प्रेम प्राप्ती
प्रेम प्राप्ती


स्नेहा ही अतिशय गोड, स्वभावाने देखील मनमिळाऊ अशी सर्वांना आवडणारी मनमोहक मुलगी होती. खरं तर तिची आई तिच्या या गोड स्वभावामुळे तिचं पुढे कसं होणार. यासाठी खूप विचार करायची. स्नेहाने जशी सोळाशी गाठली, तसे तिच्या आईने तिची खास काळजी घ्यायला सुरुवात केली.
स्नेहा महाविद्यालयात शिक्षणासाठी जाऊ लागली. तेव्हाच कसे कोणास ठाऊक पण आईची ही गोड गुलाबी राजकन्या एका आदित्य नावाच्या मुलाच्या प्रेमात पङली. अभ्यासात अतिशय हुशार असणारी स्नेहा पुढे अभ्यासाकडे दुर्लक्ष करू लागली. आदित्य हा देखील स्वभावाने अतिशय मनमिळाऊ, सालस असा देखणा होता. आईचे स्नेहा कडे चांगलेच लक्ष होते. स्नेहाला आईने समजावले की, पहिले तू करिअर कडे लक्ष दे. परंतु ती काही फार मनावर घेईना. म्हणून मग तिच्या आईने तिचे महाविद्यालय बदलले.
स्नेहा आणि आदित्य शेवटी करिअरसाठी एकमेकांपासून दूर झाले. आदित्य आपल्या करिअर साठी अमेरिकेत निघून गेला. स्नेहाने देखील आपले इंजिनिअरिंग मुंबई मध्ये पूर्ण केले. स्नेहा व्यवस्थित तिच्या करिअर मध्ये स्थिर झाल्यानंतर तिच्यासाठी स्थळे पाहायला सुरुवात केली. परंतु स्नेहाच्या पत्रिकेत मात्र मंगळ असल्याने तिचे कुठे जमून येत नव्हते. शेवटी पाहुण्यांनी "जुळून येती रेशीमगाठी "या विवाह संस्थेतून आलेले स्थळ सुचविले. तर ते स्थळ दुसरे कुणाचे नसून आदित्यचे होते. महाविद्यालयात असताना दोघांची एकमेकांशी ओळख होती. म्हणून सुरूवातीला दोघांच्याही घरच्यांनी विरोध केला. परंतु मुलगा अमेरिकेत राहतो. त्याचबरोबर स्नेहा प्रमाणे आदित्यच्या पत्रिकेत देखील मंगळ होते. त्यामुळे भटजींच्या सल्ल्यानुसार स्नेहा आणि आदित्य यांनी घरच्यांची समजूत काढत शेवटी घरच्यांचे मन जिंकले. करिअरसाठी एकमेकांपासून ताटातूट झालेले हे दोन प्रेमवीर शेवटी सात जन्मांच्या रेशीमगाठीत बांधले गेले.
शेवटी आई - वडिलांची लाडकी गोड राजकुमारी एका देखण्या राजकुमाराची राणी बनली.