Sumit Mhatre

Romance Others

4  

Sumit Mhatre

Romance Others

प्रेम कधीही होऊ शकते......

प्रेम कधीही होऊ शकते......

11 mins
473


एक अस नात कधी जुळल समजलं नाही.......

ही कथा आहे सुमित आणि दिव्याची दोघेही विरूद्ध स्वभावाचे एक एकटा राहणारा आणि एक सगळ्यात मिळून मिसळून राहणारी. दिव्याच्या येण्याने सुमित च्या आयुष्यात घडणारा बद्दल,हाच प्रश्न सांगतो की तुझ आणि माझ नात काय ?

दिव्याच्या मामांच निधन झाल्या कारणाने दिव्याच्या आई आणि बाबांना गावी जाव लागणार होत पण दिव्याची परीक्षा सुरू झाल्या कारणाने तिला नाही नेल. दिव्या सकाळीच क्लासमध्ये गेली होती म्हणून घराची चावी शेजारी राहणाऱ्या सुमित पाशी दिली.मामा गेल्याची बातमी दिव्याला समजली होतीच,आणि आता तिला एकटीला रहावं लागणार आहे हे तिला समजल.

सुमित आई, वडील,बहीण,यांच्या पासून दूर रहात होता. त्यांनी कधी फोन कॉल करून ही त्यांची खबर बात विचारली नव्हती. कधी कोणी मित्रं परिवार ही त्याच्या घरात आला नव्हता ना कधी तो कोणाशी बोलत होता.असा माझा शेजारी आहे तर मी पूर्ण मजल्यावर एकटी आहे हा विचार तिला येत होता आणि थोडी भीती वाटत होती.

क्लास मधून दिव्या आली. सुमितच्या दरवाज्याची बेल वाजवली.सुमित नी दरवाजा उघडला आणि बगितल आणि विचारल की काय काम आहे. तर ती म्हणाली की चावी हवी होती.तो माफ करा हा मी देतो,घरात गेला पाच मिनिट झाली पण तो काही आला नाही,तर दिव्याच आत आली.घरात पडलेला पसारा पहिला तिने,चप्पल बूट असेच टाकलेले,कपडे सोफ्यावर टाकलेले,ती मनातल्या मनात म्हणाली की काय वेंधळा आणि आळशी आहे हा माणूस. पण चावी सुमित ल भेटत नव्हती, तो म्हणाला बसा ना मी देतो चावी इथेच असेल.तो पुटपुटला ती कपडे सरकवत सोफ्यावर बसली.टेबल वर एक फ्रेम होती जी उलटी ठवली होती,दिव्यानी ती सरळ करून पाहिली तर ती सुमितची फॅमिली फोटो होती.तिला वाटलं की ती पडली असावी कदचित तितक्यात सुमित आला चावी घेऊन. चावी दिली आणि दिव्यानी सरळ केलेला फोटो पुन्हा उलटा केला दिव्याने पाहिलं. पण चावी दिली आणि सुमित नी तिला जाण्याचा इशारा केला.पण कोणी आपली फॅमिली फोटो उलटी का करेल हा प्रश्न मात्र तिच्या मनात आला. संध्याकाळ झाली होती अंधार पडायला सुरुवात झाली,आणि तितक्यात लाईट गेली. दिव्या किचन मध्ये होती ती स्वयंपाक करत होती. लाईट आता येईल हा विचार करत होती.पण लाईट काय आली नाही,तर तिने विचार केला की सुमित बरोबर काही गप्पा मारू आजच चांगली ओळख झाली आहे, मैत्री पण करू.तर ती गेली,सुमित बोलला की काय आहे मी मेस वर जात आहे जेवण करायला तर चावी माझ्याकडे देऊ नका.तर ती म्हणाली की मी जेवण बनवला आहे.आपण करू की जेवण सोबत. तो म्हणाला नाही नको उगाच तुम्हाला त्रास... मी जातो मेस मध्ये. तर तिने त्याला नाही जाऊ दिले.सुमित चा नाईलाज झाला आणि थांबला. दोघांनी जेवण सोबत केलं,लाईट अजून आली नव्हती.म्हणून ती म्हणाली थांबू . एकडे लाईट आली की जाईन घरी. सुमित अवघडून हो म्हणाला. तिला समजला पण ती थांबली, मेणबत्तीच्या त्या प्रकाशात शांतता पसरली होती. दिव्याने पुढाकार घेत विचारल,की तुम्ही फॅमिली फोटो उलटा का ठेवलाय.सुमित म्हणाला काही प्रोब्लेम आहे का? तर ती म्हणाली अस काही नाही.नाही सांगायचं तर नका सांगू पण माझ्यावर चिडू नका.

