Parveen Kauser

Tragedy

3  

Parveen Kauser

Tragedy

पिंजरा

पिंजरा

3 mins
255


 ‌‌गोदाम्मा चार घराची धुणे भांडी करून आपला घर संसार उभा केलेली एक अडाणी बाई. नवरा फक्त नावाचा गळ्यात मंगळसूत्र बांधण्या पुरताच. दारुचे व्यसन,जुगाराचा नाद,आणि त्या ठिकाणी पण जाणे. कामाचे म्हणजे सरकारी दवाखान्यात झाडायचे काम करायचा पण दारुच्या आहारी जाऊन ती नोकरी सोडून दिली.

 दोन मुली आणि एक मुलगा.मुलगा लहान होता.मुली मोठ्या.झोपडपट्टीत राहायला होते.गोदाम्मा सकाळी धुणे भांडी चे काम करून संध्याकाळी पापड लाटायचे पण काम करायची.

 तिचा नवरा दिवस भर बाहेर दारु पिऊन मित्रांबरोबर फिरायचा.आणि रात्री घरी येऊ काही न काही शुल्लक कारणावरून हिच्या बरोबर भांडायचा. भांडणे मारणे पर्यन्त जायचे. तो तिला बेदम मारहाण करायचा. ती बिचारी चुपचाप सहन करायची. जेव्हा तिला मारुन थकायचा तेव्हा तिच्यावर अधाशासारखा तुटून पडायचा आणि तिचे उरले सुरले लचके तोडून मेलेल्या जनावरासारखे झोपायचा.

  " आई ..आई..

...का आणि किती सहन करतेस तु.चल याला इथेच सोडून आपण दुसरीकडे जाऊन राहू" तिची मुले रडत रडत तिला म्हणायची.

  ती म्हणायची " अरे बाळानो कसा पण आहे पण नवरा आहे म्हणून कोणी माझ्या कडे वाकड्या नजरेने बघत नाही. जर मी तुम्हाला घेऊन वेगळी झाले तर बाहेरची गिधाडे सोडणार नाही मला" म्हणून ही माऊली मुलांना जवळ घेऊन झोपायची.

  असेच वर्षामागून वर्षे निघून गेली. मुली आता मोठ्या झाल्या होत्या. मुलगा पण हाईस्कूल मध्ये जात होता. मुलींचीं शाळा बंद करून तिथेच कपड्याच्या फॅकट्रीमध्ये कामाला घातले होते.

  १५ आॅगस्टची मुलींना सुट्टी होती.त्या दोघीं घरात होत्या.गोदाम्मा कामाला निघाली तशी तिची धाकटी मुलगी मी पण येते आई तुझ्या बरोबर म्हणत तिच्या बरोबर गेली.

  मुलगा पण शाळेत झेंडा वंदन करून मित्रांबरोबर खेळायला गेला.

  गोदाम्माचा नवरा रोजच्या प्रमाणे दारू पिऊन घरी आला.तिची मुलगी स्वैपाक करत होती.बापाला असा दारु पिऊन आलेला बघून ही मुलगी अगदी लहानपणापासून घाबरायची.

 आजही तसेच तो आत आल्या आल्या ही बिचारी घाबरून बाजूला जाऊन बसली.

  " ये जेवायला वाढ़ मला.

....काय गं ये ..

तुलाच बोलतो आहे मी.

ऐकू येत नाही का? आं.. काय घालू लाथा कंबरड्यात"

  बोलता बोलता त्याचे झोके जात होते.

 " हा..हा..

हो ..देते ..

....वाढते थांबा हा बाबा

 बसा तुम्ही आणतेच ताट' म्हणत ती आपल्या बापाला जेवण वाढून आणून दिले.

  जेवण समोर दिसताच तो जेऊ लागला.त्याच्या हातात दारुची बाटली होती.एका घासा बरोबर तो दारु ढोसत होता.


  लगेचच तो त्या नशेत गेला.नशेमध्ये त्याच्यामधल्या बापाने पशुचे रुप धारण केले.आणि तो आपल्याच पोटच्या गोळ्यावर तुटून पडला.तिची तो लत्तकरे तोडू लागला.ती पोर जोरजोरात रडू लागली." सोडा मला...आई...

आई....वाचव मला..

आई..ये आई".

ती स्वता:ला सोडविण्यात असमर्थ होत होती.तोच तिची आई आणि बहीण दोघीं घरी आल्या.


  गोदाम्माच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिला तिची मुलगी तडफडत आहे हेच दिसत होते.ती पळतच गेली. तिला त्या नराधमापासून सोडविण्याचा प्रयत्न करू लागली.पण तो तिला सोडत नव्हता.


  तोच एकदम गोदाम्माने तिथे समोर पडलेला खलबत्ता उचलला आणि आपल्या नवऱ्याच्या डोक्यात घातला.तो तिथेच तडफडत राहीला.

 हिने आपल्या मुलीची सुटका करून घेतली.तिच्या अंगावर आपली साडी काढून घातली.


  आणि पुन्हा तो खलबत्ता उचलला आणि त्याच्या डोक्यात घातला.तो तिथेच तडफडत मरण पावला.


तशीच गोदाम्मा उठली आणि आपल्या दोन्ही मुलींना जवळ घेऊन रडू लागली.तोच बाहेर समोरच्या सरकारी रेशनिंग दुकानांत झेंडा फडकवले गेले.फटाके उडवून भारत माता की जय 

  जयहिंद

   म्हणून ते सर्व जण स्वातत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा एकमेकांना देत होते.

  बाहेर तो जल्लोष होता तर आत गोदाम्माच्या झोपडीमध्ये खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले होते.

  तशीच ती रक्ताने माखलेले हात आणि तो खलबत्ता घेऊन पोलिस ठाण्यात गेली.आणि तिथे जाऊन जे काही घडले ते सांगितले.हे ऐकून पोलिसांच्या अंगावर शहारा आला.आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

   तिला जरी पोलिस कोठडीत रवानगी केली होती ती आत कैद म्हणून कैदी झालेली होती तरी ती खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाली होती.

  आज ती मुक्त झाली होती.

ती आज स्वातंत्र्य झाली होती.

  पण ती एका पिंजऱ्यातून मुक्त होऊन दुसऱ्या पिंजऱ्यात आनंदाने गेली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy