डायरी
डायरी


"लग्न? आई-बाबा, या विषयावर नंतर बोलूया ना.. आज खूप दिवसांनी समीरदादा आलाय घरी, मग त्याला जरा आराम करू द्या. खूप थकला असेल तो प्रवासात नंतर बोलू की" "उद्या कधी?"
"आता दादा आहे की 10-12 दिवस सुट्टीवर "... असे बोलून रमाने आई-बाबांची चांगली समजूत काढली आणि त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावाला जरा पूर्णविराम च दिला.
समीरदादा जेवायला ये! अशी रमाने हाक दिली, समीर खोलीतून 'आलो ग थांब '...रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले आणि आपापल्या खोलीत आराम करायला गेले.
समीरला मात्र लवकर झोपायची सवय नव्हती. तो त्याची जुनी 'डायरी' वाचत बसला. वाचता वाचता तो त्याच्या college जीवनात पोहचला.
पहिल्या वर्षी 'फ्रेंडशिप डे 'ला सार्वजनिक टांग मारून सगळे मुलं-मुली आम्ही 'भैरवनाथ च्या टेकडीवर 'फोटोशुट' साठी गेलो होतो. दिवसभर कसलीही तहानभूक न करता तो दिवस एखाद्या विशिष्ट प्रकारच्या सणासारखा साजरा केलेला.
खूप मजा आलेली,आणि सर्वात जास्त मजा अन् आनंद तर मलाच झालेला कारण माझा आणि 'शितल'चा फोटोशूट छान झालता. आम्ही दोघेही फोटोत खूप च सुंदर दिसत होतो.एकंदरीत आमची केमिस्ट्री चांगली जुळून आलेली, त्याच कारणही तसेच होते, त्यादिवशी तिने माझ्या आवडीचा पिवळा पंजाबी ड्रेस घातलेला.जो की मी तिला बड्डेला गिफ्ट केलेला.
आणि मी पण छान 'रेड कलरचा' ड्रेस घेतला होता.
तो दिवस कधीही न विसरण्यासारखा नव्हता, या सगळ्यात साखर म्हणून आधून मधून पाऊस येत होता. आणि ऊन पण होते, जणू 'ऊन -सावली चा खेळ'च तो दिवस आमच्या साठी सोनेरी च होता. जवळजवळ ४:३० वाजले होते,सर्वजण घरी जाण्याची घाई करत होता.
आभाळ पण आले होते ,त्यामुळे अंधार पडल्यासारखे झाले होते, येताना मी एकटाच गाडीवर आलेलो, शितल वर्षाबरोबर आलेली पण वर्षा दुपारीच घरी गेली होती.
सगळे पटापट घरी निघाले, मात्र शितल माझ्याकडे लिफ्ट च्या आशेने पाहत होती. मी कसलाही विचार न करता तिला घरी सोडतो म्हणालो. सायंकाळी कळी जशी खुलावी तशी ती खुलली होती. एवढ्यात सगळेच पुढे आले ,आम्ही दोघेच मागे राहिलो. वाटेत अचानक मोठा पाऊस आला अन् आम्ही ओलेचिंब झालो. दोघेही थंडीने कुडकुडत होतो, मी चहा चा गाडा बघत होतो. मग एक चहाचा गाडा दिसला मी गाडी बाजूला घेऊन म्हणालो , 'चहा घेऊ'अन् लगेच निघू तीने होकारार्थी मानेने च उत्तर दिले. तिचे ते ओलेचिंब रूप पाहून माझ्या अंगावर शहारे आले. थंडी तर पळून च गेली.
चहा घेऊन आम्ही घरी निघालो, ६:००वाजता तिला घरी सोडले, आणि तीने मला thanks. म्हणाली.
मला खूप भावली.
समीरच्या अंगावर काटा आला होता. त्याच्या रोमारोमात या ओल्याचिंब आठवणी जाग्या झाल्या होत्या..
रात्रीचे पावणे 2 वाजले होते त्या सुमसान रात्री समीर च्या आठवणी काहूर करत होत्या आणि त्यात समीर च मन झोका घेऊन जात होतं . एवढ्यात light गेली आणि समीर च्या त्या आठवणी मध्ये अंधार पसरला.