STORYMIRROR

Santosh kamble

Romance Others

3  

Santosh kamble

Romance Others

प्रेमातील मन....

प्रेमातील मन....

6 mins
194

प्रेम हे कधी रूप, रंग आणि कोणतीही कमी बघत नाही. प्रेम खरेतर मनावर होतं. प्रेम ठरवून करता येत नसलं तरी एखाद्या सोबत ठरवून आयुष्य जगता येतं. 

प्रसन्नाला कविता लिहण्याचा खूप छंद होता. ती तिच्या कविता सोशल मिडीयावर पोस्ट करायची. तिच्या कवितांना खूप Likes मिळायचे. तिच्या कविता होत्याच खूप भावनिक की कोणीही त्या कवितेत भावून जाईल. तिच्याच एका सोशल मिडीयावरील सागर नावाच्या मुलाला तिच्या कविता खूप आवडायच्या. जेव्हा जेव्हा ती तिच्या कविता पोस्ट करायची. तेव्हा तेव्हा तो ती कविता त्याच्या एका बुक मध्ये लिहून ठेवायचा. 

तिच्या या कवितांमुळे ती त्याला खूप आवडायला लागली. त्याने तिला कधीच पाहीले नव्हते. तो नेहमी तिच्या कवितांवरून तिचे रूप मनात रंगवायचा. एवढी सुदंर कविता लिहणारी किती सुंदर असेल असे तो विचार करायचा. तो तिच्या प्रत्येक कवितांच्या पोस्ट वर कमेंट करायचा. एक दिवस त्याने तिला मॅसेज करायचे ठरवले. त्याने हिम्मत धरून तिला सोशल मिडीयावर Hi हा मॅसेज केला. प्रसन्ना ने त्याचा मॅसेज पाहिला आणि तिने सुद्धा रिप्लाय दिला. मग त्याने तिला सांगितले की, आपण अतिशय अप्रतिम कविता पोस्ट करता. एक विचारायचे होते, ह्या कविता तुम्ही स्वतः बनवता का?” तिचा रिप्लाय हो आला. नंतर तो म्हणाला की, खरचं तुम्ही खूप भावनिक कविता लिहता आणि मला तुमच्या कविता खूप आवडतात. तीने धन्यवाद रिप्लाय दिला आणि ती ऑफलाईन गेली. अशाप्रकारे तो नेहमी तिला मॅसेज करायचा. दोघे ही एकमेकांशी खूप बोलायचे. 

सागर गॅलेरीत बसून त्याच्या बुक मध्ये लिहलेल्या तिच्या कविता वाचत होता. तिने अजून कविता पोस्ट केल्या आहेत का हे पाह्ण्यासाठी तो सोशल मिडीयावर ऑनलाईन आला. त्याला दिसले की प्रसन्ना पण ऑनलाईन आहे. तर त्याने तिला मॅसेज केला "काय करतेय? "तीने रिप्लाय केला" काही नाही आणि तू" त्याने विचार केला की आपण इतके दिवस झाले हिच्या सोबत बोलत आहोत. तर तिचा फोन नंबर मागायला हवा. मग त्याने धाडस करून तिचा फोन नंबर मागितला. तिने देण्यास नकार दिला. पण ती त्याच्यावर रागवली नाही ती म्हणाली की, “आपण येथे मॅसेज वरच बोलू". तेव्हा सागर ओके रिप्लाय करतच होता की चुकून त्याचा फोन हातातून सटकला आणि गॅलेरीतून खाली पडला. जेव्हा तो खाली फोन आणायला गेला तेव्हा त्याचा फोन खूप खराब झाला होता. तो फोन रिपेरिंगसाठी घेऊन गेला तर तेथील दुकानदाराने त्याला, "हा फोन १५ दिवसानंतर रिपेअरिंग करून मिळेल" असे सांगितले. 

त्याने होकार दिला आणि घरी आला. प्रसन्ना त्याचा रिप्लायची वाट पाहत होती. तिला वाटले याला नंबर नाही दिला म्हणून हा रागवला असणार. ती त्याला मॅसेज करत राहिली. पण याचा फोन खराब झाला आहे हे तिला माहित नव्हते आणि सागर ला काही कारणासाठी गावाला जावे लागले. दोन दिवस झाले मॅसेज चा रिप्लाय आला नव्हता. तिला खूप वाईट वाटले तिला वाटले की सागर तीचाशी कधीच बोलणार नाही. म्हणून तिने त्याला मॅसेज करायचे सोडून दिले. १० दिवस झाले होते. तिला करमत नव्हते कारण तिला सवय झाली होती त्याच्याशी बोलायची. तिने त्याला मॅसेज केला आणि तिचा नंबर दिला आणि ती म्हणाली की, "हा घे माझा नंबर, तुला राग आला आहे म्हणून तुला दिला, पण प्लीज माझ्याशी बोलत जा. सवय झाली आहे मला तुझ्याशी बोलायची" तरी त्याचा रिप्लाय येत नाही. 

सागर गावावरून येतो आणि फोन रिपेअरिंग झाला का हे पाहण्यासाठी जातो. तर तो दुकानदार त्याला म्हणतो की, फोन कधीच रिपेअरिंग केला होता. त्याने फोन घेतला आणि तिचे मॅसेज पहिले. त्याला कळले होते की हिचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे तो तिला मॅसेज न करता कॉल करायचे योग्य समजून तिला कॉल करतो. पण तिने त्याचा फोन असेल म्हणून कट केला आणि फोन वर मॅसेज केला की, "मी घरी असते म्हणून फोन वर नाही बोलू शकत.” तर त्याने ही ठीक आहे हा रिप्लाय दिला.

