पहिले प्रेम...
पहिले प्रेम...


पहिले प्रेम ते
जीवनात आले
तेव्हाच काळीज
खल्लास हे झाले...
होते मी एकटी
रिक्तशी घागर
प्रेमाचा भरला
तुझ्यात सागर...
माझ्या मनामध्ये
तूच भरलेला
प्रत्येकच क्षण
मनी साठलेला...
हे पहिले प्रेम
आहे खूप खास
राजसा तूच रे
जगण्याचा ध्यास...
वचन दे मला
एकत्रच राहू
सुंदर हे जग
सोबतीने पाहू...
विसरूच नये
पहिल्या प्रेमाला
आनंद मनाचा
सांगावा जगाला...