Akash Bansode

Drama Inspirational

4.0  

Akash Bansode

Drama Inspirational

"पाऊस"

"पाऊस"

3 mins
464


नवऱ्याच सोडून देण तरीसुद्धा न खचता चार मुलांची जवाबदारी स्विकारन, काम नको,नौकरी नको,घरदार नको..आणि त्यात नवऱ्याने सोडून दिलेली औदासा, बाई म्हणून समजाणे केलेली हेटाळणी, स्वतःच असं काहीच जवळ नसतानाही आपली चार पिल,त्यांच भविष्य, स्वतःच अस्तित्व यासाठी झगडणारी आणि तिला हिनवणाऱ्या, नाव ठेवणाऱ्या समजाच्या मुसक्या दाबणारी रणराघिणी होती ती "आई" कधी रिमझिम, तर कधी लगाम नसणाऱ्या पिसाळलेल्या रानडुकरा गत धो धो कोसळणाऱ्या पावसाळ्याचे दिवस,चार भिंतींच्या आत असल आणि डोक्यावर छप्पर असल की पाऊस कसलाही असो चांगलाच वाटतो.

 पण जेव्हा सजीवांसाहित,घरातल्या भिंतीही परक्या होतात आणि एक बाई चार पिलांना सोबत घेऊन आयुष्याला झुंज देन्यासाठी बाहेर पडते तेंव्हा हाच पाऊस सैताना सारखा वाटायला लागतो..

स्वताच भिजलेल अंग,लोकांच्या हापालेल्या नजरा,सोबत कळती झालेली लेकर...

आपलं बिर्हाड पाठीशी घेऊन ही वाघीण उस्मानाबाद म्हणजेच आताच्या धारशिवला अली होती, डोंगराच्या पायथ्याशी झाडाझुडपांणी वेढलेल ते आधीच धारशिवच्या काठच कुरणे नगर तिथे एका छोटश्या जागेत पत्र्याच्या शेड मध्ये आपल्या चार पिलांबरोबर ती राहायला अली होती..रोज कामाला गेली तरच घरात खायला मिळणार..त्यात बाहेर जोरदार पाऊस असायचा .स्वताच्या पोटाला पीळ पडला तरी खपवून घेतल असत पण लेकरांची भूक भागवान हे त्या मायचिच जवाबदारी होती, त्या जवाबदारीच ओझ आणि बाईपणाला चोपणाऱ्या पावसाला अंगावर घेत ती माऊली लेकरांच्या भाकरीची सोय करण्यासाठी घरा बाहेर पडायची घर म्हणजे काय तर ,डोंगराच्या पायथ्याशी चौकून उतारात असलेल चार पत्र्याच तोडक मोडक घरट... 

त्यादिवशी मध्यरात्री पावसाने चांगलाच जोर धरला होता, वार बेफाम वहात होत, आसपास कोणतही घर नाही, की माणूस नाही .. चार लेकर आणि निसर्गाशी त्यांच्यासाठी झुंजणारी आई, पाऊस वाढत होता तशी माऊलीची धाकधूक होत होती.. पत्र्याच्या आत कॉट वर चार लेकराला बसवून,पत्र्याच्या भोकातून आत येणाऱ्या पाण्याला अडवत ती उभा होती ,पण भळभळणाऱ्या जखमेतून जस रक्त आल्याशिवाय राहत नाही तस उताराला असणाऱ्या घरात भसाभसा पाणी शिरत होत..त्याच कपारीतून पाण्यासोबत कचरा, किड्यामुंग्या,सगळ त्या माउलीने थाटलेल्या फाटक्या संसारात सहज घुसत होत. तितक्यात त्या पाण्यासोबत एक लांबलचक नाग वाहत येउन त्यान त्या माऊलीची लेकर ज्या कॉटवर उभी होती त्याचा ताबा घेतला. 3 मुली,छोटा मुलगा मध्यरात्र,त्यात पाऊसाने तिच्या संसारवर घेतलेला ताबा कंबरेइतक पाणी, त्यात चौताळलेला नाग फनाकाडून तिच्या लेकराकड डौलात निघाला तरीसुद्धा ती डगमगली नाही की कोणाची मदत मागितली नाही ..मदत मागणाऱ्याला लोक दुबळे समजतात हा विचार डोक्यात ठेऊन जीव मुठीत घेऊन चार पिलांना पाठीशी घालन्यासाठी तीन त्या नागाच्या दिशेने पाऊल टाकल धो धो बरसणाऱ्या पाऊसापेक्षा तिला आलेल्या घामाने डबडबूनच ती भिजली होती तीन क्षणाचाही विचार न करता त्या नागावर झडप टाकली, वीज कडाडली,धरणी हादरली अन बांध फुटला आणि कुजक्या पत्र्याच्या घरात भसाभस पाणी शिरल तश्यातही त्या नागाचा फणा पकडून तीन तो भिरकावून लावला होता आणि आईच कर्तव्य पार पाडल होत.. 

  रात्र सरली पाऊसाचा जोर कमी झाला तांबड पसरल, सार अस्ताव्यस्त पडल होत पत्र्यासाहित त्या माऊलीचा मोडका तोडका संसार ढासळून पडला होता पण ती माऊली आतून आणखी जास्त मजबूत झाली होती अगदी सुर्य जेथून डोकावून तिच्याकडे पाहत होता त्या डोंगरागत त्या निसर्गाशी झुंज देऊन त्या आईने स्वतःच्याच बाईपणाची सारी कुंपणे तोडली होती, तांबूस तपकिरी सोनेरी किरणांचा सुर्या पेक्षा त्या माऊलीचा धडसाचा प्रकाशाने तिच्या चारी लेकरांच्या नजरेत एक वेगळाच दिवस उजाडला होता..कालच्या त्या पावसाने त्यांच सगळं बिर्हाड जरी नेहल असल तरी त्यांची जगण्याची उम्मेद द्विगुणित केली होती..


।।आकाश महादेवी आनंद बनसोडे।।

 


Rate this content
Log in

More marathi story from Akash Bansode

Similar marathi story from Drama