प्रिय पावसा
प्रिय पावसा
"प्रिय पावसा"
तू येतोस,बरसतोस, मला भिजवतोस, मुक्त्त आनंदी जगायला शिकवतोस आणि काही दिवसांतच मनाला नि प्रेमाला नवी पालवी फुटताच निघून जातोस...
'तो' ही तसाच आहे वर्षातून पावसाळ्याचे दोन महिने सुट्टी घेऊन येतो .
घराला नवं घरपण देतो, सुखाचा वर्षांव बरसतचं असतो नि निरोपाचा क्षण दाराशी येऊन त्याला पुन्हा माझ्यापासून दूर नेतो.
आम्ही त्या क्षणात आम्ही खूप हसतो, बागडतो, बहरतो, एकमेकांच्या प्रेमात अगदी भिजून जातो.
पण मागच्या वर्षी काही कामामुळे येता न आल्यामुळे एक पत्र पाठवतो.
"प्रिय सुमन"
या वर्षी घरासाठी नि तुझ्यासाठी खूपसं काही करता येणार नाही, कारण माझी पोस्टिंग देशाच्या सीमारेषेवर काही खास कामासाठी झालेय. यावर्षी पावसाळा तुला एकटीलाच पाहावा लागणार आहे. सीमारेषेवरचं वादळं संपलं की मी लगेचच येईन. तोपर्यंत तू तुझी काळजी घे!
तुझा पाऊस - तुझा वरुण
वर्ष उलटून गेले तरीही तो अजून आला नाही
मला भीती वाटतेय कि यावर्षी सुद्धा माझा पावसाळा त्याच्याशिवाय अगदी निशब्द नि कोरडाच असेल का?...
"माझ्या पावसा"
ओली माती, वाहत वारा
तुझ्याशिवाय अधुरी असेन मी
नकोय असा मला एकही पावसाळा
सुमन आणि पावसाळा यांचं नातं आता शब्दापलीकडंच झालंय, आणि तिच्या वरुणचं पत्र तिझ्यासाठी जगण्याचा सहारा झालाय

