Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Poonam Tavkar(Patil)

Tragedy


2.4  

Poonam Tavkar(Patil)

Tragedy


मॉडर्न स्त्री आणि शृंगार

मॉडर्न स्त्री आणि शृंगार

3 mins 19.1K 3 mins 19.1K

परवा आमच्या जवळच्या नातेवाईकाच्या मुलाचा वाढदिवस होता. पहिलाच वाढदिवस असल्या कारणाने भरपूर लोकांना आमंत्रण होते. संध्याकाळच्या वेळी पार्टी साठी मी तयार होत असताना कितीतरी वेळ आरशासमोर उभी राहून हि साडी चांगली दिसतीये का ती साडी असा माझा खेळ चालू होता. पार्टीचे आम्हाला खास आमंत्रण होते त्यामुळे जरा नीटनेटके तयार व्हावे असा तिचा आपला भाबडा विचार होता. काहीकेल्या साडी काही पसंद पडत नव्हती. एव्हाना घरातल्या बाकीच्या मंडळींची तयारी झाली होती. माझंच काय ते आवरायचे बाकी होते पण काय घालू हा मोठा प्रश्न सुटत नव्हता. शेवटी मी पुन्हा एकदा कपाटात नजर फिरवली. यावेळेला मात्र खालच्या कोपऱ्यात ठेवलेला एक अनारकली ड्रेस माझ्या नजरेनी हेरला. लाल रंगाचा तो ड्रेस अगदी आकर्षक होता. मग मात्र मी पटापट आवरून छान तयार झाले आणि सगळे कुटुंब पार्टीसाठी निघालो.

वाढदिवसाच्या पार्टीचे जय्यत आयोजन झाले होते. आम्ही जिथे बसलो होतो तिथेच बाजूला पाच सहा बायकांचा घोळका बसला होता. साधारण पन्नाशीतल्या असाव्यात त्या सगळ्या. त्यांच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग डिस्कशन चाललेलं दिसत होते आणि हावभाव तर अगदी बघण्यासारखे होते. समोरच्या दिशेने उभ्या असलेल्या दोन मुलींना टार्गेट करून या बायकांची बडबड सुरु होती. त्या दोघीही मुली मॉडर्न तरुण वयातल्या होत्या. त्यांचा वनपीस आणि शृंगार या बायकांना खटकला होता. खरे तर त्या दोघीही मुली वनपीस मध्ये सुंदर दिसत होत्या. जरी मॉडर्न वाटत असल्या तरी आकर्षक होत्या. पण घोळक्यातल्या बायकांचे म्हणणे काय तर हे असले तोकडे कपडे घातलेत, यानां काही संस्कारच नाहीत. लग्न झालंय पण पायात जोडवी नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही कि कपाळावर टिकली नाही. स्त्रीचरित्राची काडीचीही समज नाही बुवा या पोरींना असे त्यांच्यामधीलच एक बाई पुटपुटली.

समोरच्या मुलींना असं नखशिखांत न्याहाळून त्या बायकांचे गॉसिप सुरु होते. मला मात्र त्यांचे विचार पटत नव्हते. वनपीस घातला म्हणून का कोणी चरित्रहीन होत नाही. टिकली, मंगळसूत्र, जोडवी हा शृंगाराचा भाग आहे पण त्याची सक्ती नसावी. कुणी काय घालावे, कसे दिसावे हे ज्याची त्याची इच्छा. आपल्या आवडीनुसार स्वतःला शोभेल असे कपडे आपण जर घातले तर त्यात वावगे ठरण्यासारखे ते काय ना? मॉडर्न स्त्री म्हटले कि तिच्या संस्काराचा पाढा गिरवायला चारचौघे येतातच, मग भलेही त्या स्त्रीमध्ये कितीही चांगल्या कला असल्या, ती कितीही उच्चशिक्षित का असेना पण समाजासमोर हे सगळे दुय्यमच ठरते. जग कितीही पुढे जावो पण विवाहित स्त्रीने कसे राहावे हे आपल्याकडे समाजच ठरवणार.

स्त्रीचा खरा शृंगार हा तिचे व्यक्तिमत्व आहे. आजच्या आधुनिक युगात स्त्रीला देखील विचाराचे स्वातंत्र्य आहे. तिच्यावर सक्तीचा शृंगार न लादता तिचे व्यक्तिमत्व स्वीकारले पाहिजे. स्वतःच्या मतांनी तिला चरित्रहीन ठरवण्यापेक्षा तिच्या विचारांचा आपण सन्मान केला पाहिजे. शेवटी स्त्रीचे मन जाणून घेणे हि आजच्या काळाची गरज बनली आहे. आम्ही पार्टी संपल्यावर तिथून निघालो तरीही माझे मन त्या बायकांच्या विचारांभोवती घुटमळत होते. असे वाटत होते कि त्यांना जाऊन समजवावे कि तुम्ही स्वतः एक स्त्री असूनहि दुसऱ्या स्त्रीचरित्राच्या नावाने शंख का फुंकता. आमच्यावेळेला हे असले नव्हते असे खुशाल बोलून मोकळे होण्यापेक्षा बदलत्या पिढीला समजून घेणे जास्त महत्वाचे ठरेल. प्रत्येक स्त्रीला या बदलत्या समाजात मनमोकळेपणाने वावरता येईल असा समाज आपण सगळ्यांनी परिवर्तित केला पाहिजे असे मला तरी मनापासून वाटते.


Rate this content
Log in

More marathi story from Poonam Tavkar(Patil)

Similar marathi story from Tragedy