Rushikesh Telange

Drama

3.5  

Rushikesh Telange

Drama

ऑनलाईन क्लास

ऑनलाईन क्लास

5 mins
232


"सुमीत अरे सुमीत ,ए सुम्या उठतो का बाबा आता' आई फॅन बंद करत सुमीतवर ओरडत होती.

  "झोपू दे मम्मी ,आता काय शाळा नाही.' सुमीत काकुळतीला येऊन म्हणाला.

   "अरे गधड्या ,ऑनलाईन क्लास तर आहे ना, त्यात काय पारोसाच थोबाड घेऊन बसणार आहेस का ?'

  आता मात्र सुमीतचा नाईलाज झाला.शाळेची कटकट जाऊन कंटाळण्याचे दिवस संपले पण घरी बसून कंटाळण्याचे पर्वतासारखे दिवस मात्र आता सुरू झाले होते. दिवस कसाबसा घालवता नाकी नऊ येत होते त्यातच हा ऑनलाईन क्लास.दिवसभर इतका वैताग यायचा की ऑनलाईन क्लास सुरू होताच सुमीतला झोप यायची.आता डोळ्यावर ताण पडतो म्हणून व्हिडीओ गेमही त्यानं बंद केला होता.

                  

अंघोळ वगैरे करून सुमीत ऑनलाईन क्लाससाठी तयार होऊन बसला तितक्यातच टिव्हीवर नागीन मालिका लागली आणि आईने टिव्हीचा आवाज वाढवला. तितक्यातच सुमीत कंटाळून म्हणाला ,"अरे टिव्हीचा आवाज कमी कर ना गं मम्मे ,माझा क्लास सुरू होईल आता.' आई म्हणाली ," अरे मी किचनमध्ये आहे मला ऐकू येणार नाही. त्यापेक्षा तूच हेडफोन लाव ना". "हट्ट बीसी' असं हात झटकून तो म्हणाला तितक्यात आई तिकडून म्हणाली ,आता हे काय नवीन बीसी' 'सोड गं आई ' असं सुमीत म्हणला इतक्यातच ऑनलाईन क्लासची लिंक वर्गाच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर आली आणि सुमीत हेडफोन लावून बसला. हेडफोन सतत वापरून त्याचा एक कान काही दिवसांपासून सुन्न पडला होता. घरी सांगितलं तर फटकेच पडतील किंवा तू आता मोबाईलचा वापर कमी कर असा सल्ला मिळणार होता म्हणून त्यानं ती गोष्ट अजून कोणालाही सांगितली नव्हती.

ऑनलाईन क्लास सुरू झाला.शिक्षक शिकवत होते ,तितक्यातच व्हिडीओ डिस्कनेक्ट झाला.बाहेर सोसाट्याचा पाऊस सुरू होता आणि सुमीतच्या मोबाईलची रेंज वारंवार कमी होत होती.गणिताचा महत्त्वाचा तास सुरू होता.परीक्षेला फक्त एक महिनाच शिल्लक असताना असं काहीतरी घडावं यामुळे सुमीत प्रचंड डिस्टर्ब झाला. त्यानं नाईलाजानं मोबाईल शेजारच्या बेडवर आपटून तो फॅनकडे बघत उसासा टाकत बेडवर पडून राहिला.नेमकं आता काय करावं हा त्याच्यापुढे मोठा प्रश्न होता.वडील संध्याकाळी घरी येताच टिव्हीवर संध्याकाळी बातम्या लावायचे त्यावर कोरोना केव्हा एकदाचा संपतो आणि लॉकडाऊन संपेल अशा बातमीची वाट तो बघायचा.परंतु दररोज त्याचा अपेक्षाभंगच व्हायचा.

तितक्यातच त्यानं त्याची मैत्रीण ऋतुजाला कॉल लावला. ती बोलायला लागली.

  "संपला का गं ऑनलाईन क्लास'

  "हो रे आताच ,तू नव्हतास का आज ?'

  "अरे हो ना ,आलतो मी पण रेंजच गेली मोबाईलची यार.... आता हा गणिताचा प्रश्न कसा सोडवावा याचा विचार करतोय'

   "टेंशन नको घेऊ मी देते तुला नोट्स'

   "अरे यार ,नववीच्या गणिताचे व्हिडीओ खूप शोधले पण भेटले नाही यार युट्युबवर. एक दोन सापडले पण जो चाप्टर हवा होता तोच नव्हता.एक काम कर त्या 11व्या चाप्टरचे फक्त नोट्स दे मला ,बाकीचं आहे माझ्याकडे.'

   "अरे तुला देते मी पूर्ण नोट्स ,नको टेंशन घेऊ'

   "ऋतुजा थॅंक्स हा ,यू आर आल्वेज हेल्पिंग मी. हे बीसी पोरं मदतच नाही करत माझी कधी.'

   "वेलकम ,आणि हे बीसी बीसी करणं बंद कर हे त्या प्रथमेशलाच शोभतं तुला नाही. मी उपदेश नाही करत पण तुझं वर्गात आणि माझ्या मनात एक स्टेटस आहे ते अबाधित राहावं असं मला वाटतं.ताप कशी आहे आता तुझी ?'

   "बरी आहे ,म्हणजे कमी झाली....तू बोलतेस तर पळालीच आता.'

   "सुमीत फ्लर्ट मग करू सध्या अभ्यास करू ,काहीतरीच काय बोलतोस तू पण'

    तितक्यातच सुमीत म्हणाला "ओके जान ,ठेवतो आता.अभ्यास पण पडलाय.ऑनलाईन लेक्चरनंतर होमवर्क कमी होईल वाटलं पण आधीपेक्षा दुपटीने वाढलाय."

   "परत जान का ,काय रे तू ,ओके चल बाय' असं म्हणत गालातल्या गालात हसत ऋतुजाने कॉल ठेवला आणि सुमीतविषयी आठवत मंद मंद स्मितहास्य करत अभ्यास करायला लागली.

"मम्मी ,माझं घड्याळ पाहिलं का गं ?' सुमीत म्हणाला.

 "अरे ,ठेवलं असेल तिथे बेडच्या बाजूला बघ. इतका मोठा पंजाइतका मोबाईल असताना घड्याळाची काय गरज आहे. तुम्ही पोरंही ना ,माझ्या अजिबातच डोक्यात जात नाही'

 "चल आई ,बाहेर येतो फिरून जरा. प्रतिककडे जातो.'

  "अरे थांब थांब ,नाही.....अजिबात नाही. कुठेच अर्जंट कामाशिवाय बाहेर नाही निघायचं.कोरोना खायला उठलाय.न्यूज पाहिल्या का आज. तसंही प्रतिककडे जाणं इतकं महत्त्वाचं नाही.' आई किचनमधून सुमीतचा आवाज ऐकू येताच पळतच बाहेर येत म्हणाली.

  "अरे यार ,दिवसभर बोर झालो मी. लवकरच पागल होईल असं वाटतंय.कुठंच बाहेर जाता येत नाही घरातच पडून राहा.बाहेरही जाऊन काही खूप आनंद होत नाही.सुनसान पडलेल्या रस्त्याला बघून मन उदास होतं.काय करावं काही सुचतच नाही.प्रतिककडे जाऊन थोडंफार बरं वाटेल ,बोलता तरी येईल.घरात बसून काय करू मी ? तू तुझ्या मोबाईलमध्ये मैत्रिणींना बोलण्यात बिझी असतेस.पप्पा दिवसभर घरी नसतात. मित्रही मला एकच आहे - प्रतिक. त्याला भेटलं तर तितकंच बरं वाटेल मनाला'

   आई गंभीर चेहरा करत म्हणाली ," मास्क लावून जा आणि लवकर परत ये.आजकाल खूप उशीर करतोस आणि तुझ्या पप्पांना मला उत्तरं द्यावी लागतात.'

  "थँक्यू मम्मी येतो' असं म्हणत प्रतिक हसत बाहेर निघाला.सँडल घातली सायकल काढली आणि तो प्रतिकच्या घरी गेला.'

दरवाजाची बेल वाजताच प्रतिकने दरवाजा उघडला आणि ते दोघे प्रतिकच्या लहानशा रूममध्ये बसले.प्रतिक म्हणाला ,आज परत रेंज गेलती का मोबाईलची......जिओ ढण ढणा ढण ' आणि जोरजोरात हसायला लागला.

 " काय करू यार ,तेव्हा जिओचं सिम घेतलं.आता पप्पाला सांगून एअरटेलचं घ्यावं लागेल. पप्पा परत चार शब्द सुनावून पैसे देतील.आपलं नशीबच खराब........घरही अशा कोंजाडीत आहे की जरासं हललं की रेंजचा मनोरा धडाधडा कोसळतो'

   प्रतिक म्हणाला ,"जाऊ दे टेंशन नको घेऊ ,मी देईल तुला नोट्स'.

   "भावा आधी मागितलं तेव्हा का नाही दिलं.आता ऋतुजा देतो म्हणाली राहू दे'

    " अरे राणीला दिलत्या मी.बाय द वे ऋतुजा सोडून कुणी मुलगी तुला मदत करत नाही का ,सारखं तिलाच फोन करतोस तू. वर्गात तुला मुली बोलायला तरसतात पण भाव नाही देत तू, त्या ऋतुजाला मात्र बोलताना थकत नाहीत.ती जास्त सुंदर नाही ,हुशार नाही.असं काय आहे तिच्यात भो ,ज्यामुळे ती तुला आवडते कळू दे आम्हालाही'

      " गरजेपुरता मेंदू ,जो तुझ्याकडे अजिबातच नाही' सुमीत हसत म्हणाला.

     "हा चल बस कर ,आता पेन ड्राईव्ह दे. चित्रपट घ्यायचेत ना '

    "हा दे रे ,अॅव्हेंजर एंडगेम पर्यंतचे सर्व भाग आणि वंडर वुमन पण टाकून दे'

    " जस्टीस लिग ?'

    "भंगार आहे नको ,तितकेच बघ असतील तर'

    "ओके भावा ,आहेत लगेच देतो. प्रतिक भाईकडे आला तू. आपण डीसी ,मार्वलप्रेमी आहे हे माहिती नाही का तुला.ऑलटाईम पिच्चर असतात आपल्याकडे'

     "सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझनही दे'

     "बघू नको डोक्याची दही होईल.समजत नाही लवकर किचकट आहे खूप.'

     "ओके जाऊ दे मग ,ते आलं बघ दे.जाऊ दे घरी लवकर.आई येऊ देत नव्हती आधीच ,आलो कसाबसा'

     "घे ,उद्या सात वाजता ये घरी भेटायला आणि ऋतुजाविषयी बोलायचं आहे मला काही तुला. काही सल्ले द्यायचेत.तुझ्या मोहिमेत तू जिंकावं म्हणून'

     "ओके बाय येतो'

    

रस्त्यात कॉल वाजला आणि एका हाताने मोबाईल खिशातून काढत सायकलवरच सुमीतने फोन उचलला.पलीकडून आवाज आला ," सुमीत माझ्या वडिलांना कोरोना झालाय. पूर्ण घराला क्वॉरंटाईन व्हावं लागेल आता.'  

"काय ?' सुमीतला काय करावं कळत नव्हतं.ऋतुजाच्या वडिलांना कोरोना झाला.आता ऋतुजालाही काही दिवस त्रास सोसावा लागणार यामुळे सुमीत दुःखी होता. तितक्यातच समोरून आलेल्या भरघाव बाईकने सुमीतच्या सायकलला टक्कर दिली आणि तो रस्त्याच्या कडेला रक्ताळलेल्या अवस्थेत पडला.मोबाईल अजून वाजतच होता.आईच्या आलेल्या कॉलमुळे मोबाईल वारंवार वाजत होता पण थोड्याच वेळात आईला सांगितलं गेलं "सुमीत वैद्य हॉस्पिटलमध्ये आहे त्याचा अॅक्सिडेंट झाला. तुम्ही इथं या थोड्या वेळात त्याच्या मोबाईलमधून तुमचा नंबर घेतलाय.'

    यावर आईला काय बोलावं कळत नव्हतं.तिच्या डोळ्यांतून आसवं निघत होती आणि मोबाईल हातातून खाली पडला.


Rate this content
Log in

More marathi story from Rushikesh Telange

Similar marathi story from Drama