STORYMIRROR

Neha Kadam

Romance

4.0  

Neha Kadam

Romance

लग्न ( करार की प्रेम )

लग्न ( करार की प्रेम )

6 mins
30

मिस नित्या मागचे दोन दिवस मी तुम्हाला.. एकदम प्रेमाने आणि दोघांच्या ही फायद्या साठी समजावतो आहे.. हे लग्न झालं तर त्यात आपल्या दोघांचा ही फायदा होणार आहे.. पण तुम्ही ऐकायलाच तयार नाही आहेत... आणि तुम्ही विसरला असला तर लेट मी टोल्ड यू..


आय एम द राघव सिंघानिया.. आणि मी मला हवं ते करूनच राहतो...

पण तरीही मी तुम्हाला.. दोन दिवस झाले खूप प्रेमाने समजावत होतो..


 बट नाव यू टेस्ट माय पेशन्स अँड आय डोन्ट लाईक पीपल व्हू टेस्ट माय पेशन्स... सो यू हव ओन्ली


त्याने एक नजर त्याच्या हातात असलेल्या.. महागड्या आणि ब्रँडेड वाच कडे टाकत म्हणाला.. 

यू हवे ओन्ली फोर हॉर्स.. टू से येस.. इफ स्टील युअर अन्सार इस नो.. then it's your responsibility to save your family from me.. understand..

तो उठून निघून ही गेला...


नित्या मात्र एकटीच त्या कॅफे टेबल वर बसून राहिली...तिच्या डोळ्यात पाणी जमा झालेला.. पण तिने कसबस स्वतःला सावरलं...


आणि मनातच म्हणली.. माझ्या सोबतच का अस करतो देव? प्रत्येकवेळी द्विधा मनस्थिती मधे मीच का अडकते? अशी काय पाप केली आहेत मी मागच्या जन्मात? देवा.. मीच का? ती देवा सोबत भांडत म्हणली..


देवा आता काय करणार आहे हा माणूस? एकतर तिथे मावशी त्या ओम सोबत माझं लग्न ठरवून आली आहे.. ते नाही झालं तर मग ती अशीच हात धुवून मागे लागलेली असते...आणि आता तर तिला.. कारणच भेटेल मला बाबांच्या नजरेत पडायला.. काय करू मी? देवा तुला मला एवढीच दुःख द्याची होती तर जन्माला तरी का घातला यार.. आता माझी मदत कोण करेल? ती वैतागून म्हणाली...


आणि बाहेर आली.. आणि तिला...आठवल.. सिया डार्लिंग.. येस.. मे बेस्ट फ्रेंड.. ती नक्कीच मला काहीतरी जुगाड करून बाहेर काढेल इथून .. 


तिने पटकन आपल्या पर्स मधला.. फोन काढला.. आणि तिला.. फोन लावला..


नित्या: हे सियु डार्लिंग व्हेअर आर यू? 

सिया: ओह बापरे खूप दिवसांनी आठवण आली तुला माझी? इतके दिवस तर साध मेसेज पण नाही मॅडम चा? 

नित्या : अगं कुठे दोनच दिवस तर झाले ना? आणि त्याला पण कारण आहे ग? माझी लाईफ म्हणजे माहिती आहे ना तुला? 

सिया : हो नाहीतर काय त्या तारक मेहता मधल्या जेठालाल सारखीच बोलायची... रोज काही ना काही होतच असत.. 

नित्या : मग तेच तर

सिया : मग आता काय नवीन? काय झालं आहे? 

नित्या : तू भेट ना.मला मी सांगते सगळ...

सिया : बर बर.. लोकेशन पाठव...


काही वेळा ने सिया तिने पाठवलेल्या.. लोकेशन वर येऊन पोचली.. दोघींनी एकमेकांना बघून मिठी मारली.. 

सिया : मग आता नवीन गोंधळ घालून ठेवलं आहे तुमच्या मावशी बाईंनी? 

नित्या: हो गोंधळ तर आहेच पण ह्या वेळी गोंधळ मावशी मुळे नाही झाला आहे? 

सिया : काय? इंटरेस्टिंग कोण आहे मग ती व्यक्ती?

नित्या: तुला मज्जा वाटते का ग?

सिया : नाही ग पण गेली पंधरा वर्षे तरी तुझ्या काकू ची जागा कोणी घेतली नव्हती ना? मग आज अचानक.. 

नित्या तिला हलक मारत अगं ते एकतर मीच माती खाली कदाचित त्या दिवशी मी त्यांना भेटलीच नसते तर आज ही वेळच आली नसती..

सिया : एकदम शकी नजरेने बघत.. व्हॉट? म्हणजे डोन्ट टेल मी कितवा महिना सुरु आहे? 

नित्या : न समजून सातवा महिना पण आता ते काय करायचं आहे तुला? 

सिया: काय? एक नजर तिच्या शरीरावर टाकत.. म्हणाली.. नाही ग पोट तर दिसत नाही आहे पण तुझं? 

नित्या : चमकून व्हॉट अग काय बोलतेस तू? तुला काय बोलताच आहे? 

सिया : अगं मग सातवा महिना म्हणजे पोट दिसत पण तुझं...

नित्या आपल्या पोटावर हात ठेवत.. अगं मूर्ख आहेस का ग तू? असा विचार करू कसा शकतेस तू माझ्या बद्दल? मी अशी वाटली का तुला.. ? 

सिया : म्हणजे? अग तूच म्हणली ना की सातवा महिना सुरू आहे.. मग मला वाटल की...

नित्या : चूप तू तुला काय वाटलं ते नको सांगू मला.. 

सिया : हसतच बरं सॉरी पण तूच बोलीस ना त्याला भेटली नसती तर हे सगळ झाल नसतं.. म्हणून मग मला वाटल.. 

नित्या..; अगं पूर्ण ऐक माझं? मग बोल ना? 

सिया : हसू आवरत घेत.. बर बोल काय झालं? कोणाला भेटली नसती तर? आणि काय झालं नसत? 

नित्या : त्या द राघव सिंघानिया ला.. त्याला भेटली नसती मी त्या दिवशी तर आज तो आलाच नसता माझ्या सोबत लग्न करायला..

सिया : जोरातच व्हॉट राघव सिंघानिया.. द राघव सिंघानिया त्याने तुला.. लग्नाची मागणी घातली आहे.. तिच्या अचानक अश्या ओरडण्याने सगळीच माणसं जी आजूबाजूला.. जा ये करत होती ती बघायला.. लागली.. 

नित्या..: तिला समजावत.. अगं हळू बोल ग बाई.. नाहीतर तू आताच ब्रेकिंग न्यूज करशील आमची.. तिने तिला.. हळूच आवाजात सांगितलं..

सिया : मग हळूच आवाजात अगं पण तू खरंच सांगतेस का?

नित्या: हो मग त्या दिवशी मी थोडी घाईतच होते अग आणि त्या नादात मी त्याच्या गाडीतला.. ठोकल.. त्यात पण चूक माझीच होती.. पण त्या चुकीची शिक्षा एवढी मोठी असेल मला वाटल नव्हतं ग 

सिया : अग पण मग तुला प्रॉब्लेम काय आहे? अशी शिक्षा मला मिळाली असती तर मी तर खुश होऊन स्वीकारली असती...

नित्या: काय? अगं काय बोलतेस तू? 

सिया : अग तो राघव सिंघानिया आहे.. किती तरी मी आणि माझ्या सारख्या मुली त्याच्या सोबत लग्नाची स्वप्न रंगवत आहेत आणि तू आहेस की त्याला.. नकार देतेस.. गॉड तुझ्या त्या ओम मधे काय आहे अस पण नुसत त्याच्या आई चा मुलगा आहे एवढच काय ते कर्तृत्व आहे त्याच.. मग..

नित्या : अगं पण तुला.. माहिती आहे का तो कमवत नसला.. तरी आता मावशी ने त्याच्या कडून दहा लाख घेतले आहेत.. रियू साठी.. मग.. 

सिया : बावळट मुलगी.. अगं पैसाच काय घेऊन बसलीस.. तू? 

आणि त्या राघव सिंघानिया ला हे दहा लाख काहीच नसतील.. मग ...

नित्या : अगं पण तरीपण नाही ग मला नाही करायचं आहे त्याच्या सोबत लग्न.. 

सिया : का पण?

नित्या. : कारण त्याचं काही माझ्या वर प्रेम वैगरे नाही.. ते फक्त त्यांच्या आजी च्या हट्टा साठी ते लग्न करतात? 

सिया: ओह पण मग तूच का त्यांना बोल माझी मैत्रीण आहे तिच्या सोबत चालेल का? 

नित्या.: हा गुड आयडीया 

सिया : ए बावळट मुली.. मी गंमत करत होती.. त्यांनी तुला विचारलं आहे लग्न साठी..

नित्या.: पण मला चालेल तुझं लग्न माझं तरी त्यांच्या सोबत...आणि त्याचं पण काम होईल...

सिया: मला पण आवडल असत त्यांच्या सोबत लग्न करायला.. पण आता नाही.. 

नित्या : का काय प्रोब्लेम आहे अगं छान दिसतात की.. एवढे काही वाईट नाही ते..

सिया: हा तुझ्या जागी दुसर कोण असत तर मी तयार ही झाली असती.. पण तू माझी मैत्रीण नाहीस ग बहिण आहेस मग मी माझ्या बहिणीच्या नवऱ्यावर . डोळे.. नो वे.. 

नित्या: हो का पण मला च नाही करायचं आहे हे लग्न

सिया : का? ओह हा तुझी ती सो कॉल्ड मावशी येत असेल ना मधी? बट नित्या मी तुला...सांगते की अशा लोकांचा विचार करायची तुला.. काय गरज आहे? आणि अजून किती दिवस त्याचा विचार करत बसणार आहेस? त्यांनी तर गेल्या पंधरा वर्षांत एकदा तरी तुझा विचार केला आहे का? आणि तो ओम त्यांच्या बद्दल तो कसा मुलगा आहे हे आपण पाहील आहे.. त्याच स्वतःच अस काहीच नाही.. त्याच्या आई च्या पैशावर उद्या मारतो तो.. ते सोड पण जुगार दारू आणि मुळात मुलीवर पैसे उधळतो...अशा माणसासोबत तू लाईफ काढणार आहे का? ते पण फक्त त्या दहा लाख रुपये साठी.. नो मी ह्यासाठी तुझी मदत करणार नाही आहे.. 


नित्या.. तिला समजावत प्लीज सियु अग... अस नको बोला ना माझी मदत कर प्लीज माझ्या कडे आता फक्त दोनच तास आहे.. आणि तूच विचार कर.. जरा.. जर मी राघव सरांसोबत लग्न केलं..तरी माझी आणि माझ्या घरची किती बदनामी होईल... मावशी च सोड बाबा ना काय वाटेल? ते माझ्या वर एवढा प्रेम करतात अग.. मग ते पण मला कायमच दूर करतील ग? 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance