Smita Doshi

Inspirational

3.3  

Smita Doshi

Inspirational

ललित लेख

ललित लेख

3 mins
126


लेक चालली सासरला

   मी एका मुलीची पालक।माझी काही मतं आहेत.मुलीच्या भवितव्याबद्दल मलाही चिंता आहे.तिला सुखात ठेवणारं सासर मिळालं आणि माझी लेक सुखात राहिली म्हणजे झालं,यापेक्षा मला ज्यास्त काय अपेक्षा असेल, असं तुम्हाला वाटत असेल,होय ना।ते बरोबरही आहे म्हणा। कुणाला आपली लेक दुःखी रहावी असं वाटेल?शेवटी मुलांच्या सुखातच तर पालकांचं सुख असतं नाळ

        सासरी लेक सुखात आहे,यावरच सगळं संपत काहो?लेक सुखात असं असलं तरी ती खऱ्या अर्थानं सुखी आहे का हेही पालकांनी जागरूक राहून पहावं,असं मला वाटतं. केवळ गाडी,पैसा, बंगला म्हणजेच सर्वकाही नव्हे. ही सगळी सुखं असतील पण तिला मानसिक सुख नसेल तर----

      घरचं सगळं व्यवस्थित आहे हे पाहूनच आपण मुलगी देत असतो,पण माणसांचे स्वभाव त्या घरात गेल्यावरच कळतात ना। बाहेरून त्या स्थळाबद्दल कितीही चांगली माहिती मिळाली,पण प्रत्यक्ष्यात मुलाचा,घरातल्यांचा स्वभाव स्वार्थी असेल, मुलगा व्यसनी असेल,त्याला काही वाईट नाद असेल तर अशावेळी आपली पालकांची प्रतिक्रिया काय असायला हवी?

        आपण मुलीला तर समजावूच ,पण मुलाच्या घरातल्यानाही जाब विचारायला हवा ना। मुलगी दिली,तिचं लग्न केलं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं, असं होतं का?तर नाही.जरी मुलीला सासरी पाठवली तरी आपण शेवटपर्यंत तिच्या पाठीशी उभं असलं पाहिजे.तिच्या सुखात सुखी तर तिच्या दुःखात दुःखी झालं पाहिजे.मुलीला सासरकडून कुठला त्रास होत असेल तर त्याचा जाब आपण वेळीच विचारला पाहिजे.किरकोळ बाबी असतील तर लक्ष द्यायचं कारण नाही,मुलीला समजावून सांगून सांगितलं पाहिजे.

      चूक कुणाची आहे हे पाहून त्या दोघांमध्ये,त्यांच्या घरच्या लोकांमध्ये समेट घडवून आणला पाहिजे.प्रकरण चिघळू न देता वेळीच सर्व सामजस्याने सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे,शेवटी दोघांच्याही आयुष्याचा प्रश्न असतो ना।

       हा,पण हे सर्व करत असताना आपण मुलीच्या घरात विनाकारण ढवळाढवळ करता कामा नये,त्यामुळे मुलीच्या सुखी संसारात वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता असते.लेकीच्या घरातील समस्या सोडवताना प्रसंगी दहा वेळा विचार करावा.योग्य-अयोग्य काय ते ठरवून मगच पाऊल उचलावे.लेकीच्या बोलण्यावरच पूर्ण विश्वास ठेवू नये,सत्याचीच बाजू आपण घ्यायला हवी ,तरच योग्य न्यायाचे होईल.

     मुलीच्या घरी जाणे-येणे योग्य तेवढेच ठेवले पाहिजे.कामाशिवाय तिथे ज्यास्त जाण्याची गरजच काय ? त्यामुळे आपला मान त्या घरात योग्य तोच राहतो, आपल्या जरुरी पुरतेच जाण्याने तिच्या सासरकडच्या लोकांच्या कपाळावर मग आठीही पडणार नाही.

   जेव्हा कधी आपल्या स्वतःच्या घरात समस्या निर्माण होतात,त्यावेळी लेक-जावयाला आवर्जून त्यात सहभागी करून घ्यायला हवे.तेही आपल्या घरातीलच सदस्य आहेत,हे आपण कधीही विसरून चालणार नाही.शेवटी दोन्ही घरं एकच असतात.लग्न करण्यामागे हाच तर उद्देश्य असतो ना, दोन मन जुळणं जसं महत्वाचं असतं तसंच दोन घरही जुळणंही महत्वाचं असतं ना। फक्त त्यात पथ्य म्हणजे कुणीही कुणाच्याही घरात विनाकारण डोकावू नये, कारण, शेवटी मुलीचं हक्काचं घर तिचं सासरच असतं. तिला तिथे जरी काही कमी-ज्यास्त असले तरी आपल्या लाडक्या लाडावलेल्या लेकीला आहे त्यात समाधान मानायला आपण शिकवलंच पाहिजे.उगीच एकाचे दोन करून तिचं मन सासरविषयी कलुषित करू नये,नाहीतर मुलगी व आपण ही दोलायमान होऊ व दोघांचीही स्थिती 'न घरका न घाटका 'अशी होईल.

      तर मुलीला सपोर्ट करा,तिच्या घरच्यांवर लक्ष ठेवा,मुलीच्या सुखाचा अधिकाधिक विचार करा, तिला होणाऱ्या छळवणुकीपासून तिचं रक्षण करा.पण हे सर्व करत असताना स्वतःला दूर ठेवा.लेकीच्या घरात समझोता करण्याचा प्रयत्न करा ,पण हे सर्व करत असताना आपला लेकीच्या घरी जाण्यायेण्याचा ,मध्ये नाक खुपसण्याचं कमी करा.स्वतःवर काही बंधनं घालून घ्या,आपल्याकडून होणारा कुठल्याही प्रकारचा अतिरेक टाळा,मुलीला "तिच्या"घरच्या पद्धती,रुढी-परंपरांचं पालन करू द्या.मग पहा,लेक कसा सुखाचा ,सोन्याचा संसार करते आणि नात्यातील वीण किती घट्ट करते ते


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational