पिरेम
पिरेम
छत्रीच्या तारेमधून पडलेला टूब् असा आवाज आणि धो धो
कोसळत असलेला पाऊस त्यात कुरर् कूरर् गेट मागे येत आहे.
कुणीतरी पळत पळत येतोय आणि गुडघ्यावर पडत हंबरडा फोडला.
एवढ्यात स्वप्नांच्या पावसात ओला चिंब झालेला 'मुकूंद'
खडबडून जागा झाला .घड्याळात सकाळचे साडेनऊ वाजले होते. नववीची उन्हाळी परीक्षा संपली आणि दहावी चे उन्हाळी वर्ग सुरू झाले होते) शाळेचा पहिलाच दिवस)
त्या दिवशी मला खुप उशीर झाला होता. भूमितीचा पहिला तास संपायला फक्त पाच मिनिटे उरली होती. तेवढ्यात मी वर्गात डोकावून 'मी आत येऊ का?' असे उद् गार माझ्या तोंडातून आले. अचानक वर्गात हास्यस्फोट झाला. मी माझ्या वर्गमित्रांकडे गंभीरपणे नजर फिरवली. तेवढ्यात माझ्या नजरेत न मावनारे सुंदर, मनबंदिस्त करणारे, नजरेच पाक पाणी पाणी करणारी मोहिनी पुणेकर दिसली.मी तर तिच्या त्या मादक रुपात हरवून गेलेलो. असा रोमँटिक सीन असताना .तेवढ्यात
विलनची entry. झाली .कोण ?मँडमनी विचारले , 'मुकूंद' तू उशीर का केलास? ,का कळत नाही का दहावीला आलो आपण .असे एका मागून एक प्रश्नांचे बाण मँडमनी माझ्यावर सोडले ,पण माझ्या मनाचे बाण मोहिनीकडे वळवले होते.मी थोडा वेळ तिच्याकडे बघत राहिलो मँडम अरे काय विचारले मी मुकूंद.
मी काहीतरी कारण देऊन होई पर्यंत बेल झाली आणि माझ्यावरचे संकट टळले . पुढे अशाच बऱ्याच गोष्टी घडत गेल्या तसेच मी कसाबसा त्यातून सुटत गेलो. कसेबसे दहावीचे वर्ष संपत आले होते. आणि अचानक हॉलतिकिट हातात पडले आणि पायाखालची जमीनच सरकली कारण अभ्यासाला तर अजून सुरुवात केली नाही दुसऱ्या दिवशी खूप गोंधळलेल्या अवस्थेत शाळेत गेलो. शाळेचा निरोप घेतला पण मोहिनी विषयी मनाने घर केले होते, पण तिला विचारण्याची भिती काय कमी होत नव्हती. कितीही मनाची तयारी केली आज विचारु पण परिक्षा जवळ आलेली होती. त्यामुळे काय बोलणे झालेच नाही आणि माझ्यासारखे च तिचेपण झाले असावे असे मला वाटत होते.
अखेर निरोप समारंभाच्या वेळी आम्ही भेटलो पण अभ्यासाव्यतिरीक्त काही सुचवलेच नाही. तिलाही आणि मलाही. तिला वाटले मी विचारावे पण परिक्षेच्या पुढे नको. म्हणून राहूनच गेले.
दहावीची परिक्षा संपली निकाल लागला दोघांना पण चांगले मार्क मिळाले. पुढे योगायोगाने दोघांनी एकाच कॉलेजमध्ये एडमिशन घेतले. पण आता परिस्थिती बदलली होती. मोहिनी खुपच सिरीयस झालीय असे मला वाटतं होते.
त्यामुळे पहिले दोन वर्ष मी पण काहीच विचार केला नाही आणि त्यावेळी जबाबदारी वाढली होती, पुरसतच मिळाली नाही.
शेवटच्या वर्षात असताना अचानक मला एडमिशन डेस्क च्या तिथे भेटली पण तिने ओळखपण दाखवली नाही. ती अशी आली अन् अशी गेली पण विश्वास बसत नव्हता.आज दिवसभर तिचाच विचार मनात पिंगन घालत होता.शेवटी कॉलेजमध्ये एका फंक्शन मध्ये मी तिला लवशिप विचारले.तसा होकारही मिळाला तो दिवस आम्ही दोघांनी मिळून आनंदात आणि खूप समाधानात साजरा केला. पण कस असते ज्या गोष्टीची सुरुवात केलीय त्या गोष्टीचा शेवट पण ठरलेला असतो.
तो दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. पण त्या दिवसापासून आमचा एक नवीन प्रवास सुरु झाला होता. तो
अजूनही चालूच आहे पण त्या दिवशी ची जवळीक रिकामीच आहे.
खरय,आम्ही प्रेमात असूनही एकत्र नाही आहोत.?😢?