवसाय, माझं उत्पन्न या बद्दल खूप प्रश्न पडले आहेत सगळ्यांना म्हंटल आता उत्तर देतेच. मी सौ. आरती निंबाळकर. मी ऑनलाईन व्यवसाय करते. साड्या, रेडिमेड ब्लाऊज, पर्स विकते. आता प्रश्न १) भांडवल - मला भांडवल - गुंतवणूक करावी च लागली नाही कारण मी एका प्रतिष्ठित शॉप ची फ्रांचायजी घेतली आहे. प्रश्न २) अस कुठे होत का - हो अस होत. मोठ मोठे शॉप्स देतात फ्रांचायजी. त्यात भांडवल नाही आपली जिद्द बघतात. मन लावून प्रामाणिक पणे काम केलं तर हे ही करता येत. प्रश्न ३) साडी कोण घेत - तुमच्या पैकी च एक गृहिणी - वर्किंग वूमन , जी माझ्यावर विश्वास ठेवून पहिली साडी घेते आणि तिच्या विश्वासाला पात्र ठरले की मग पुढच्या अनेक साड्या माझ्या कडूनच घेतल्या जातात. प्रश्न ४) आम्हाला नाही जमणार अस ? अस कस नाही जमणार. तुम्हाला ही जमेल च. कोणतीही लाज न बाळगता आपल काम चोख करायचं. ग्रूप वर साडी पोस्ट करणे, काही प्रॉडक्ट स्वतः वापरणे. समारंभाला एखादी साडी आवरजून भेट देणे. आणि अजून बरेच काही. केले तर तुमचा व्यवसाय नक्की वाढू शकतो. 


बाकी अजून कोणाला काही माहिती हवे असेल तर माझ घर माहीत च आहे सगळ्यांना. नक्की भेटू. धन्यवाद"

आरती भाषण संपवून बाजूला झाली.

आरती च भाषण ऐकून काही जणी भारावल्या तर काहींनी नाक मुरडले. पण तुमच्या प्रगती पथावर तुम्हाला गुलाबाचे काटे टोचनारच. आरती चा नवरा पण एका कोपऱ्यात उभे राहून भाषण ऐकत होता. आरती ला खूप जण ' उत्तम, अभिनंदन, शुभेच्छा देत होते '


आरती नवऱ्या जवळ आली. त्याने तिला विचारले ," भाषण छान झालं. पण कशाला उगाच आपली आयडिया लोकांना सांगायची. ते पुढे जातील. तू राहशील अशीच "


आरती ला यावर हसू की रडू काहीच कळेना. ," अरे अस का बोलतोयस. आज या स्वतंत्र दिनी मी खऱ्या अर्थाने माझ्या सारख्याच इथे उभे असलेल्या गृहिणी ना स्वतंत्र होण्याचा मार्ग दिला आहे. त्यांना आता भांडवल नाही म्हणून गप्प बसण्याची गरज नाही ".


समाप्त.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational