Parveen Kauser

Others

3  

Parveen Kauser

Others

आणि मी कवयित्री/ लेखिका झाले

आणि मी कवयित्री/ लेखिका झाले

3 mins
363


 माझा लेखन प्रवास मी लहान होतो तेव्हा पासून सुरू झालेला होता हे सांगणे अतिशयोक्ती होणार नाही. मी प्राथमिक शाळेत असताना शाळेच्या वार्षिक पुस्तकामध्ये माझ्या लहान लहान मोडक्या तोडक्या शब्दात कविता लिहायची. त्या कविता छापून आल्या की ते पुस्तक मी आनंदाने आमच्या बाबांना दाखवायचे. ते भरभरून माझी स्तुती करायचे. आणि आपल्या मित्रांना सांगायचे. त्यांचे एक मित्र डॉक्टर आहेत ते तर मला खूप प्रोत्साहन द्यायचे. आणि एक गंमत अशी झाली की ती त्यांची मुलगी जी माझ्या एवढीच तिला शाळेत कवीच्या विरूद्ध अर्थी शब्द काय हा प्रश्न आला यावर तिने कवी विरूद्ध कवीन असे लिहिले ‌. तेव्हा डॉ.काका इतके हसले आपल्या मुलीवर आणि आम्हाला पण हा जोक सांगितला आणि तेव्हा पासून मला ते कवीन परुराणी असेच म्हणू लागले. 


यानंतर लग्न होईपर्यंत काही तरी छोटे छोटे लिखाण केले पण ते मात्र माझ्या वहीपुरतेच मर्यादित राहिले. लग्नानंतर जेव्हा मी बेंगलोरला आले तेव्हा मराठी भाषेबरोबर संबंध न च्या बरोबरच. मराठी केवळ मी जेव्हा आई-बाबांना पत्र लिहायचे तेव्हाच. आणि जेव्हा जेव्हा माहेरी जायचे तेव्हा 

 मराठी पुस्तके ,मासिके, कादंबरी येवढेच नव्हे तर वर्तमान पत्रात येणारी पुरवणी याची एक मोठी बॅग भरून घेऊन यायची. कारण तेव्हा इतके मराठी साहित्य मला इथे मिळणे अशक्यच होते. मला वाचनाची खूप आवड. 


कालांतराने मोबाईल फोन आला. तेव्हा सोशल मिडिया द्वारे काही थोडे वाचन सुरू झाले. पण ते फक्त व्हाट्सअपच सुरू होते. फेसबुक वर नव्हतेच मुळी. काही दिवसांनी भाच्याने मला माझे फेसबुक अकाऊंट काढून दिले. फेसबुक वर येणाऱ्या मराठी पोस्ट आवडीने वाचू लागले. काही साहित्यिक गृप मध्ये अॅड झाले. लिखाण वाचून लाईक कमेंट करु लागले. कधी कधी कमेंट मध्ये छोटी छोटी चारोळी करु लागले. मग असे जाणवले की अरे आपण अजून ही लिहू शकतो. आणि मराठीशी आपली नाळ जोडलेली आहेच. पण लिहीण्याचे धाडस होत नव्हते. कारण काही तरी चुकीचे लिहिले तर उगाच फजिती व्हायची हा विचार मनात यायचा.आणि बाबांना फोन करून सांगितले की बाबा मी चारोळी लिहिले आहे ते बरोबर आहे का बघा.आणि फेसबुक वर शेअर करु का? यावर बाबांनी अगदी आनंदाने माझ्या चारोळीचे कौतुक केले आणि कर बेटा शेअर. खुप छान लिहिले आहेस तू. लिहीत रहा. असे सांगितले. मला त्यांचे बोलणे ऐकून खूप बरे वाटले आणि मी तेव्हा पासून माझा लेखन प्रवास सोशल मिडिया वर सुरु केला.


वेगवेगळ्या समुहामध्ये मी माझे लिखाण करू लागले. मला माझ्या लिखाणावर भरभरून प्रतिसाद देणाऱ्या मैत्रीणी मिळाल्या . या मैत्रीणी मुळेच मी माझा लेखन प्रवास सुरू ठेवला.आतकेच नव्हे तर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि माझ्या कथांना उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट कथा म्हणून सन्मानित करण्यात आले. 


कथा, कविता, लेख शायरी आणि चारोळी लिहिते.आणि होणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग पण घेते. दिर्घ कथा,लघूकथा,अलक असे कथांचे वेगवेगळे प्रकार कविता मध्ये खूप सारे प्रकार कसे लिहावे हे पण शिकले आणि अजून ही शिकण्याची इच्छा आहे. 


माझ्या कथा मासिकांमध्ये छापून आल्या. कविता वर्तमान पत्रात छापून आली. माझ्या लिखाणाला मिळालेल्या पारितोषिकासाठी मी आमच्या बाबांना खूप मिस करते. जेव्हा मला सन्मान पत्र मिळते तेव्हा माझे डोळे आपोआप बाबांच्या आठवणीने पाणवतात.


बस इतकेच म्हणेन की " अभी अभी तो सफ़र शुरू किया हैं मंजिल बहुत दूर है

 मंजिल तक हर हाल में पहुंचना जरुरी है 

क्योंकि अब्बाजान आपके ख्वाब को मुक्कमल़ करना है ।


Rate this content
Log in