STORYMIRROR

Minakshi Wakode

Inspirational

3  

Minakshi Wakode

Inspirational

मन रे

मन रे

4 mins
213

मित्रांनो...  आज मी माझ्या लेखामधून आपल्या सर्वांच्या ओळखीचा विषय 'मन' यावर माझे विचार मांडले आहे....

 

मन हे कसे आहे???

 आपल्या मनाला समजून घेताना आपण गोंधळतो..मन हे कधी खूप हळवं वाटू लागते,तर क्षणात क्रूर. कधी कधी चौफर आनंद उधळणार,चांदण्यासारखं लखलखीत, तर क्षणात अमावस्येच्या अंधाराप्रमाणे भयाण आणि एकट....कधी कधी एकदम स्वछंद,परोपकरी,दुसऱ्याचं हित साधणार अस,तर क्षणात खूप कपटी,लोभी, मी आणि सर्व काही माझं मानणार....


खर तर मनाच खूप कुतूहूल वाटत,मनाचा कधी थांगच लागत नाही...

   आता तुम्ही म्हणणार...जगातील सर्वात वेगवान गोष्ट म्हणून असच ओळखतात होय मनाला???

  अगदी बरोबर..मन हे खूप चंचल आहे.क्षणात इथे आहे तर क्षणात कुठे.

या मनाचे विश्लेषण संत बहिणाबाई चौधरी यांनी....


   मन मोकाट मोकाट

   त्याले ठायीं ठायीं वाटा

    जशा वाऱ्यानं चालल्या

    पाण्यावरल्या रे लाटां


       अशा सुंदर ओळीमध्ये केलेले आहे..


मन हे असेच आहे,अल्लड..उनाड..कधी मनामध्ये कोणती गोष्ट येईल सांगता येत नाही..

आपल्या आनंदासाठी, सुखसोयीसाठी जी गोष्ट आवडली,मनात बसली ती पाहिजेच असते.त्यासाठी आपण आपले प्राण पणाला लावतो..

कधी रुसून,फुगून,रडून,अट्टहास करून आपण ती वस्तू मिळवतो.. तोपर्यंत आपल्या मनाला समाधान मिळत नसत.

 

मन हे काही फक्त वस्तुसाठीच आग्रह करतो अस नाही बर...

    मनाला हवं असत प्रेम.जिव्हाळा , आपुलकी,आधार,नात्यामधला गोडवा..आणि हे शोधताना तर मन कसलीच हयगय करत नसते.

एखाद्याचा प्रेमाचा आधार मिळाला तशी हक्काची माणसे जीवनात असली तर आयुष्य हे सोन्याहून पिवळं वाटू लागत..एकदा एकमेकांचे विचार पटले,मने जुळाली    तर या व्यक्ती जिवापेक्षा जास्त प्रिय आणि सुंदर मनाच्या 


'तुझे मन गार गाढ कुळागरातील तळी'

उदासीच्या एकांतात पितो ओंजळी ओंजळी


अस वाटू लागत...


पण मित्रांनो आपण मनाबद्दल बोलतोय..मन अस आहे हे वाटे पर्यंत ते बदलत.ते जस आत्ता आहे तसच निरंकाळ राहत नाही..ते एका ठिकाणी स्थिर नसत.कधी पाखरासारखं जमिनीवर तर क्षणात आकाशात.....

..आता तुम्ही म्हणाल हे काय नवीनच??


 प्रेमाच्या या भावनेच्या थोड पुढे गेल तर मनाची एक नवीन शक्ती अनुभवायला मिळते.

राग,द्वेष ,मत्सर,

        एखाद्या व्यक्तीचे वर्तन तुमच्या मनाला पटले नसेल,किंवा एखाद्याचे बोलणे टोचले असेल,हृदयाला लागले असेल.

    अशावेळी मनावर संयम ठेवणे मन शांत ठेवणे खूप कठीण वाटू लागते.मग अशावेळी तळपायातली सरळ मस्तकात जाते..आणि या मनाच्या विकृतीमुळे अपहरण,बलात्कार,खून, यासारखे गुन्हे घडत असतात..

 पुन्हा संत बहिणाबाई चौधरी यांच्या ओळी मांडव्याशा वाटतात...

   मन जहरी जहरी

   याचं न्यांर ते तंतर

   आरे,इचु साप बरा

    त्याले उतारे मंतर!

खरंच हे मानवी मन खूप खूप जहरी आहे..एखाद्याचा सर्वनाश करायचा ठरविल्यास ते कुठल्याही विकोपाला जाऊन पोहोचत...


  या अस्थिर मनाला आवर घालणे खूप महत्वाचे असते..एखादी वाईट कृती करत असताना,ती कृती करू नको म्हणून जोराने ओरडून सांगणारा एक आतला आवाज असतो..तो असतो आपल्या चांगल्या मनाचा आवाज..तो आपल्याला योग्य मार्ग दाखविणारा आणि हित जपणारा असतो...त्या मनाचा आवाज ऐका..काही वेळासाठी होणाऱ्या त्रासामुळे,अपमानामुळे, किंवा सुड घेण्याच्या भावनेने कोणाच्या आयुष्याची माती करू नका..योग्य संगतीत रहा. शांत आणि समाधानी जीवन जगा.आपल्या वर्तवणुकीचे ठसे हे इतरांच्या जीवनावर उमटलेले असतात.


मन हे थोड्या थोड्या गोष्टींनी सुखावून

 जात आणि थोड्या थोड्या गोष्टींनी दुखत.

 प्रत्येक व्यक्ती हा मनाच्या जाळ्यात सापडलेला आहे,आणि दिवसेंदिवस घायाळ होत चाललेला आहे..

प्रत्येकांच्या मनाला कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी हेरलेलं असत.त्यामुळे मनुष्य ती एक गोष्ट बाजूला सारून बाकीच्या चांगल्या गोष्टींचे स्वागत करत नाही.तो त्याच गोष्टीत पूर्णपणे बुडून जातो.


मनुष्य हा आपल्या दुःखामुळे नाही तर इतरांच्या सुखामुळे दुखी असतो.आणि ती गोष्ट आपल्याजवळ नसल्याचा दोष नशिबावर देत फिरतो.


कधी कधी परिस्थिती इतकी प्रतिकूल होऊन जाते की मनुष्य फक्त हातपाय चोळत घरी बसतो.नाही तर स्वतःची किव करायला लागतो. किव करणे ही मनाची अत्यंत भयानक आणि घातक भावना आहे..


त्यामुळे माझं सर्वांना एकच सांगण आहे,आपल्या मनामध्ये येणाऱ्या सर्व वाईट विचारांचे आजच विसर्जन करा.आणि त्या विचारांना पुन्हा आमंत्रण देऊ नका..वाईट संगत ,विचार यांच्या आहारी जाऊ नका.आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका..आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा.आपली बरोबरी इतरांशी करू नका.आपले प्रयत्न वाढवा.आपल्या ध्येयाला स्वप्नांना पूर्ण वेळ द्या..प्रेम द्या आणि प्रेम घ्या.

मनाला कैद करून ठेवू नका.उडू द्या त्याला उंच भरारी घेण्यासाठी......


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational