Dhanraj Kalyankar

Drama Fantasy

4.0  

Dhanraj Kalyankar

Drama Fantasy

नाते जन्माचे

नाते जन्माचे

2 mins
232


सुरेश : अरे यार, कुठे बाहेर जायचे म्हटले की सुरू होते यांचे इमोशनल ड्रामा. त्यामुळेच मला सारखे सारखेे गावी यावेसे वाटत नाही. मी काय कायमचा चाललोय का? नोकरीच्या ठिकाणी तर चाललोय. 

नरेश : तू याला इमोशनल ड्रामा म्हणतोयस??? व्वा सुरेश व्वा.... वाटलं नव्हतं तू अस बोलशील?

सुरेश : बोलू नको तर काय करू?

नरेश : सुरेश ते आईवडील आहेत तुझे. लहानाच मोठं केलं. संस्कार केले. शिकवले आणि त्यांच्याबाबतीत तू अस बोलतोयस. ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून....

सुरेश : अरे मला नाही आवडत असलं इमोशनल ड्रामा.... नाहीतर माझ्या संपूर्ण प्रवासाचा मुड जातो. ते रडणं, सतत काळजी करणं, कोणाशी विनाकारण वाद घालू नको असं सांगणं. मी काय लहान आहे का आता?

नरेश : तुझ्या बॅगेत काय आहे ते खूप जड आहे?

सुरेश : कपडे, पुस्तक आणि आईने लाडूचे दोन डब्बे दिले आहेत.

नरेश : या डब्ब्यामुळेच बॅग लई जड झाली. एक काम करुत. डब्बे वापस घरी नेऊत. म्हणजे बॅग जड नाही वाटणार.

सुरेश : नाही नको, मीच सांगितलं आईला लाडू करायला.

नरेश : पाहिलंस ना.... तू जाणार आहेस म्हणून तुझ्यासाठी तुझ्या आईने रात्री उशिरापर्यंत लाडू केलेत. का तर तुला कधी खावेसे वाटले तर खाता येईल म्हणूनच ना. बाबांनी तुझ्या खिशात काय ठेवलेत?

सुरेश : बाबांनी 200 रुपये ठेवलेत....

नरेश : तुला 40 हजार पगार असताना सुद्धा तुझ्या बाबांनी तुझ्या खिशात 200 रुपये ठेवलेत. याला इमोशनल ड्रामा म्हणतोस. अरे यालाच तर प्रेम म्हणतात....

( थोडा वेळ दोघेही शांत बसतात. मग नरेश पुन्हा बोलायला सुरुवात करतो. )

नरेश : काही झाले तरी ते तुझे आईवडील आहेत. त्यांना तुझी काळजी वाटणं स्वाभाविक आहे. ते नाही तर कोण काळजी करणार? या जगात आईवडिलांशिवाय कोणी नसते आपलं.... आई वडील नाहीत त्या मुलांना विचार आई वडील नसण्याचे दुःख काय असते..... त्यातल्या काही जणांनी त्यांच्या आईवडिलांचे चेहरे देखील पाहिले नसतील.... आणि तुला आई वडील असून सुद्धा त्यांच्याबद्दल अस बोलतोयस.... तुला आई वडील आहेत हे तुझ नशीब समज.... नाहीतर आज तू अनाथ म्हणून अनाथाश्रमात राहिला असतास.... तिथे तुला प्रत्येक क्षणी हेच वाटेल की मला माझे आईबाबा असते तर....❤

सुरेश : सॉरी रे.... मी अस बोलायला नको होतं. मी खूप चुकीचे बोललो. माझे आईबाबा माझ्यावर खूप प्रेम करतात. हॉस्टेलवर असताना एका मित्राने माझ्या आईबाबांना फोन करून सांगितले की सुरेश चा अपघात झालाय. तेंव्हा माझे आईबाबा दुसऱ्याच दिवशी हॉस्टेलवर आले. तिथे आल्यानंतर कळलं की अपघात माझा नाही सुरेश नावाच्या दुसऱ्या मुलाचा झाला आणि मित्रांनी चुकून माझ्या घरी फोन लावून कळवले. तेंव्हा ते दोघेही मला जवळ घेऊन रडू लागले. देवाचे आभार मानू लागले. मला त्यांनी आयुष्यात कधीच काही कमी पडू दिले नाही.... आणि मी त्यांच्याबाबतीत असं बोललो.....

नरेश : तुला वेळीच लक्षात आलं ते बरं झालं.... आपले मित्रत्वाचे नाते नंतर झाले पण आईवडिलांशी तुझे नाते जन्माचे आहे.... त्यांच्याबाबतीत असं काहीही बोलू नकोस....


***********


❤आई बाबा

हेच तुमची खरी संपत्ती

हेच तुमचे मार्गदर्शक

हेच तुमचे नायक

हेच तुमचे गुरु

हेच तुमचे अस्तित्व

आणि

हेच तुमचे आयुष्य


आणि आईबाबा हेच तुमच्यावर प्रेम करणारी जगातील सगळ्यात जास्त प्रेमळ व्यक्ती आहेत...

************


Rate this content
Log in

More marathi story from Dhanraj Kalyankar

Similar marathi story from Drama