सुमित माफ करा.

दिव्या- नाही तस नाही.मलाच माफ करा.

          मीच तुम्हाला प्रश्न विचारायला नको होता.

सुमित- नाही मी माझ्या घरच्यांना सोबत संबंध तोडले आहेत.

            जवळ जवळ १० वर्ष झाली.मी त्यांची आणि त्यांनी

           माझी विचारपूस नाही केली.

दिव्या -पण का अस काय झालं की तुम्ही नातच तोडल?

सुमित - ती खूप मोठी गोष्ट आहे आणि काय झालं?का झालं?

         कोणी केलं? यापेक्षा मोठा प्रश्न आहे की आपण काय

           करू शकतो.हो ना

दिव्या - बरोबर आहे तुमचं पण परिस्थिती निर्माण का झाली ?

       आपण बदलू शकतो का ?हा पण विचार करायला हवा

सुमित - आधी ते तुम्ही आम्ही बोलण बंद कर,अरे तुरे कर.

दिव्या - हो चालेल ना.

सुमित - तू बोलतेस ते खरं आहे पण नाण्याला दोन बाजू

          असतात.

दिव्या- हो ते तर आहे.पण मी एक विचारू जर तुला राग

          नाही आला तर?

सुमित - हो विचार नाही येणार राग आता

दिव्या- तुझा कोणी मित्र नाही आहे का ज्यांनी तुला सांगायला

         पाहिजे होत की तू कुठे आणि काय चूक करतोय

सुमित - हे बघ दिव्या या जगात सगळ्यात सवस्त सल्ला आहे

          ते कोणीही देत.पण महाग आहे ती मदत कोणी तरी

            करत.

दिव्या - हे तर तू बरोबर बोलास सुमित. पण तू कधी विचार

          केला आहेस का की तुझ्या जाण्याने किंवा अस 

            करण्याने त्यांची काय अवस्था झाली असेल.

सुमित- कोणाचं माहित नाही पण आई बद्दल खूप वाट की

          आता धावत जावं घरी आईला कवटाळून खूप

           रडाव.पण नाही होत आता हिम्मत तिच्या समोर

           जाण्याची...

घरात शांतता होते, दिव्या काही बोलणार इतक्यात लाईट येते. सुमित लगेच म्हणतो की चल लाईट आली आता तू घरी जा उद्या परीक्षा आहे ना तुझी स्टडी करायची असेल ना उशीर झालंय.सर्व आवरून दिव्या घरी जाते.घरात येते आणि फक्त सुमितचा विचार करत असते.दिव्या तशी हुशार स्टूडेंट असते म्हणून तिला परीक्षेचं जास्त टेन्शन नसत.ती स्वतःशी बोलत असते की काय हा मुलगा आहे.मनात किती दडून ठेवलंय.त्याला यातून बाहेर काढावं लागेल.पण कसं हा खूप मोठा प्रश्न होता.दिव्या झोपली.सकाळी लवकर उठून कॉलेजल जात असता बगीतला की सुमित कुलूप लावून सकाळीच कुठे तरी गेलाय.ती घाईत होती, अन् ती गेली.

दुपारी येताच बगितल तरी सुमित आला नव्हता.तिला अस वाटत होत की सुमित त्याच्या नावाचा विरूद्ध आहे.अस नाही होऊ शकत.काही तरी त्याच्या आयुष्यात झालं असावं. म्हणून तो तसा झाला असावा.असाच राहिला तर तो डिप्रेशन मध्ये जाईल नाही नाही अस नाही झालं पाहिजे तो खूप चांगला मुलगा आहे तो.अस ती स्वतःशी बोलत होती.दुसऱ्या दिवशी शेवटचा पेपर होता.तो झाला आणि दिव्या खूप आनंदी झाली आणि आता फक्त सुमितला एकटे पणातून बाहेर काढायचं की हे जग किती सुंदर आहे ते दाखून देयायच हेच तिचं ध्येय होत. दिव्या जिद्दी होती.तिने सुमित चा फॅमिली फोटो बगितला होता. सोशल मीडिया वर ती सर्च करत होती सुमित नी त्या रात्री तिला त्याच्या बहिणीच नाव सांगितला होत.ती शोधत होती.आणि सुमित ची बहिण निधी तिला मिळाली. निधी ची प्रोफाइल उघडताच तिचा कव्हर फोटो दिव्याने पाहिलं आणि तिला विश्वास झाला की हीच ती निधी.

दिव्याने पाहिलं की निधी ही तिच्या एका मैत्रिणीची मैत्रीण आहे.तिने तिला कॉल लावला. हॅलो प्रिया एक काम आहे तुझ्या कडे मला लगेच भेट कॉफी कॅफे मध्ये.

प्रिया- बोल काय झालं.इतक्या घाईत बोलवलास.

दिव्या -हो.अग तू या निधी का ओळखतेस का?

प्रिया -अग कोण निधी?

दिव्या -अग ही बग ना तुझी फ्रेंड आहे ना फेसबुक वर

प्रिया - अग ही होय हा माझी मैत्रीण आहे ती आम्ही एका

        कलास मध्ये होतो.पण तू का विचारतेस?

दिव्या काही नाही.तिचा नंबर आहे का तुझ्या जवळ असेल

         तर मला दे.मला काम आहे तिच्या कडे.

प्रिया- पण काय काम आहे ते तर सांग.

दिव्या - हो सांगेन नंतर तुला आधी नंबर दे.

प्रिया - हो हा घे नंबर.

दिव्या- थँक्यु प्रिया

प्रिया - चल बाय.

दिव्या = तीथून घरी येते.आणि निधी ला फोन लावते. हॅलो निधी का ?

निधी- हो पण आपण कोण?

दिव्या - मी दिव्या आपण एकमेकांना ओळखत नाही.पण

         तुझ्याशी काही तरी बोलायचं आहे.

निधी- हो बोल ना दिव्या काय बोलायचं आहे.

दिव्या- थोड वैयक्तिक बोलायचं होत.

निधी - हा बोल ना

दिव्या- सुमित बद्दल बोलायचं होत थोड.

सुमित च नाव ऐकताच निधी नी शब्ध झाली. काही न बोलताच फोन कट केला. दिव्याला काही समजला नाही की निधी नी फोन कट का केला. पण तिने परत कॉल नाही केला.

निधी ला अश्रू अनावर झाले कारण तब्बल १० वर्षा नंतर तिने भावाच नाव ऐकल होत.निधी बाजारात होती ती तीतून ती थेट घरी आली.घरी येत असताना तिला खूप प्रश्न पडत होते.कोण ही दिव्या आणि तिला सुमित बद्दल काय माहित आहे.तिला काय बोलायचं होत. तिला काही समजल नाही.

शेवटी निधीनी दिव्या ला कॉल लावला.

दिव्या - हा बोल निधी तू बरी आहेस ना, मगाशी तू फोन कट

          केलास, मला तुला दुखवायचं नव्हत.

निधी - अस काही नाही दिव्या. खूप वर्षा नंतर सुमित दादा च  नाव ऐकलं ना. तुला कसं माहित सुमित बद्दल,तू

     ओळखतेस का त्याला? कुठे आहे तो मला सांग ना

        मला भेटायचं आहे त्याला? कसा आहे तो.

दिव्या- हे सगळं फोन वर सांगता नाही येणार.आपण भेटू या

        आणि बोलू या .

हे ऐकुन निधीला थोडा धीर मिळतो.दोघी भेटतात निधी काही बोलण्याआधी दिव्या बोलते.मी कोण आहे.मी त्याला कसं ओळखते,तो कुठे आहे आणि कसा आहे ते मी तुला सगळ सांगिन पण आधी तू मला सांग सुमित चा भूतकाळ .

निधी - अग सुमित अगदी त्याच्या नाव सारखा होता.कोणालाही एका भेटीत मित्र बनवायचा. खूप बोलका, दुसऱ्यांना हसवणारा,छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधणारा असा होता माझा दादा.मनात खूप दुःख असेल पण चेहऱ्यावर नेहमी हसूच असणार.तो जे काही करत होता ते बाबांना कधी पटल नाही मी लहान म्हणून तो मला काही सांगत नव्हता.पण मला समजत होत,त्याचा एक मित्र होता,सर्वेश नावाचा तो त्याच्या लाईफ मध्ये आला आणि सुमित च आयुष्य बदलून गेलं.सुमित आणि सर्वेश नी एक बिझीनेस सुरू करायचं ठरवलं.सर्वेश आधी पासून पैसे वाला होता.दादा नी कर्ज काढून बिझीनेस सुरू केला सायबर कॅफे खोलला. सुरुवात खूप चांगली झाली,इन्कम पण खूप चांगली होत होती.पण सुमित च नाव जास्त झालं होत.सर्वेश दारू खूप पियायचा.दादा च सर्व बिझनेस सांभाळायचा.दादांनी कधी लबाडी नाही.केली सर्वेश आयत पैसे घेयायचा.सर्वेश ची नजर दादा ची प्रेयसी नीता वर होती.ती ही तशीच होती जिथे पैसा तिथे जात असत हे सर्वेश ला कळून चुकल होत त्याने तिच्या सोबत मिळून एक कारस्थान रचला. दादा कडून नीता नी एका पेपर वरती सही घेतली.तो असा पेपर होता की पूर्ण बिझीनेस हा सर्वेश च्या नावी झालं. दादा ला काही माहित नव्हत.दादा नी एकदा नीता आणि सर्वेश ल एक साथ बगीतल होतं नीता वर जो विश्वास होता तो तुटला त्याने नीता सोबत सगळे संबंध तोडले.आणि सर्वेश जवळ सायाबर कॅफे चा ५०% मागू लागला होता.दादा चे सर्व मित्र जमा झाले पण ती कागदपत्रे समोर आली ज्यावर नीता ने दादा ची सही घेतली होती. दादा ला काही समजला नाही की काय करू आधी प्रेमात धोका आणि मग दोस्ती मध्ये धोका दादा पुरता तुटला होता त्याने सगळ्यांशी बोलण सोडून दिला.घरी समजल बाबा खूप चिडले होते,त्यांनी मारल सुद्धा पण दादा काही नाही बोलला.दादा नी दिवस रात्र मेहनत करून कर्ज फेडला कारण कर्ज बाबा नी मिळून दिला होत.कर्ज फेडल हे बाबा ना कंपनी मध्ये समजल,बाबा खुश झाले की दादा आता नव्याने उभा राहील अस सर्वांना वाटलं.पण तस काहीच झालं नाही.आई खूप खुश होती सगळं जेवण दादा च्या आवडीच बनवल होत दादा चे सगळे मित्र घरी आले होते.की आता तरी सुमित बोलेल पण त्या दिवशी दादा घरीच नाही आला त्या दिवसा पासून ते आज पर्यंत आई वाट बगते त्याची की तो येईल.पण तो नाही आला हा आहे त्याचा भूतकाळ.

हे सर्व ऐकुन दिव्याला शॉक बसला.की सुमित काय होता आणि काय झाला.निधी मी तुला कॉल करून आणि तुझी आणि सुमित ची भेट घडून देईन तू काळजी नको करुस. तू आता घरी जा आणि कोणाला काही सांगू नकोस. दिव्या घरी आली. सुमित घरी आला होता कामा वरून तिने दोघांचं जेवण बनवलं आणि गेली सुमित च्या घरी.सुमित म्हणाला की दिव्या उद्या पासून तू तुझ जेवण करत जा माझ्या साठी नको बनवत जाऊस.ती म्हणाली माझ्या हातच जेवण छान नाही होत मला माहित आहे पण मला एकटीला जेवण जात नाही ना.

सुमित एकट जेवन्याची पण सवय करून घे,जस आज आहे.तस उद्या नाही राहणार.

दिव्या एका वयक्ती साठी मी माझ लाईफ का बदलू .

सुमित का नाही सांगू शकत पण बदलते नाहीतर बदलावी

          लागते.

दिव्या मोर नाचताना सुद्धा रडतो आणि

         राजहंस मरताना सुद्धा गातो, दुःखाच्या रात्री झोप कोणाला लागत नाही आणि आनंदाच्या रात्री झोप कोणाला येत नाही.यालाच जीवन म्हणतात.

सुमित वाह!क्या बात है,खूप सुंदर बात सांगितलस तू

          पण रिअल लाईफ मध्ये अस नसत.

दिव्या असा आपण विचार करतो म्हणून नसत.

सुमित तुझा आत्मविशवास खूप छान आहे.

दिव्या कोणा एका साठी आयुष्य बदलून जात संपंत तर 

          नाही ना...

सुमित ते तर आहे पण .......

दिव्या पण काय सुमित

सुमित जेव्हा आपल्या लाईफ मध्ये असा प्रसंग येतो तेव्हा

          कळत नाही की काय करायचं आहे सारे कळत

          नकळतच घडते

दिव्या तुला कधी प्रेम झालय का?

सुमित हा झालंय ना

दिव्या कोण होती ती...

