फुलपाखरू
फुलपाखरू


सायली शाळेत जातांना सड़के वर आजू बाजू ला बघून चलायचे बरं। हो आई म्हणत सायली धावत निघाली बैग हाती घेऊन।
राधिके चा दिवस सायली च्या हसत्या मुखाकड़े पाहून निघायचा। दिवसभर तिची कामे करत घर आवरतानीं बस तिचे विचार मनात असायचे। अग बाई
पाच वाजत आले सायली चा येण्याचा वेळ झाला। राधिका घाई घाईनीं दूध गरम करायला ठेवले, आणि बिस्किट प्लेट मधे ठेवले। दारात येऊन तिची वाट पाहात उभे राहले।
सहा वाजले घड्याळ कडे पाहता राधिका च्या चेहरया वरती चिंता दिसायला लागली।
ती धावतच निघाली शाळेच्या वाटेनी। पण शाळा बंद झाली होती। चपराश्याला विचारले तर म्हणे ती सर्व मुलांच्या बरोबरच निघाली शाळेतून।
ती खूप घाबरली, रड़त घरी आली, सायलीचे बाबा आफिसमधून येऊन बसलेच होते, तिनी सांगितल्या बरोबर सायली ला शोधायला निघाले, पण ती कुठेही नाही मिळाली।
थकून हारून पोलिस ठाण्यात जाऊन सांगितले। रिपोर्ट टाकली। रडत रड़त दोघेही बेशुद्ध पड़ले। दूसरया दिवशी सायली मिळाली पण प्रेतरूपात रक्तात भरलेली, पोलिसांनी तिला एका ड़ोहातून काढ़ून आणले होते। राधिका ला काहीच सुचत नव्हते । जोरानीं ओरड़ून रडायला लागले दोघेही।राधिका च्या बागातले फूलपाखरू कोणी चुरमडून टाकले। म्हणजे राधिकाचे जीवच हरवून घेतले।