STORYMIRROR

om kamble

Drama Others

3  

om kamble

Drama Others

मरावे परी...?

मरावे परी...?

2 mins
228

समाज म्हटला कि वेगवेगळ्या प्रथा , पद्धती , चालि रिती ह्या आल्याचं . तसेच आमच्या चर्मकार समाजात प्रेताबरोबर महिलाही स्मशानात जातात . तसेच एका नातेवाईकांनाच्या प्रेत यात्रेत सामील होऊन मी सुद्धा स्मशानात गेले . माझ्या आईने कधी तरी म्हटलेले आठवले कि , "मरण दार व तोरण दार कधी हि चुकवू नये ". पण मला मात्र वेगळाच अनुभव आला . मृताचे जवळ चे नातेवाईक येणार म्हणून वाट पाहत होतो . बसल्या बसल्या एका ने सुरवात , केली अहो नुसता शरपंजर झाला होता . तेवढ्यात एक बाई पुटपुटली , " काय ? आणि आता हा कसला नवा आजार ?" त्याचा शेजारचा म्हणाला , "अहो शर म्हणजे बाण आणि पंजर म्हणजे पिंजरा . अहो त्याचे शरीर म्हणजे हाडांचा पिंजरा झाला होता ." अस्से होय ! अहो हल्ली काय नवनवीन आजार येतात , मला वाटले त्यातलाच एक आजार ! काय करणार ? सून त्रास देत होती खायला काय देत नसल्या मुळे अशी हालत झाली बिचारच्याची .


दुसरा म्हणाला ," ती तरी काय करणार ?" मुलगा निघाला बेवडा . घरात पैसे दिले तर ती करणार ना ? तेवढ्यात कोपऱ्यातली आजी पुढे आल्या आणि म्हणाल्या अहो ! "जावयाने म्हणे घर आपल्या नवा वर करून घेतले ." झाSSले . अशी असंख्य पाय असलेली विषयाची गोम पुढे पुढे सरकत चालली . एका तून अनेक विषय रंगत गेले . आणि त्या मृताच्या आयुष्याच्या चित्रपट उभा केला . तेवढ्या वरच न थांबता त्याचे चाल चलन , शेजारणी बरोबरचे त्याचे संबंध . मेलेल्या माणसं बदल चांगले बोलल्यास त्याला स्वर्गात प्रवेश मिळतो असे ऐकले होते .इथे तर त्याचा बद्धल कोणी चांगले बोलायलाच तयार नव्हते . त्याला तर नरकातच ढकलण्याचा जणू चंगच बांधला होता असे दिसते .एकी कडे क्रिया चालू असता दुसरी कडे प्रतिक्रिया थांबताच नव्हत्या .माणूस प्रत्यक्ष पाहणं ,दिसणं , अन अनुभवानं ह्या तीनही गोष्टी भिन्न भिन्न आहेत ह्याची सत्यता पटली . ' दिसतं तस नस्ता ' म्हणून जग फसतं . ह्याही म्हणीचा प्रत्यय आला .


तेवढ्याच जोराचा हंबरडा फोडत कोणी तरी महिला येताना दिसली . "गेला जिवा भावाचा पाठीराखा गेला ". " माझा वाली गेला ". असा आक्रोश करीत ती प्रेतावर आडवी पडली . तिला बाजूला करत असताना कळले की , "ती त्याची सख्खी बहीण होती ." तिनी रडत रडत आपले लग्न कसे केले , मुलाच्या शिक्षणासाठी कशी मदत केली , घरी उभे करून देण्यात किती सहकार्य केलं हे सांगत तिने जणू त्याचा सत्कर्माचा चित्रपट उभा केला आणि क्षणार्धात सर्वांच्या त्याच्या विषयी चाललेल्या कुचाळक्या थंडावल्या . जिच्या साठी इतका वेळ थांबलेला विधी उरकण्यात आला . आणि ह्या सर्वांचे त्याच्या विषयी चाललेल्या दुष्कृत्यच्या सरपणालाही भडाग्नी मिळाला . जगात कुणा विषही कोणी काय बोलावे या वर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही . पण त्या कडे दुर्लक्ष करणे हे तर आल्या हातात असते कितीहि जगले कोणी कोणा साठी , कोणीच कोणासाठी मरत नाही . अनुभव तर प्रत्येक क्षणाला येत असतात पण नशिबाचे चक्र थांबवता येत नाही . असे म्हणत विषण्ण मनाने मी घरी परतले.                                                             -


Rate this content
Log in

More marathi story from om kamble

Similar marathi story from Drama