देवाचे दुसरे रुप आई
देवाचे दुसरे रुप आई
" आई", " अम्मी", " माॅम"," मदर"," आऊ" विविध नावांनी ओळखले जाणारी आई . असे म्हणतात की आईच्या पायात स्वर्ग आहे तर वडिल हे आहेत स्वर्गाचे द्वार. माझी अम्मी म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहे.सर्वगुणसंपन्न अशी माझी आई.
आजी आजोबांची एकुलती एक मुलगी अगदी राजकन्येसारखे वाढलेली पण आजोबांच्या कडक शिस्तीचे पालन करुन लहानाची मोठी झालेली आई.कधीही कोणाला उलट बोलणे नाही किंवा कोणालाही वाईट बोलणे नाही. अशी आमची अम्मी. सासरी गेल्यानंतर सर्वांची मने जिंकली. तिला कलेची खुप आवड. कपडे शिवणे , हस्तकलेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनविणे. कापड पेंटिंग एव्हाना मेणाची खेळणी बनविणे हा तिचा छंद. इतकेच नव्हे तर दुपारच्या वेळेस ती गरीब होतकरू मुलींना शिवणकाम विणकाम भरतकाम शिकवायची. आज त्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. मला खरंच तिची पोटी जन्माला आले याचा अभिमान वाटतो. आणि तिच्या साठी गर्व वाटतो.
आज ती खूप आजारी आहे. देवासमोर अल्लाह कडे एकच प्रार्थना करत आहे तिला बरी कर लवकर.
