STORYMIRROR

Sakshi ..

Drama Romance

3  

Sakshi ..

Drama Romance

प्रेम?

प्रेम?

11 mins
240

संध्याकाळी सूर्य मावळताना किती छान दिसतो... नाही का! आज खूप दिवसांनी या समुद्र किनाऱ्यावर येऊन सूर्याला मावळताना बघतेय. जवळ जवळ तीन वर्ष झाले असतील मला इथे येऊन. तीन वर्षा आधी तर रोज च यायची मी हा मावळता सूर्य बघायला.पण तीन वर्षा आधी बरोबर याच दिवशी मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद भेटला होता. हो! ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करायची त्याने माझी आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिल होत मला. माझा 'रुद्र'.आज पण आम्ही दोघे बरोबर आहोत. आणि आयुष्यभर....आ आ आ...सॉरी.. जोपर्यंत त्याच आयुष्य आहे तोपर्यंत बरोबर च राहू. हो कारण जास्त दिवस नाहीये ना त्याच्याकडे खूप वाईट वाटत मला. कि नंतर मी एकटीच राहून जाईल. पण जितका तो जगेल मी त्याची खूप नीट काळजी घेईल खूप प्रेम देईल त्याला. जीवपेक्षा पण जास्त जपलय मी माझ्या रुद्र ला. अरे माझा परिचय तर देण्याचं विसरून च गेली. मी पूर्वी.पूर्वी सरदेसाई. लहानपणा पासून जीवशास्त्रात जास्त आवड होती. पण घरच्यांनी ऐकलं नाही सो इंजिनिअर झाले. पण अजून सुद्धा अधून मधून वाचत असते मी Biology .इंजिनिअर झाल्यानंतर काही दिवसात मी इनामदार अँड सन्स कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी मिळवली.


साधारण चार वर्षांपूर्वी ची गोष्ट असेल. जॉब च्या इंटरविव्ह साठी मला इनामदार कंपनी कडून मेल आला होता. इनामदार अँड सन्स शहरातली नावाजलेली कंपनी म्हणून प्रख्यात होती. म्हणून त्यांच्याकडून मेल आल्याचा मला आनंद झाला. आणि मी इंटरविव्ह देण्यासाठी गेले. रिसेप्शन वर चौकशी करून मला एका कॅबिन मध्ये जाण्यास सांगितले गेले. कॅबिन चा दरवाजा उघडताच एसी च्या थंड वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्शून गेली. दारात उभी राहून मी विनम्रतेने विचारले " मे आय कम इन सर?" खुर्ची विरुद्ध दिशेने करून बसलेल्या व्यक्तीने भारदस्त आवाजात येस म्हंटले तशी मी आत गेली. थोडी नर्व्हसनेस तर जाणवत होती पण मी तस काही न दाखवता ठामपणे टेबल समोर जाऊन उभी राहिली.तशी त्या व्यक्तीने खुर्ची माझ्याकडे वळवली. आणि थेट माझ्या डोळ्यात बघून म्हणाला "यू मे सीट मिस पूर्वी". तशी मी थँक्यू म्हणत बसली.त्याने माझी फाईल मागितली आणि त्यात डोकं खुपसून बसत फाईल चाळू लागला. माझी तर नजर च त्याच्यावरून हटत नव्हती बघता क्षणीच मी त्याच्या प्रेमात पडली होती. रुद्र इनामदार असा त्याचा टेबलावर नावाचा टॅग ठेवला होता. त्यावरून मी अंदाज बांधला कि हा इनामदार सरांचा मुलगा असावा. तितक्यात एक व्यक्ती तिथे आली, केस पांढरे होते वय हि बरच झालेलं पण व्यक्तिमत्व अजून हि उठावदार. मी ओळखलं कि हेच मिस्टर इनामदार. त्यांनी येताच रुद्र ला खड्या आवाजात विचारलं,

"रुद्र तू यांना तुझ्या केबिन मध्ये का बोलावलं? तुला माहितीये ना इंटरविव्ह वेगरे तुला नाही घ्यायचंय? ते घेण्यासाठी बरेच लोक आहेत आपल्याकडे."

 त्यावर रुद्र म्हणाला, "डॅड, मी..ते..आपलं."


"बस राहू दे..तू दुसरे काम बघ..यांचा इंटरविव्ह मिटिंग रूम मध्ये होईल." असं बोलून इनामदार सर माझ्याकडे वळले. आणि माझ्याकडे बघून एक स्मित देत म्हणाले,

"प्लिज गो ऍट मिटिंग रूम. तुमचा इंटरविव्ह तिथेच होईल."मी हि ओके म्हणून निघाली. माझा इंटरविव्ह छान झाला आणि मला इनामदार अँड सन्स मध्ये जॉब भेटला. 


आता ऑफिस मध्ये मला एक महिना होत आला होता.आणि माझी सर्वांशी ओळख पण झाली होती छान. आधी कोणी माझ्याशी बोलायचं नाही जास्त. सर्व माझी मजाक उडवायचे.कारण मी एकदम साधी राहत असायची केसांना रोज तेल लावून घट्ट वेणी घालत असे, पंजाबी ड्रेस, आणि डोळ्यांवरचा तो मोठ्ठा चश्मा.दिसायला मी गव्हाळ वर्णी आणि सर्वसाधारणच होती म्हणून कदाचित हे लोक मला बेहेनजी म्हणून चिडवायचे पण मी कधी कोणाचं मनावर घेतले नाही मी आणि माझं काम यातच लक्ष दिलं. मग नंतर नंतर त्यांनाच स्वतःची लाज वाटू लागली आणि एक दिवस सर्वजण येऊन मला सॉरी म्हंटले. त्यानंतर मात्र सर्वच माझे छान फ्रेंड्स बनले. अधून मधून मला रुद्र सरांच्या केबिन मध्ये काही काम असलं की मी आनंदाने जायची. इतक्या दिवसात मी काही गोष्टी खूप बारकाईने बघितल्या होत्या ते म्हणजे पूर्ण कंपनी मध्ये सर्वच केबिन मध्ये सिसिटीव्ही कॅमेरे होते. फक्त रुद्र सरांचीच तेवढी केबिन होती जिथे ते नव्हते. मिस्टर इनामदार पण आठवड्यातून फक्त एकदाच ऑफिसात येऊन कारभार बघायचे कदाचित वय जास्त झाल्यामुळे त्यांना इतके काम झेपत नसावे असा मी अंदाज बांधला.पण ते जेव्हा पण यायचे माझ्या कामावर खूप खुश असायचे.माझ्या कामाच कौतुक पण करायचे. पण माझी इच्छा असायची कि हे कौतुक रुद्र सरांनी करावं. पण कौतुक तर सोडाच ते माझ्याकडे साधं ढुंकून हि नाही बघायचे. कदाचित त्यांना पण मी बेहेनजी वाटत असेल. ऑफिसात कोणी त्यांना मुलींच्या बाबतीत चांगलं म्हणत नसे. ते स्वतः फिमेल कॅण्डीडेट चा इंटरविव्ह घ्यायचे ते मुद्दामच हे मला नंतर कळलं होतं. आणि इनामदारांचा मुलगा त्यात दिसायला हँडसम, गोरा रंग, जिम करून मिळवलेले पिळदार शरीर , राहणीमान, बोलण्याची शैली म्हणून कित्येक मुली त्याचा जाळ्यात सहज फसायच्या हे मला माझ्याच बाजूच्या डेस्क वर काम करणाऱ्या रोझी ने सांगितलं होतं.आणि आधी तर म्हणे ते असल्या गोष्टी त्यांचा केबिन मधेच करायचे हे जेव्हा इनामदार सरांनी पाहिलं तेव्हा खूप मोठा तमाशा झाला होता त्यानंतर खूपदा रुद्र सरांना समजावून पण काहीच उपयोग नाही झाला. शेवटी आपल्या मुलाची करतुद कोणाला कळू नये म्हणून त्यांनी रुद्र सरांच्या केबिन मधले सिसिटीव्ही कॅमेरे काढून घेतले .सुंदर दिसणाऱ्या मुलींवर रुद्र सरांची नजर पायापासून ते डोक्यापर्यंत भिरभिरत असे हे नंतर माझ्या पण लक्षात येऊ लागलं. कदाचित मी दिसायला इतकी चांगली नव्हती म्हणून मी वाचली. मला नाही आवडायचं रुद्र सर जेव्हा इतर मुलींबरोबर फ्लर्ट करायचे. दिवस रात्र त्या मुलींबरोबर राहायचे आणि मला फक्त चहा पाठव कॉफी पाठव या साठीच बोलायचे. पण मी काही करू पण नव्हती शकत.


एक दिवस मी नेहमी प्रमाणे ऑफिस ला गेली. माझ्या डेस्क वर बसली तितक्यात डेस्क वरचा टेलिकॉम वाजला. तिकडून रुद्र सर बोलले "पूर्वी कॉफी पाठव प्लिज." मी पण ओके म्हंटल. पण त्या दिवशी रामुकाका आलेले नव्हते लवकर म्हणून कॉफी मला च घेऊन जाण भाग होत. मी कॉफी घेऊन रुद्र सरांच्या केबिन मध्ये गेले. दरवाजा उघडताच वाईन चा एकदम स्ट्रॉंग वासमाझ्या नाकात शिरला." मे आय कम इन सर" मी विचारलं. "येस प्लिज" समोरच्या सोफ्यावर डोकं धरून बसलेले रुद्र सर मला बोलले. पूर्ण केबिन मध्ये गुलाबाच्या पाकळ्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या सरांचं ब्लेझर एका कोपऱ्यात पडलेलं होत. वाईन चे दोन ग्लास तिथेच टेबलवर पडलेले होते. त्यावरून मला कळून गेलं की कालची रात्र यांनी इथेच कोणासोबत तरी घालवलेली होती. मी इकडे तिकडे बघतच होती की, "पूर्वी तुम्हाला इकडे तिकडे बघायला नाही बोलवलं. द्या ती कॉफी इकडे." रुद्र सर चिडून म्हंटले. "सॉरी सर" मी घाबरतच बोलत त्यांचा हातात कॉफी चा मग दिला. आणि जायला मागे वळली "थांब इथेच." असं बोलून त्यांनी मला तिथेच जवळच्या खुर्चीवर बसायला लावलं. आणि स्वतःला सांभाळत ते माझ्या एकदम जवळ आले माझ्या डोळ्यांवरचा चष्मा त्यांनी काढला. आणि माझे बांधलेले केस मोकळे सोडले. " यु नो व्हॉट तू सुंदर दिसू शकते पण तू राहत नाही.तुला नाही आवडत का इतर मुलींसारखं माझ्या जवळ राहण." माझ्या मनात आलं होतं की बोलू हो मला तुम्ही खूप आवडतात. पण मला माहित होत ते शुद्धीत नाहीये म्हणून असं बोलतायत. तितक्यात केबिन चा दरवाजा उघडला. आणि रामू काकांनी रुद्र सरांना अगदी माझ्याजवळ उभं असलेलं बघितलं. माझे केस मोकळे सोडलेले होते आणि केबिन ची अशी हालत पाहून त्यांना असं वाटलं की काल रात्री त्यांचा बरोबर मी च होती. ते पटकन बाहेर गेले. तशी मी पण सरांची परवानगी घेऊन केस बांधून बाहेर आली. तोपर्यंत बरेच लोक येऊन गेले होते. ऑलमोस्ट सर्वांनीच मला त्यांचा केबिन मधून निघताना बघितलं होत. आणि रामू काकांनी सर्वांना काय सांगितलं देव जाणे.त्यादिवशी पासून सर्व माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागले. रुद्र सरांनी रोज त्यांच्यासाठी कॉफी बनून द्यायची ड्युटी मला दिली होती. आणि एकदा मी रोझी ला पण त्यांचाबरोबर जाताना बघितलं. मी दुसऱ्या दिवशी रोझी ला बोलली पण कि " रोझी तुला माहितीये ना रुद्र सर कशे आहेत तरी तू का त्यांचा मागे लागतेय."

त्यावर रोझी मला म्हणाली," ओह प्लीज पूर्वी तू तरी हे नको सांगू..पूर्ण ऑफिस ला माहितीये तू काय करून आलीये त्याच्याबरोबर.स्वतः करते आणि दुसर्यांना ज्ञान देते."

"मी काय केलंय?" मी रोझी ला विचारलं.

"तुला नाही माहित तू काय केलंय.. गाईझ इकडे बघा या मॅडम म्हणताय कि याना नाही माहित यांनी काय केलं आहे ते." असं बोलून रोझी ऑफिस मधल्या सर्वांना गोळा करून घेते. सर्वजण एकमेकांशी कुजबुजायला लागतात. आणि हसायला लागतात.

"रोझी प्लिज नीट सांगशील का?" मी काहीही न कळून विचारलं.

" सांगते ना..काय ग तू स्वतःला खूप मोठी सतीसावित्री समजणारी..हे असले कपडे घालणारी..तुझी लायकी आहे का रुद्र सरांबरोबर बोलायची तरी..पण मॅडम ने मात्र रात्र घालवली संपूर्ण त्यांच्यासोबत. शेवटी हि पण अशीच निघाली मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली. बर कडी पण लावायची विसरून गेली म्हणून रामू काकांनी बघितलं या दोघांना. नाहीतर हि अशीच ढोंग करत असती." रोझी च्या अश्या बोलण्यामुळे मला खूप वाईट वाटलं. सर्व जण माझ्यावर हसत होते.

"असं काही नाहीये तुम्हा लोकांचा काही गैरसमज होतोय. त्या दिवशी मी नव्हती तिथे रात्री..." मी सर्वांना समजवायचा प्रयत्न करत होती रडत होती. पण कोणीच माझं ऐकायला तयार नव्हत. शेवटी मी रुद्र सरांकडेच गेली. दरवाजा न वाजवता केबिन मध्ये घुसली. ते कदाचित त्यांना आवडलं नाही कारण ते एका मुलीसोबत रंग उधळत होते आणि मी मात्र बाहेर काय काय नाही ते ऐकत होती. ते मला रागात बोलले ," मिस पूर्वी डु यू हॅव सम मॅनर्स..असं न विचारता आत येन शोभत का तुम्हाला. आता च्या आत जा इथून."

"सर प्लिज माझं ऐकून घ्या..खूप महत्त्वाचं आहे." मी त्यांना विनवणी करून म्हंटल.

"हम्म बोला." काहीशा अनिच्छेने च ते बोलले.

"सर प्लिज बाहेर चला आणि सर्वांना सांगा..त्या दिवशी रात्री इथे तुमचाबरोबर कोण होत ते."मी बोलली

"तुझं डोकं तर ठीक आहे ना..एम्प्लॉय आहे एम्प्लॉय सारखी रहा..माझ्याबरोबर कोण होत कोण नाही हे या लोकांना सांगण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. आणि मी मुळात यांना का सांगू?" रुद्र

"सर प्लीज सांगा. ते सर्व माझ्यावर डाऊट घेताय कि त्या दिवशी मी इथे होती तुमच्यासोबत" मी

"तू.....हा हा हा...मी आणि तुझ्यासोबत..त्याना म्हणा लायकी आहे का पूर्वी सरदेसाई ची माझ्या सोबत रात्र घालवण्याची.. तुझ्याकडे ढुंकून बघतो तरी का मी कधी." रुद्र सरांचं असं बोलणं ऐकून मला फार वाईट वाटलं पण मी काही बोलली नाही आणि त्यांना येण्यासाठी विनवत होती पण ते नाही आले. बाहेर मिस्टर इनामदार सर्व ऐकत होते. त्यांनी मला बघितलं. आणि करूण भावनेने माझ्या डोक्यावर हात ठेवला व म्हंटले.," आय नो मिस पूर्वी तुम्ही असं काहीच केलेलं नाही..पण या लोकांना आणि रुद्र ला तुम्ही नाही समजावू शकत तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे." त्यांचे ते शब्द ऐकून मला खूप हिम्मत भेटल्यासारखं वाटलं. मी पुन्हा आधी सारखी च माझं काम करू लागली. रुद्र सरांचं नेहमी सारखं च रंग उधळण चालू होत. मला नाही आवडायचं ते कारण माझं अजूनही त्यांच्यावर प्रेम होतच.


दिवसांमागे दिवस जात होते. अचानक एके दिवशी रुद्र सर ऑफिस ला येण्याचे बंद झाले. सर्व विचारू लागले. पण कोणाला च काहीच माहित नाही. त्यांचा एक मित्र रोज सर्व कंपनी चे काम बघू लागला. बऱ्याच दिवसांनी मिस्टर इनामदार ऑफिस ला आले.मी त्यांना भेटायला आणि एका फाईल च्या संदर्भात बोलायला. त्यांचा केबिन मध्ये गेली. त्यांच्याकडे बघून असं वाटत होत की ते खूप थकलेत. चेहऱ्यावरचं तेज नाहीस झालं होतं. अंगात त्राण हि इतका उरला नव्हता. मी त्यांना आधी त्यांचा तब्येती ची विचारपूस केली ते बोलले कि ठीक आहेत. नंतर फाईल बद्दल बोलणं झालं. मग मी त्यांना रुद्र सरांबद्दल विचारलं त्यांनी सांगितलं की रुद्र सरांना एक गंभीर आजार झालाय. एकाएकी त्यांचे केस गळू लागले होते. त्यांची बॉडी आता आधीसारखी नव्हती राहिली. ते एकदम बारीक होऊन गेले होते. त्यांना खूप डॉक्टर दाखवले. पण सर्व डॉक्टर बोलले कि त्या व्हायरस चा इलाज सध्या तरी भारतात नाहीये. म्हणून त्यांना अमेरिकेला नेण्यात आले देश विदेश चे डॉक्टर करून झाले पण सर्व बोलले कि लास्ट स्टेज आहे. थोडं लवकर आणलं असत तर काही करता पण आलं असत आता त्यांच्याकडे जास्तीत जास्त ८ वर्षे आहे. असं बोलून सर्वांनीच हात वरती केलं. रुद्र सर मात्र खूप खचून गेले ज्या रूपाचा त्यांना गर्व होता तेच गेलं म्हणून ते आता फक्त रूम मध्ये स्वतःला कोंडून असतात. मिस्टर इनामदार म्हंटले कि, " मला नाही माहित मी आता किती दिवस जगेल पण मी गेल्यानंतर रुद्र कडे कोण लक्ष देईल. माझी सध्याची परिस्थिती बघून मला नाही वाटत कि मी जास्त जगेल." त्यांचं असं बोलणं ऐकून मला फार वाईट वाटलं. खरंच खूप त्रास होत होता त्याना या वयात. मी त्यांना काळजी नका करू सर्व ठीक होईल म्हणून निघून गेली.

घरी आल्यावर एका एकी माझ्या मनात काय आलं माहित नाही. पण मी तडक इनामदारांच्या घरी गेली. रुद्र सर आणि मिस्टर इनामदारांच्या समोर रुद्र शी लग्न करून मी त्याचा सांभाळ करेल अस आश्वासन त्यांना दिल. मिस्टर इनामदारांच्या डोळ्यात तर अश्रू होते. त्यांनी लगेच होकार दिला. पण रुद्र सर त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर मला भेटायला बोलवले. मी तिथे जाऊन रुद्र सरांना शोधू लागली. तर तिथे साईड ला च रुद्र सर उभे होते पण त्यांनी कॅप घातली होती म्हणून ते लक्षात नाही आले माझ्या लवकर. मी त्यांच्याकडे गेल्यावर ते मला सर्वप्रथम तर सॉरी बोलले.

"सॉरी पूर्वी मी तुझ्याबरोबर खूप वाईट वागलो. तुझ्या दिसण्यावरून मी तुला बोललो पण तुझं मन खरोखर सर्वात सुंदर आहे.पण तुझा हा लग्नाचा निर्णय मला पटत नाहीये. तू माझ्यासाठी तुझं आयुष्य का खराब करतेय? तुला कोणी पण चांगला जोडीदार भेटेल. आणि मला नाही आवडणार कोणी माझ्यावर दया दाखवून माझ्या बरोबर लग्न केलेलं." रुद्र सर बोलले.

"सर..पहिली गोष्ट ही कि मी कोणावर दया वेगरे नाही दाखवत आहे..तुमच्यावर तर मुळीच नाही.. तुमच्याशी लग्न करायचं कारण हे कि मी खरंच तुमच्यावर प्रेम करते खूप..मी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला बघितलं होत तेव्हा च तुमच्या प्रेमात पडली होती. आणि अजून पण तितकंच प्रेम करते." मी बोलली.

"पण आता तर मी दिसायला पण चांगला नाही राहिलो." रुद्र सर.

" प्रेम कोणाच्या रंग रुपावरून नसत होत सर." माझं असं बोलणं ऐकून रुद्र सरांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांनी मला मिठी मारली. पुढच्या एकाच महिन्यात आमचं लग्न झालं. लग्नानंतर पण मी रुद्र सरांना सर च म्हणायची म्हणून नंतर त्यांनीच मला बजावलं प्रेमाने कि आता मला फक्त रुद्र म्हण म्हणून. थोडया दिवसात बाबांनी आणि रुद्र ने मिळून इनामदार अँड सन्स माझ्या नावावर केली. मी त्यांना खूप नाही म्हंटल पण ते ऐकलेच नाही. ज्यांनी माझी ऑफिसात बेज्जती केली होती. ते मी दिसताच मान खाली घालुन उभं राहतात. आयुष्य खूप चांगलं चालल आहे. आज आमच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस. रुद्र काहीतरी सरप्राईज प्लॅन करतोय घरी म्हणून त्याने मला बाहेर पाठवून दिल. मग मी आली या समुद्र किनाऱ्यावर. आणि अचानक भूतकाळ आठवायला लागला.

रुद्र. किती प्रेम करतो माझ्यावर.बाबांचा पण किती विश्वास आहे माझ्यावर. माझं पण खूप प्रेम आहे रुद्र वर. म्हणून मला बिलकुल नाही आवडायचं रुद्र जेव्हा तू त्या मुलींच्या जवळ असायचा. तू फक्त माझाच होता. मला लहानपणापासून सवय आहे जी गोष्ट माझी ती मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते. तुला मिळवण्यासाठी पण मी काहीही करू शकत होती. तुला मी रोज कॉफी बनून द्यायची ना. त्या दिवशी कॉफीत गुंगीच औषध मी च मिळवलं होत आणि नंतर तू बेशुद्ध झाल्यावर त्या व्हायरस च इंजेक्शन मीच तुला दिल होत.तुझ्या केबिन मध्ये सिसिटीव्ही नसल्याचा फायदा मला पण झाला. Biology मध्ये मला असं पण आवड होती म्हणून मी बऱ्याच वेळा वाचत बसायची. आणि एक दिवस वाचताना अचानक च मला या व्हायरस बद्दल समजलं. आय एम सो सॉरी रुद्र पण माझं प्रेम होत ना तुझ्यावर तुला मिळवण्याचा हाच एक मार्ग होता माझ्याकडे मग भलेही तुझं आयुष्य ८ वर्ष का असेना. तुला मी इतका कमजोर बनून टाकलं कि तुझ्याकडे मला होकार देण्याशिवाय दुसरा रस्ताच नाही सोडला मी. सॉरी बाबा तुमचा पण खूप विश्वास आहे माझ्यावर पण तुमच्या मुलाची हि हालत माझ्यामुळेच आहे. मला सर्व मान्य आहे पण रुद्र कोना दुसरीकडे गेलेला नाही कारण रुद्र फक्त पूर्वी चा च आहे.तू फक्त माझाच म्हणून जगशील आणि माझाच म्हणून मरशील. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय डिअर रुद्र!!


Rate this content
Log in

More marathi story from Sakshi ..

Similar marathi story from Drama