कौतुकाचे शब्द
कौतुकाचे शब्द
कौतुक कोणाला नाही आवडत... स्वतःची स्तुती कोण नाकारेल. पण याचा अर्थ असा नाही होत की.. केलेलं प्रत्येक काम कौतुक ऐकण्यासाठी असेल.
स्त्री, मग ती गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन, आई असो की आजी.... ती निःस्वार्थीपणाने कर्म करत असते... तिकडे मोबदला मागितला जात नाही... आई , दिवस रात्र घरात राबत असते... सगळ्यांना हवे नको ते बघते... आई आता वर्किंग वुमन झाली आहे पण तिचे कर्तव्य नाही विसरली आहे .. आज ही स्त्री घर, ऑफिस, सासू सासरे, आई बाबा, मुलं, आणि समाज या सगळ्यांना सांभाळून आयुष्याची परीक्षा पास करते आहे.
या सगळ्यात तिला काय हवे आहे... कधी विचार केलात.... तुम्ही तिच्या वाढदिवसाला कट केलेला केक... नाही.... तुम्ही दिलेले महागडी गिफ्टस.... नाही..... एक वर्ल्ड टूर.... नाही.... या सगळ्यांनी तिला आनंदच होईल... पण तिला समाधान नाही मिळणार....
समाधान. ... तिला फक्त तुम्ही केलेल्या कौतुकाच्या दोन शब्दातून मिळेल... मग हे कौतुक कधी करावे... रोज .... मदर्स डे ला, वुमेन्स डे ला..... अजिबात नाही.... कौतुक ठरवून नाही.... पण जाणीवपूर्वक केलं पाहिजे....
आई च कौतुक जेवणानंतर करा... " ही कसली भाजी वाढली आहेस, रोज रोज काय डाळ भात " अस नका बोलू... तुम्हाला गरम गरम जेवण मिळावं म्हणून ती १-२ तास किचन मध्ये उभी असते.. हे लक्षात ठेवा... आईच्या जेवणाची मज्जा त्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना विचारा, परेदेशी राहणाऱ्या मित्राला झुणका भाकर आठवते की नाही ते विचारा...
बायको.... तुमची बायको काल पर्यंत आईवडिलांची लाडकी लेक होती... घरी यायचं... ताट वाढलेलं समोर यायचं.... पण तुम्ही आता तिला निरखून बघा.... ऑफिस मधून धावत पळत तुमच्यासाठी घरी येते... थकून येते... पण बसत नाही... तुमच्या जेवणाची तयारी करते... तुमचं घर आपल समजून त्याच गोकुळ करते... या बदल्यात तुम्ही जर तिला फक्त... " तुला तशी भाजी जमत नाही, पोळ्या गरम नाहीत, " हे बोलणार असाल तर ती दुखावणार च ना.... फेसबुक वर व्हॉट्स अप ला तिच्या वाढदिवशी पोस्ट टाकण्यापेक्षा... दिवसातून १० मिनिट तिच्या जवळ बसा... तीच म्हणणं फक्त ऐका... आणि तिला एकदा सांगा मी तुझ्या सोबत आहे...तिला २ कौतुकाचे शब्द बोला.... बघा तिचा उत्साह मग...द्विगुणित होतो ते....
वर्किंग वुमन..... त्यांचे तर हालच वेगळे... घरी वेळ देता येत नाही म्हणून घरचे बोलतात... आणि तिकडे ऑफिस मध्ये जरी त्यांची काम केलीत तरी उशिरा थांबत नाही म्हणून तिकडेही ओरडा ओरड..... तुमची ऑफिस ची मैत्रीण, सहकारी, वेळेवर येऊन वेळेवर जात असेल तर... तिला टोकु नका.... तुम्हाला कल्पना ही नसेल रोज ऑफिस का येण्या आधी आणि ऑफिस नंतर ती कस आयुष्य जगत असेल.... तिला तिचे काम करू द्या.. तुम्ही तिला तिच्या कामात प्रोत्साहन द्या... तिला जर बढती मिळत असेल तर... याचा अर्थ असा नाही तिचा चारित्र्य वाईट आहे... कदाचित तीच डेडिकेशन तुमच्या पेक्षा जास्त असेल.
कोणत्याही स्त्रीला तुमची मदत नकोय... फक्त कौतुकाचे दोन शब्द.... तिला तेवढेच पुरेसे आहेत... मग बघा ती कशी जोमाने कामाला लागते... आणि स्वतचं एक वेगळं अस्तितव निर्माण करते....
