Varsha Chopdar

Inspirational

2  

Varsha Chopdar

Inspirational

प्रेम

प्रेम

3 mins
9.1K


प्रेम म्हणजे प्रेम ..........

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं

तुमचं आमचं सेम असतं ............

हे आठवलं प्रेम दिवसाच्या म्हणजे valentine दिवशी. फक्त एकच दिवस प्रेम करायचं का ? हल्ली विविध प्रकारचे डेज साजरे केले जातात. आधी कुठे होतं हो असलं ? तरीही आधी दररोज छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम जाणवत होते. हे जाणवत होतं, कारण जाणवणं आणि दिसणं यात खूप फरक आहे .

आधीच्या काळी प्रेम करायला घरातील इतकी माणसे असायची. उदा. आजी-आजोबा, काका–काकी, मामा-मामी इ. घरातील माणसांमुळे बाहेरील व्यक्तीची गरजच लागत नव्हती. घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीशी आपलं इतकं जुळायचं की त्याच्याजवळ आपण आपले मन मोकळ करायचो, पण हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सर्व जीवनशैली विस्कटली गेली आहे. ‘हम दो-हमारे दो’ या मध्ये प्रत्येक जण कामाच्या व्यापात आहे. माणसे कमी झाली आणि सुसावंद देखील, अशावेळी मित्र-मैत्रीण, सखे-सोबती जवळचे झाले. चित्रपट, सहली, नवीन वर्षाचे स्वागत हे ओघाने आलेच, याला काहीजण अपवाद आहेत. उदा. तारक मेहता मध्ये दाखवलेली कुटुंब पद्धती. यातून आपण खूपच बोध घेऊ शकतो.

आजकाल कुटुंब नको, मित्र-मैत्रिणीबरोबर जास्तीत-जास्त वेळ घालवायला आवडत आहे. त्यांच्याकडे बघून यांना नक्की प्रेमाची व्याख्या समजली आहे का ? याची शंका येते. प्रेम म्हणजे मुलाने मुलीवर केलेले नसून मुलांचे-आई वडिलांशी, नवऱ्याचे-बायकोशी, आजोबांचे-आजीशी इ.

प्रेम म्हणजे काय ?

आपुलकीने बोलणे. एकमेकांवर विश्वास ठेवणे. दु:खात सोबत करणे. सुखात आनंदून जाणे. नवऱ्याची काळजीने उशीर झाला तर फोन करून विचारपूस करणे. बायकोची घाई असताना तिचा डबा भरणे. बायकोला प्रोत्साहन देणे. नवऱ्याच्या कामात मदत करणे. मुले आजारी असताना आई वडीलांनी जागरण करणे. छोट्या भावाला-बहिणीला खेळवणे, दुखापत होऊ नये म्हणून काळजी घेणे. आई-वडिलाना कामात मदत करणे. गुण,दोषासकट आपल्या आवडत्या व्यक्तीचा स्वीकार करणे. प्रेमाला वय नसते- रस्ता ओलांडताना आजी-आजोबांनी घेतलेला हातात-हात.

प्रेम हे नि:स्वार्थी असावे. त्याला स्वार्थीपाणाचा लवलेशही नसावा. प्रेम निखळ, पारदर्शी असावे. प्रेमाचा आधारस्तंभ म्हणजे विश्वास. ‘शब्दाला धार नको, तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात.’ प्रेमाच्या चार शब्दांने एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते. प्रेमाचे चार शब्दांचे मोल पैशापेक्षा खूप मोठे असते. ‘कणा’ या कवितेतून दिसून येते. उदा.‘सर फक्त पाठीवर हात ठेऊन लढ म्हणा.’ या वाक्यातून.....

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आई-वडिलांना आपल्या मुलांना कुशीत घ्यायला वेळच नसतो. मग अशी मुले प्रेमाच्या शोधात चुकीच्या वाटा शोधतात. वाईट संगतीत वेळ घालवतात. माझी अशा पालकांना विनंती आहे, काम करा, पण जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाला द्या, प्रेम द्या. आई आपल्या मुलांचे संगोपन करताना करियर मधे येऊ देत नाही. लहान मुलीला सांभाळायला कोणी नाही म्हणून एका बँकेच्या मनेजर (महिला) यांनी नोकरी सोडली. हे एक प्रकारे प्रेमाचे प्रतीकच म्हणावे लागेल.

कुटुंबातील मुले मोठी झाल्यावर त्या घराचं रूप पालटत. म्हातारी माणसे ओझे वाटू लागतात. त्यांना सांभाळणं हे एक कर्तव्य असे त्यांच्याकडे बघितले जाते. त्यापुढे कहर म्हणजे त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जातो. या आजी-आजोबांची किंमत डँबीस या चित्रपटातून दाखवली आहे. तसेच दोन वृध्द दाम्पत्यांना आपल्यासोबत घरी नेऊन सांभाळणारेसुध्दा महानच आहेत.

‘बदल ही काळाची गरज आहे.’ या उक्तीप्रमाणे डेज् साजरे करा, पण सुरुवात आपल्या कुटुंबापासून करा. घरातल्या घरात एकमेकांना whatsapp वर शुभेच्छा न देता एकदा त्यांना ‘प्यार की झप्पी’ द्या आणि मग बघा चमत्कार ! “प्रेमाने जग जिंकता येत ,शत्रूवर प्रेम करायलासुध्दा मोठ मन लागतं.”

‘प्रेम म्हणजे प्रेमचं असत ,दुसर-तिसरं काही नसतं.’ पटलं का ?


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational