STORYMIRROR

Neha Kadam

Romance

3  

Neha Kadam

Romance

फक्त तुझ्यासाठी

फक्त तुझ्यासाठी

3 mins
3

आज सकाळी ती काकू च्या कट कट ऐकून न खाताच घराबाहेर पडलेली.. सकाळ पासून आता दुपार झालेली.. कामाच्या नादात तिला.. सकाळी एवढ काही वाटल.. नाही.. पण आता लंच ब्रेक झालेला.. सगळे जण आपला आपला टिफीन घेऊन निघाले.. पण हिच्या कडे आज टिफीन च नव्हता.. तस तिच्या साठी काही आजच नव्हतं हे..

तिची मैत्रीण नम्रता तिथे आली.. 
तिला.. अजूनही लॅपटॉप जवळ बसलेलं बघून म्हणली.. बास झालं मॅडम आता अजून किती काम करणार लंच ब्रेक मधे काम केल्यावर एक्स ट्रा पगार नाही देणार आहे कोणी..

सावी उसन हसत अगं तास नाही पण मला आज भूक नाही आहे.. तू जा मी नंतर खाईन वाटल तर...

नम्रता हो का मॅडम झालं का मला फसवून नेहमी सारख तर चल आता.. 
सावी तिच्या कडे एक नजर टाकत.. नाही ग अस काही नाही.. पण...
नम्रता : डोन्ट वरी तुला का तुझ्या त्या सो कॉल्ड काकू च नाव खराब नसत होऊन द्यायचं मला नाही माहिती.. पण ती पुढे बोलणार होती.. पण तिने स्वतःला थांबवलं.. खांदे उडवून म्हणाली अन्य्वेय्स... 

आता अर्धाच तास उरला आहे.. सो चल मी एक्स्ट्रा टिफीन सोबत घेतला.. आहे.. 

सावी थँक्यू 

मग दोघींनी मिळून लंच केला.. 
.
.
नम्रता : पण सावी मला सांगा तुला तुझ्या काकू चे सगळेच रंग माहिती आहेत तरी तू का त्यांना एवढ पाठीशी घालत असतेस? 

सावी : तस नाही ग काकू चांगली आहे.... थोडी फक्त वैतागलेली...आहे.. आई बाबा एक्सीडेंट मधे गेल्या नंतर अचानक तिच्या आणि काका च्या खांद्यावर माझी आणि नीता ( लहान बहिण) ची जबदारी आली. म्हणून...

नम्रता : अच्छा पण अशी काय जबाबदारी घेतली तुझ्या काका ने तुमची..जे घर आहे ते पण तर तुझ्या बाबा नी स्वतः बांधलेलं.. काका जो बिझनेस करतात तो पण तुझ्या बाबा चा होता.. पण त्यांनी सगळा माती मोल करून टाकला.. 

आणि आता काही नाही तर त्याचा दोष तुला देत असते काका तुझ्या पगारावर घर चालत माहिती असून..

सावी : नाही ग अस काही.. काका ना त्यांच्या मित्रांनी फसवल त्या मुळे बाबां ची कंपनी बंद झाली.. नाहीतर.. 
आणि काकू ती कितीही बोलली तरी तीच जस प्रीती वर प्रेम आहे तसंच मी आणि नीता वर पण आहे.  ते तर परस्थिती मुळे ती अशी वागते.. 

नमिता मान हलवत.. हम्म.. पण मग आज काय झालेलं.. तुझ्या काकू ला? 
सावी: तिने एक स्थळ सुचवलं आहे.. अगं पण नीता ला असच सोडून मी लग्नाचा विचार तरी कसा करू? 
.
नमिता : अच्छा.. आणि मी तर बोलेन करायचा झाला तरी काकू ने सुचविलेला मुलगा आहे म्हणजे नक्कीच कुठतरी पाणी मुरत आहेत.. काकू कितीही बोलली तरी लग्न करू नको त्या मुळासोबत.. 

सावी : झाला का तुझं परत सुरू? अगं काकू च्या मनात फक्त पैसे असते तर तिने लग्नच कशाला लावून द्यायचा विचार केला असता माझा.. 

नमिता : अगं पण मी फक्त काळजी पोटी म्हटलं.. काकू कशी आहे ते .. 
सावी: नमिता सोड तो विषय मला काकू बद्दल अजून काही ऐकून नाही घ्यायचं आहे.. आई बाबा नंतर तिनेच मला आणि नीता ला आधार दिला आहे.. 

नमिता : बरं बाबा ठीक आहे चुकल माझं...तुझी काकू म्हण बस.. खुश.. 

मग दोघी पुन्हा आपल्या आपल्या कामाला लागल्या 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance