प्रितीच्या प्रितीचा राज
प्रितीच्या प्रितीचा राज


खर तर मी कॊणी लेखिका..नाहीये..पण तुमच्या या स्पर्धा मुळे..मला माझ्या मनामधील भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली मी यासाठी तुमचे सर्वांची आभारी आहे.
प्रिय,
राज
तुला आज पत्र लिहीण्याचा योग आला. खरं तर आपला प्रेम विवाह नाही. रीतसर कांदेपोहे चा कार्यक्रम होऊन आपण विवाह बंधनात बांधले गेलो.आणि खऱ्या अर्थाने आपल्या प्रेमाची सुरुवात झाली.
सुरवातीला मनामध्ये खूप घालमेल होती.पण तुझ्या समजुदार स्वभावमुळे सगळ्या गोष्टी सोप्या होत गेल्या आणि हळूहळू तुझ्या प्रेमात पडत गेले.
खरं तर प्रेमाची व्याख्या हि व्यक्तीनुसार बदलते. माझ्यासाठी तर "प्रेम हि भावनाच खूप मस्त आहे", "कारण त्याच्या प्रारंभीच मी पणाचा अस्त आहे". हे तुझ्याशी लग्न झाल्यावर समजले आणि, मी माझी न राहता आपण कधी झालो तें समजलेच नाही.
"राज" हे लोकांसाठी एक नाव असेल.पण हेच नाव माझ्यासाठी फक्त नाव नसून सर्वस्व झाले आहे. खरं तर तू तुझ्या नावाप्रमाणेच माझ्या मनावर पण "राज" केलेस रे. काय लिहू आणि किती बोलू असे झाले आहे.
"राज" रा- रामाप्रमाणे
ज- जगणारा
तुझ्या या दोन अक्षरी नावामध्ये सर्व सामावून घेतलेस रे मला.
खरं तर माझे नाव प्रीती पण याचा खरा अर्थ तर तुझ्यामुळे उमगला.तुझ्या सारखा जोडीदार सापडायला भाग्य लागत.तुझ्याशी भेटले आणि स्वतःशीच नव्याने ओळख झाली.याच जन्मात काय पुढच्या साता जन्मात तूच जोडीदार म्हणून हवा.
तसे आपल्या आयुष्यात अनेक वेगळे वेगळे प्रसंग आले. प्रत्येक वेळी तू मला जोडीदार म्हणून साथ दिली. तुझ्या माझ्या प्रेमाचे प्रतीक म्हणून आपल्या संसाराच्या वेलीवर "लव" नावाचे फुल उमलले. खरं तर इंग्लिश मध्ये "लव" म्हणजे प्रेम.इथे सुद्धा मला प्रेमच दिलेस.
तू नेहमी म्हणतोस प्रीती म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे प्रीती, पण माझ्यासाठी तर,
तू माझा राज, मी तुझी प्रीती
अर्धांगिनी मी, तू माझा पती
तुझ्यामाझ्या मनाची जुळली नाती
आयुष्याचे आपण सखे सोबती
तुझी माझ्यावर अशीच आयुष्यभर प्रीती राहो.
तुझ्या प्रीतीची
प्रीती