प्रेम आणि सेवा
प्रेम आणि सेवा
एका लहानशा खेड्यात, नंदन नावाचा शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात सुंदर फुलझाडं होती, पण त्याच्या कामात आनंद नव्हता. एके दिवशी, शेतात एक लहान पक्षी जखमी अवस्थेत सापडला. नंदनने त्याला घरी नेऊन त्याची काळजी घेतली. पक्षी बरा झाल्यावर रोज त्याच्या खिडकीवर येऊन गोड गाणं गात होता. नंदनला आता कामात आनंद वाटू लागला. काही दिवसांनी, पक्ष्याने नंदनला एका जादूच्या फुलाबद्दल सांगितलं. ते फूल शेतात लावल्यानंतर फुलांच्या सुगंधाने खेड्याचे जीवन बदलून गेले. सगळीकडे आनंद पसरला. नंदनला कळलं की प्रेम आणि सेवा हाच खऱ्या समाधानाचा मार्ग आहे.
दिपांजली
दीपा शिंपी गुजरात
