फुलवारी
फुलवारी
अहो, तुम्हीच ना तिचे पालक
तुमचेच ना ते बालक, मग
का करता तिला तुमच्यापासून अलग?
का आणता स्त्री जातीवर मळभ?
नसेल स्त्री तर मिळेल का वारस?
गोजिरवण्या लहानग्या बहुलीच निर्मळ हसू
घालवेल तुमच्या निरस जीवनातील आसू
निखळ, निरपेक्ष, शुद्ध प्रेम मिळेल,
जेव्हा तिच्यावर प्रेम कराल निर्भेळ
वंशदीपीका आणेल वशाला दिवा
घरीदारी वाटेल सुखाचा मेवा
परसदारी, घरीदारी फुलवेल बगीचा
एकदा तिला येऊ द्या तरी घरी तुमच्या
तुमच्याच रक्ताची, तुमच्याच हाडामासाची
तुमच्याच प्रेमाची , तुमच्याच सौख्याची
स्वागत करा तिचे मनापासून घरीदारी
झगमगवेल, उजळवेल दिवाळी ही फुलवारी