Smita Doshi

Tragedy

3  

Smita Doshi

Tragedy

मुखवटा

मुखवटा

2 mins
531


आज माझा प्रेमावरचा विश्वासच उडालाय.मी त्याला इतका जीव लावला,पण बदल्यात त्यानं मला काय दिलं?हे लाजिरवाणं जीणं?

आज जग मला परित्यक्ता म्हणायला लागलंय. जगाला काय माहीत ,माझ्यावर ही वेळ का आली आणि कुणी आणली?

   रमेश आमच्या समोरच रहात होता.लहानपणापासूनच आमची मैत्री. आमच्यागल्लीत आमची मैत्री

सर्वांना माहितच होती. कुणीकुणी तर अगदी "भावी नवरा-बायको"म्हणून आम्हाला चिडवायचे सुद्धा.का कुणास ठाऊक पण मीही त्यामुळे नकळत शहारत होते.मलाही रमेश आवडत होता.आम्ही दोघे कॉलेजला जाऊ लागलो,आणि आमच्याही नकळत आम्ही एकमेकांकडे आकर्षले गेलो.रमेशने तर मला लग्नाचं वचनही दिलं. तो माझ्यावर मनापासून प्रेम करत होता.

  पणअचानक काय झाले कुणास ठाऊक,रमेश मला टाळू लागला,तो मला भेटेनासा झाला.मी त्याला भेटण्याचा किती प्रयत्न केला,पण तो भेटलाच नाही ,अगदी आजपर्यंत।

आम्ही घेतलेल्या आणाभाका,एकमेकांशी सात जन्माचं नातं निभावण्याचा केलेला निश्चय ,सगळं सगळं तो विसरला.आणि आमच्या हातून नकळत पडलेलं वाकडं पाऊल,

आज पाप बनून माझ्यापुढे उभं राहिलंय.. आता मी काय करू,कसं जगणार,कसं तोंड देणार दुनियेला.आता माझ्यापुढं पूर्ण अंधःकार आहे.मला काहीही सुचेनासे झालंय. माणूस एवढा कसा पाषाणहृदयी ,निष्ठुर होऊ शकतो,आपलं प्रेम तो कसं विसरू शकतो?

माया हमसून हमसून रडू लागली.आज तिच्यापुढं काहीच मार्ग नव्हता,ती अगतिक,हतबल झाली होती आपल्या फसगतीपुढं.तिला आपली काय चूक झाली,रमेश आपल्याला असा कसा सोडून गेला हेच समजेना.विचार करकरून तिचं डोकं फुटायची वेळ आली होती.

   आज पंधरा दिवस झाले ,रमेश मायाला भेटला नव्हता की त्याने तिला सम्पर्क करायचा कुठलाही प्रयत्न केला नव्हता.मायाने खूप प्रयत्न केला,पण तिला काहीही कळले नाही त्याच्याविषयी.

    आज अचानक तिला कळ ले की,रमेशने दुसऱ्या एका मुलीशी लग्न केले आहे, जी खूप पैसेवालीहोती. मायाला आता त्याचा खूप राग आला, त्याचा तिला तिरस्कार वाटू लागला. मला पैश्याची अजिबात हाव नाही,मी फक्त तुझ्या प्रेमाचा भुकेला आहे,आणि जे तू मला भरभरून देते आहेस. तुझ्या प्रेमापुढे जगातील सर्व सुखे मला तुच्छ आहेत. असे अगदी पोट तिडकीने बोलणारा रमेशच आज पैशापुढे शरण गेला होता,पैशाला भुलला होता आणि प्रेमाला विसरला होता.

       रमेशच्या या स्वभावाची मायाला आज नव्यानं ओळख झाली होती.त्याच्या या स्वार्थी ,पैशासाठी हपापलेल्या स्वभावाला लपवून त्याने केवळ प्रेमाचा खोटा मुखवटा धारण केला होता आणि मायाबरोबर प्रेमाचे खोटे नाटक करून तिच्याबरोबर प्रेमाच्या खोट्या आणाभाका घेऊन तिचं 'सर्वस्व 'लुटलं होतं.

    काय करावे अशा "मुकुटधारी"लोकांचं?त्यांना कसं ओळखायचं?त्यांच्यापासून स्वतःला कसे वाचवायचे,हे खरंच समजायला हवे,तरंच माणूस स्वतः सावरेल आणि दुसऱ्यालाही यातून वाचवेल. अशी एखादी तजवीज नाही का कोणी करू शकत?

अशा निष्ठुर,स्वार्थी लोकांना देव केव्हा सुबुद्धी देणार।अशा लोकांना शहाणपण कधी येणार?निष्पाप कळ्या ना कुस्करण्याची त्यांची वृत्ती नष्ट होऊन या कोवळ्या जीवा ना कधी बिनधास्त जगायला मिळेल का?यावर लवकरात लवकर काहीतरी खात्रीचा तोडगा ताबडतोब निघायलाच हवा,होयना।तुम्हाला काय वाटते


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy