मुलगी बाबांसाठी पहिलीच असते
मुलगी बाबांसाठी पहिलीच असते
एकदा शाळेत धावण्याची स्पर्धा होती, मुलगी बाबांना म्हणते बाबा मला शाळेत घेऊन चला न आज शाळेत स्पर्धा आहे. बाप लेकी दोघेही शाळेत जण्यासाठी निघतात. मुलगी बाबांना रस्त्यात विचारते कि , बाबा मी स्पर्धेत पहिले तर येणार न? बाबा मुलीला कुरवाळत म्हणतात हो बेटा तू स्पर्धेत पहिलीच येणार.मुलगी बाबांना थांबवुन स्पर्धेसाठी जाते.
स्पर्धा झाल्यावर मुलगी बाबांकडे रडत रडत येते.
बाबा तिला विचारतात का ग अशी का रडतेे?
ती बाबांना सांगते मी स्पर्धेत पहिली नाही पाचवी आली. तर बाबा तिला म्हणतात की बेटा तू रडू नको.
तू खूप मेहनत घेतली होती स्पर्धेसाठी. तु बाकी सर्वांसाठी पाचवी आली तर काय माझी मुलगी माझ्यासाठी पहिलीच आहे.
बाबांसाठी आपली मुलगी नेहमी पहिलीच असते.
