Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Pratiksha vaibhav Kulkarni

Romance

4.1  

Pratiksha vaibhav Kulkarni

Romance

पाहिलं प्रेम

पाहिलं प्रेम

2 mins
11.9K


डोळे बंद करून कुणाचातरी चेहरा डोळ्यासमोर येऊन गालावर गुलाबी हास्य यावं.एखाद्याच्या आठवणीत रमल्यावर अंगावर येणाऱ्या हवेच्या झुळुकेनेही मन प्रफ्फुल्लीत करावं.एखाद्याचा सहवासाच्या ओढीने मनाला मंत्रमुग्ध करावं,

आणि त्या व्यक्तीच्या असण्याने जीवन बहरून जावं.....

प्रेमाची अशी व्याख्या अनुभवण्याची संधी अजूनतरी मिळाली नाही पण आयुष्यात जे काही प्रेम अनुभवलं आणि मी ही ज्यांच्यावर अगदी मनापासून प्रेम केलं ते माझं "पाहिलं प्रेम" माझे आई वडील.निस्वार्थी प्रेम म्हणजे काय याच मूर्तिमंत उदाहरण त्यांच्या प्रेमातून मला कळलं करण मी जन्माला पण आले नव्हते तेव्हापासूनच त्यांनी ते प्रेम माझ्यावर केलं होतं.

खरच किती great असतात ना आपले आई वडील ते आपल्या मुलांवर तेव्हापासूनच प्रेम करतात जेव्हा त्यांना माहीतही नसतं की जन्माला येणार बाळ कोण आहे, कसं आहे, अगदी काहीच नाही.तरीही ही ते स्वतःच्या जीवापेक्षा ही जास्त त्या नवोदित जीवाची काळजी घेतात. मला नाही वाटतं यापेक्षा मोठा प्रेमाचा अर्थ अजून कुठला असेल. माझ्यापेक्षा माझ्या मुलांनी मोठं व्हावं म्हणून आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या त्या आईवडिलांच्या प्रेमाची भरपाई करणं केवळ अशक्यच.

प्रेमाचा खरा अर्थ सापडतो ,ते आपल्या मुलाला घरी यायला उशीर झाला म्हणून त्याच्या काळजीने येरझाऱ्या घालणाऱ्या त्या वडिलांच्या डोळ्यात, एक दिवस मुलं जेवली नाहीत तर स्वतःही दिवसभर उपाशी राहणाऱ्या त्या आईच्या डोळ्यात..

आयुष्यात "पाहिलं प्रेम" या संकल्पनेचा माझ्या परीने मी लावलेला अर्थ म्हणजेच माझे आई वडील.

20-25 वयात मनाला भावुन जाणार ते गुलाबी बेधुंद प्रेम मोहक असते यात शंका नाही, पण तरीही मनाला ओढ लावणार आणि नात्यांची गुंफण अबाधित ठेवणार ते निस्वार्थी प्रेम मात्र पालांकशिवाय कोणीच देऊ शकत नाही हे नक्की।।

The unconditional love


Rate this content
Log in

More marathi story from Pratiksha vaibhav Kulkarni

Similar marathi story from Romance