ती आणि ती (भाग १)
ती आणि ती (भाग १)


“रिया , उठ ! सकाळचे १० वाजत आलेत तरी अजून लोळत पडलीयेस . मी तुला शेवटचा आवाज देतेय परत उठवणार नाही .” पलंगाशेजारी उभ्या असलेल्या मिनू चे हे शब्द कानावर पडल्यावर उशीला मिठी मारून झोपलेली रिया डोळे चोळत उठली. “ ए काय ग अजून थोडावेळ झोपले असते ना...” उघडता न येणारे डोळे कसेबसे उघडत मिनूच्या अंधुक आकृतीकडे बघत रिया बोलत होती. रिया आणि मिनू ह्या दोघी गेली २ वर्षे रूम मेट होत्या. ह्या दोघी म्हणजे अगदी एकमेकींची विरुद्ध टोक. मिनू अगदी सरळ वागणारी, दिवसाच्या वेळा काटेकोर पळणारी, सगळी काम वाटून दिलेल्या वेळेतच करणारी. ती एका कंपनीत काम करायची तर रिया एकदम विरुद्ध म्हणजे उशिरा उठणारी, निष्काळजी,एकदा ठेवलेली वस्तू तिला परत त्याच जागेवर कधीच सापडत नव्हती . तरीही त्या दोघी अगदी सख्या बहिणीसारख्या राहत होत्या. रिया एका बुटिक मध्ये कामाला होती. त्यातून तिला तिच्या दररोजच्या गरजा भागतील एवढे पैसे मिळत होते. ती कामावर कधीही वेळेत नसायची. ह्याच कारणामुळे तिला खूप वेळा नोकरी लागली होती. मिनुला दिवसातून खूप कमी वेळ तिच्या स्वतःसाठी मिळत होता, तर रियाला वेळच वेळ होता. ती त्या वेळात काहीबाई लिहून काढायची. तिला पुस्तक वाचायला खूप आवडायची. तीन लिहिलेलं कंटाळून आलेली मिनू कसतरी ऐकायची.
सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपलेल्या रियाला उठवून मिनू तिच्या कामाला लागली .....
( To be continued….)