मग दोघे ही फोनवरच मॅसेज करून एकमेकांशी बोलयचे. त्याने त्यांच्यामधील झालेल्या गैरसमजे दूर ही केले. दोघेही एकमेकांशी मॅसेजवर खूप बोलायचे. त्यामुळे एक ही दिवस त्यांना एकमेकांशी बोलल्या शिवाय जायचा नाही. एक दिवस सागरने तिला भेटायचे असे ठरवले. त्यांच्या बोलण्याबोलण्या मध्ये त्याने तिला विचारले की, "प्रसन्ना आपण इतके दिवस झाले एकमेकांशी बोलत आहोत, मला एकदा तूला भेटायचे आहे. तुझा आवाज एैकायचा आहे.” तिने या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही. खूप वेळ मॅसेज नाही आला. सागरने परत मॅसेज केला की, "सांग ना ग" तीचा रिप्लाय आला की "आपण असच नाही बोलू शकत का? भेटणे महत्वाचे आहे का?” तो म्हणाला, “असे नाही आहे, तरी पण एकदा तुला बघायचे आहे. तुझा आवाज एैकायचा आहे.” तर ती म्हणाली की, "एक Promise करशील? " तो हो म्हणाला. ती म्हणाली की, “मी जेव्हा तुला भेटायला येईल आणि तेथे तुला काही कळाले, तरी तू आपली ही मैत्री तसीच ठेवशील ना?” तो म्हणाला, “अगं वेडी असं का बोलतेय" ती म्हणाली, “आधी तू सांग" मग तो म्हणाला, "हो, मग उद्या भेटूया का?” ती हो म्हणाली. मग त्या दोघांनी भेटण्याची वेळ आणि ठिकाण ठरवले. 

सागर खूप आनंदी होता. आपण प्रसन्ना ला प्रत्यक्ष भेटणार आहोत. दोघांनी ही एकमेकांना कधी बघितले नव्हते. त्यामुळे एकमेकांना कसे ओळखावे हे कठीण होते. सागर ने त्याचे काही फोटो सोशल मिडीयावर टाकले होते. त्यामुळे प्रसन्ना त्याला ओळखेल हे त्याला माहित होते. ज्या ठिकाणी भेटायचे ठरले होते त्या ठिकाणी सागर जाऊन तिची वाट पाहत होता. समोरून एक मुलगी येत होती, कदाचित तीच प्रसन्ना असेल असे त्याला वाटले. ती डोळ्यासमोर आली आणि तिने इशाऱ्याने Hi केले. त्याने सुद्धा तिला इशाऱ्याने Hi केले. दोघेही एका ठिकाणी बसले तेव्हा सागर तिच्याशी खूप बोलत होता. ती फक्त Smile देत होती. त्याला असे वाटले की हीला ऑड वाटत असेल म्हणून आपल्याशी बोलत नसेल. पण सागर बोलतच राहिला आणि अचानक त्याने पहिले की प्रसन्ना च्या डोळ्यात अश्रू होते. त्याने तिला विचारले की का रडत आहेस. ती काही बोललीच नाही. त्याने विचारले की मी कुठे चुकलो का? तरीही ती काहीच बोलली नाही. तिने त्याच्या हातात लेटर दिले आणि तेथून निघून गेली.

तो ते लेटर तिकडेच वाचत होता. त्यात असे लिहले होते की, "सागर मला माफ कर मी आपल्या मैत्रीच्या नात्यात फसवणूक केली आहे. मी तुझ्याशी खूप खोटं बोलली आहे. खर सांगू तर मला बोलता येत नाही. लहानपणा पासून मी मुकी आहे आणि हेच मला माझ्या आयुष्यातला कमी पणा वाटतो. मी तुझी मैत्रीण नाही बनू शकत हे सत्य मला स्वीकारायला हवं. मला नाही करमणार तुझ्या शिवाय पण मला माहित आहे. तुला जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा तू स्वतः आपल मैत्रीचं नातं तोडशील. मला जास्त त्रास होण्यापेक्षा मीच तुला माझे खरे सत्य सांगून आपले मैत्रीचे नाते तोडते. जमेल तर मला माफ कर.” हे वाचून त्याला खूप वाईट वाटते. तो तिला मॅसेज करतो की, "तू जिकडे आहेस तिकडून परत ये, मी अजून इथेच आहे. जीत पर्यंत तू येणार नाही. तीतपर्यंत मी इथेच राहीन तुझी वाट बघेन". 

ती हा मॅसेज बघून परत मागे येते आणि त्याच्या समोर उभी राहते. तो बोलतो " तू बरोबर समजलीस मला, तुझे हे सत्य एैकून आपल्यातलं हे मैत्रीचे नाते संपवणार आहे.” तीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती जाण्यास निघते. तेव्हा तो बोलतो, "आणि हे मैत्रीचे नाते तोडून मला तुझ्यासोबत प्रेमाचे नाते जोडायचे आहे. मला तुझ्यातला हा निरागस पणा आवडायला लागला आहे. काय झाल जर तू बोलत नसलीस, मला तुझे मन बघून तुझ्यावर प्रेम झाले आहे. खरतर मी तुझ्या कवितांचा आधीपासून वेडा होतोचं आता तर तुझ्या मनाचा ही वेडा झालो आहे. जरीही तू माझ्याशी ओठाने बोलू शकली नाही तरी तुझ्या मनाने तू माझ्याशी बोलू शकतेस, मग सांग होशील का माझ्या आयुष्याचा पार्ट”. ती हे सगळं एैकून त्याला मिठी मारते आणि त्याला कळते की हीला सुद्धा माझ्या आयुष्याचा पार्ट व्ह्याचा आहे" पुढे तो तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला तिच्याच कवितांचा संग्रहाच पुस्तक गिफ्ट करतो आणि म्हणतो की, "आता सगळे तुझी कविता वाचतील”.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance