ओझे
ओझे


"बाळा तू मोठी होवून काय होणार ..?" लहान मुलांना असा काही प्रश्न विचारला कि खूप भन्नाट उत्तर मिळतात. माझ्याच काय आपल्या लहानपणी आपणही खूप काही काही मोठी स्वप्न पाहिलेली होती. मी मोठी होवून हे होणार, ते होणार.... पण प्रत्येक्षात काही आपल्यापुढे वेगळेच मांडून ठेवलेले असते.
माझे आई बाबा दोघेही शिक्षक. त्यामुळे अगदी घरातले वातावरण शेक्षणिक. आपण मोठे होवून डॉक्टर व्हायचं अस मी माझ्या मनाला सांगूनच ठेवलेलं. अगदी तशी तयारीही सुरु केली. शालेय जीवनातली सगळ्यात अवघड पायरी म्हणजे १०वी. ती मी अगदी सहज चांगल्या गुणांनी पार केली चांगले गुण मिळाल्यामुळे एका नामवंत कॉलेजला कि जिथे फक्त मेरीट ची मुल घेतली जातात अश्या एका नामवंत कॉलेज ला प्रवेश मिळाला. अर्थातच कॉलेज दुसऱ्या गावी असल्यामुळे मला माझ घर सोडव लागलं. मी आयुष्याच्या अश्या वळणावर येवून पोहोचलेले कि जिथे मनाला कोणती बंधने नको असतात. जणू हे जग फक्त आपल्यासाठी आहे अस वाटू लागत. माझाही तसाच झालं. मला पंख फुटलेत कि काय अस वाटू लागलेलं. ह्या पंखांनी सगळ जग फिरून याव अस वाटायचं. अभ्यास काय परत करता येईल तो कुठे जाणार आहे पण आताचा क्षण परत नाही असा काहीसा दृष्टीकोन झालेला. मी वाहवत गेले. डॉक्टरकीची परीक्षा जशी जवळ येत होती तेव्हा मात्र मला भीती वाटायला लागलेली. काय होईल, आपल्याला चांगले गुण मिळतील का आणि नाही मिळाले तर काय अश्या खूप गोष्टी मनात येवू लागल्या. खरतर हा विचार करायची वेळ माझ्या हातातून कधीच निघून गेली होती. मला आता त्या भल्या मोठ्या परीक्षेला सामोरे जायचं होत आणि मी गेले. माझ्या घरच्यांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या पण माझ्या मनाला माहित होत आपल केवळ फसवणूक केलीये आई बाबांची आणि स्वतःची. आणि तसाच निकाल आला मला अजिबात चांगले गुण मिळाले नव्हते.
माझा आता रडून काही उपयोग होणार नव्हता हे मला माहित होतं. आता आयुष्य फक्त प्रश्न मांडत होतं. आपण हे करू शकलो असतो हे मला माहित होतं. म्हणून मी ती परीक्षा पुन्हा द्यायची ठरवलं. मी हे स्वतःसाठी आणि आई बाबांना फसवलं म्हणून केलं. ह्या काळात मला खूप लोक सल्ले द्यायचे नको करूस, आहे त्या मार्क्सवर तुला कुठेतरी प्रवेश मिळेल. सोबतची मुलं माझ्यापुढे निघून गेलेली अन् मी अजून तिथेच ही गोष्ट मला झोप लागू देत नव्हती तरीही मन लावून अभ्यास केला आणि परत त्या परीक्षेला सामोरे गेले.
पण आयुष्य म्हणजे काही कोणता चित्रपट नही कि आता climax नंतर सगळ काही ठीक होणार. आयुष्य आपल्याला कुठे नेवून ठेवेल हे कोणीही सांगू शकत नाही. मी ह्यावेळी पण परीक्षेत चांगले मार्क्स मिळवू शकले नाही पण मला ह्यावेळी कोणतेच ओझे वाटत नव्हते कारण मी स्वतः साठी काहीतरी केल होत. ह्यात मला माझ्या आई बाबांनी कधीच एकट सोडलं नाही. मी आता एका मला आवडते त्या कॉलेज मध्ये शिकते. कोणत कॉलेज?काय शिकतेस? हे सांगून कोणी मला डॉक्टर पदाविशी तुलना करू नये अस वाटतं. मला डॉक्टर झाले नाही ह्याची खंत नाही. मी कदाचित ती परीक्षा परत दिली नसती तर कायम मनावर ओझे घेवून जगले असते की थोडं भान राखून केलं असते तर आज काहीतरी वेगळं असतं. खरंतर बाकीच्यांसाठी मी केवळ एक परीक्षा दोन वेळा दिली पण माझ्यासाठी तो अनुभव माझा जगण्याचा दृष्टीकोन बदलवून गेला...