सुमित जाऊ देना सोड कोण होती ते

दिव्या म्हणजे तिच्या साठी तू लाईफ मध्ये बदलास ना तू पण

         ना तुला माहित आहे का सगळेच अस नसतात ना

सुमित पण मला या विषयावर नाही बोलायचं तू जा इतून

दिव्या नाराज होत तीतून निघून जाते.सुमितला ही खूप वाईट वाटत होत की दिव्या ला तो अस म्हणाला. दोन दिवस झाले दिव्या आलीच नाही सुमित ला पुन्हा एकट वाटत होत.स्वतःशी बोलत होता.त्याला कळून चुकले होते की,जेव्हा मन दुखावत,कोणीच साथ देत नसत,तेव्हा आपल्याला साथ देणारी व समजून घेणारी व्यक्ती आपल्या साठी खूप खास असते.सुमित ला दिव्याचा सहवास हवाहवसा वाटू लागला होता. दुसरीकडे दिव्यांनी निधी ला सर्व काही सांगितले आणि वचन दिले की आज काही ही झालं तरी सुमित घरी आईला कॉल करेल. निधी खूप खुश झाली कारण आज आईचा वाढदिवस होता आणि दादाचा फोन येणार या पेक्षा मोठ गिफ्ट काय असणार.

दिव्या घरी येते तोच सुमित पण येतो माफी मागतो.दिव्या त्याला सांगते की दोस्ती मैं चलता है सब.सुमित नी ठरवलं होत की मी आज सगळ काही सांगून टाकीन दिव्याला. कदचित सुमितला ज्या मित्राची गरज होती त्या मित्राला त्यांनी दिव्या मध्ये बघीतलं होत. दिव्याला सर्व काही सांगून टाकलं काहीच नाही ठेवलं जे तिला आधी पासून माहित होत.

सुमित- सांग आता मी काय करू?

दिव्या - मला आता का तू सगळ सांगितलं आणि मी काय

          सांगू

सुमित- कदाचित ज्या मित्राची गरज होती मला तो मित्र तुझ्यात दिसला.

दिव्या - मला सांग जे तुझ्या सोबत घडल त्याचा त्रास स्वतःला

          करून घेतलास तर घेतलास यात तुझ्या आई आणि बहिणीची आणि बाबा ची चूक काय होती.तू का त्यांना सोडून एकटा राहिलास.

सुमित= चुकलंच माझ सर्वेश नी जे काही केलं त्यातून मी

           कधीच उभा राहिलो.पण नीता ने जे काही केलं त्यातून मी आज पर्यंत उभा राहू शकलो नाही.

दिव्या- हीच तुझी मोठी चूक आहे.तो बग फोन आईला लाव फोन बोल तिच्याशी आणि घे चूक सुधारून...

सुमित- हो आज आई चा वाढदिवस पण आहे.

दिव्या - आठवण आहे वाट...

सुमित कॉल करतो आई फोन उचलते.

आई हॅलो हॅलो कोण आहे बोलत का नाही आहे हॅलो

सुमित (थरथरत्या आवाजात)हॅलो आई

दोघेही शांत बसतात पोराचा आवाज ऐकू न त्या माऊलीला रडू आवरत नाही.इकडे सुमित च्या सुद्धा डोळ्यात पाणी अन् चेऱ्यावर हसू .निधी आणि दिव्याची ही काही वेगळी स्थिती नव्हती.

दिव्याच्या चेहेऱ्यावर एक तेज होत आणि समाधान होत .की एका आईला तिचा मुलगा,एका बहिणीला तिचा दादा,एका बापाला त्यांचा मुलगा परत दिल्याचा.......

सुमित च्या मनात दिव्याने एक जागा निर्माण केली.दिव्या ही सुमित च्या प्रेमात पडली होती.पण आधी बोलणार कोण हा प्रश्न होता.

सुमित दिव्याला घेऊन त्याच्या घरी आला.सर्व खुश होते.या१०वर्षात सुमित खूप पुढे गेला होता. स्वतःच फ्लॅट घेतला होता. बाबाच स्वप्न त्यांनी पुर केलं होत.सुमित च्या

आईला तर दिव्याला कुठे ठेऊ अस झाल होत तुटलेलं कुटुंब हरवलेलं मंन हे तिने शोधल होत.

सुमित आणि दिव्या घरी येताना सुमित ची फॅमिली ही आली घर बगून आनंदून गेले. दिव्याच्या आई - वडीलांना पोरीच करावं तितकं कौतुक कमी वाटत होत.

त्यात सुमित च्या आई नी दिव्याला लग्नाची मागणी घातली.

दिव्या साठी सुमित पेक्षा जास्त कोण योग्य ठरणार नाही,म्हणून लग्न फिक्स केलं दोघांचं........

प्रेम कधीही होऊ शकत..


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance