जीवनपट
जीवनपट


जीवनाच्या प्रत्येक वळणावरती जीवन पटावरील प्रत्येक कोडं सोडवत त्या पटावर वाटचाल करणं म्हणजेच जगण्यातला आनंद घेणं.मग पटावरिल या खेळात कधी शिडीवर उंच चढून जायचा आनंद मिळतो तर कधी सापाने गिळून खाली आल्याच दुःखही. असाच एक जीवनपट आपल्या मुलींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका वडिलांचा.......आपल्या संसारासाठी अहोरात्र तळमळत असणाऱ्या त्या महामानवाचा... जीवनपट जिद्दीचा,आशाआकाक्षांचा, आणि त्यांच्या अवर्णीनिय जीवन प्रवासाचा.......
त्याला झालेल्या दोन्ही चिमुरड्या म्हणजे त्याचा श्वास होता.त्या चिमुरड्यांना जवळ घेत असताना जणू त्याला सगळं जग त्याच्या कुशीत समावल्याचा आनंद मिळत होता.. घरची परिस्थिती बेताचीच होती.पण त्या चौघांची ती दुनिया मात्र प्रत्येकाला हेवा वाटावा अशी होती. त्याने आयुष्यभर खस्ता खाल्ल्या,तब्बेत साथ देत नसतानाही आयुष्यभर फक्त कष्ट केले मिळेल ते काम केले पण लेकीच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ दिले नाहीत. आणि याची जाणीव मुलींनाही लहानपणापासूनच होती आणि म्हणूनच की काय तिच्या डोळ्यात दिसणारी चमक तीचं वडीलांबद्दलच प्रेम व्यक्त करायची.
मुलींना मोठं होताना पाहताना त्यांनी एक स्वप्न मनी बाळगलं मुलीला CA बनवण्याचं आणि ते तिच्याही मनी रुजवल. मग यासाठी आयुष्यात येईल त्या संकटांना मात करून मुलीला शिकवण्याचा पन त्यानी केला,हे सगळं कशासाठी? तर परिस्थितीचे
जे भोग त्या बापाच्या आयुष्यात आले ते त्याला त्या लेकीच्या आयुष्यात ते कधीही येऊ नये म्हणून. याची तिलाही जाणीव होतीच आणि म्हणूनच अतोनात कष्ट करून अभ्यास करण्याचा विडा तिने उचलला, आणि शर्थीच्या त्या प्रयत्नांना सुरवात झाली.आणि यशाची एक एक पायरी ती चढत गेली डोळ्यासमोर त्या वडिलांची प्रेरणा ठेऊन.
मुलीच्या या यशाबरोबर जीवनपटाच्या या सापशिडीच्या खेळातली शिडी त्याने पार केली होती... आता फक्त दोन पावलांचा अवकाश आणि त्याला मिळणार होता जग जिंकल्याचा आनंद.... पण या सुखाला नजर लागली ती नियतीचीच.... काळाने घेराव घातला..आणि आता मात्र खऱ्या अर्थाने राजा बनलेला तो राजा मात्र काळाच्या पडद्याआड हरपला.
हे सगळं होत असताना त्याच्या जीवनंपटावरील आणि त्यांच्याच तैनातीत माहीर झालेल्या नव्या खेळाडूच्या हातात संसार सोपावतानाही त्यांच्या मनात शंका नाही फक्त अभिमानच असणार यात शंका नाही..आणि स्वतःच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक तिनी गमावला असला तरी त्याची मुलगी ही उभी राहू पाहतोय पुन्हा लढत द्यायला आयुष्याशी... घराला सावरण्यासाठी..आणि त्याच्या जीवन पटावरील उरलेल्या शिड्या चढण्यासाठी..
हे माझे काही शब्द माझ्याकडून माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीसाठी आणि तिच्या वडिलांच्या खडतर आयुष्यासाठी समर्पित
unconditional love
Real inspiration
Dedicated