Prachi Karne

Drama Others Romance


3  

Prachi Karne

Drama Others Romance


ती आणि ती भाग २

ती आणि ती भाग २

1 min 709 1 min 709

            ( भाग २ )


             मिनू रियाला उठवून तिच्या कामाला कधीच निघून गेली होती. रियाने नंतर नाईलाजाने उठून आवरायला सुरुवात केली. अगोदरच उशीर झालेली रिया कशी तरी railway platform वर पोहोचली पण तिच्या नशिबात आज काहीतरी वेगळ लिहील होत. तिची नेहमीची ट्रेन सुटली आणि आता तिला पुढच्या ट्रेनची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. नंतरची ट्रेन येईपर्यंत काय करायचं म्हणून कधीही आवडीने न उघडणारे facebook उघडले. अगदी पांचट, उगीच हसू आणणाऱ्या postला हि ती likeकरत बसली होती.

            बर्याच दिवसातून facebook वर activeआल्यामुळे तिला खूप notification आल्या होत्या. एक एक करून ती तिच्या मोबाईलची स्क्रीन scroll करत होती. त्यात एक तिच्या शाळेतल्या मित्राची होती. शाळेत असताना तिला तो आवडायचा. साहजिकच ती खुश झाली. मिळमिळीत चाललेल्या life मध्ये आता नवीन काहीतरी फोडणी लागणार होती. तिने नितीन ला कसलाही विचार न करता friend request send केली आणि तोवर ट्रेन आल्याचा भोंगा वाजला.

           रियाने पटकन मोबाईल बंद केला अन त्या तोबा गर्दीतून वाट काढत ट्रेन मध्ये चढली....


                                                                                     ( To be continue…..)


Rate this content
Log in

More marathi story from Prachi Karne

Similar marathi story from Drama