जपावी ती माणसे
जपावी ती माणसे
सकाळची सर्व कामे आटोपवून मी गडबडीतच नाश्ता केला,ऑफिस च सर्व सामान ,टिफिन ,बॉटल,आणी बॅग घेऊन भराभर रस्त्याने लागले.
सकाळी दहा वाजताची ची बस होती.त्यामुळे घाईघाईने रस्ता पार करत होते.जाताना मनातच ऑफिसला कोणते काम सर्वात आधी कारायचे नवीन काही सुचत का? हा विचार मनात होता.
रस्त्यावरुन जाताना टपरिवरचा चहा,जलेबी,गरमागरम भजी अचानक लक्ष वेधुन घेत होता.पण मनावर नियंत्रण करून पुढे जायला निघाले.
रस्त्याच्या बाजूला काही मुले विटीदांडू खेळत होती.मी ही बालपणात हरवले.म्हटलं नशीब काही प्रमाणात का होईना पण मुले मैदानावर खेळ खेळतात हे महत्वाचं.त्यामुळे व्यायाम होतो.शरीर निरोगी राहते.खूप भूक लागते.आणी मुले सुदृढ राहतात.
रस्ता क्रॉस करणारच इतक्यात,समोरच्या गल्लीमधून काही मुलांचा घोळका बाईक रेसिंग करत खूप स्पीड नी आला.त्यातील एका मुलाच्या बाईक चा कट एका वृद्ध म्हातारीला लागला आणी ती खाली पडली.
बाईक चा समतोल राखता राखता त्याची गाडीही समोरच्या बाभळीच्या झाडाला टक्कर होऊन खाली पडली.त्याला कुठेच इजा झाली नाही.मी रोखलेला श्वास सोडून शांत झाले.
मुलाने गाडी बाजूला लावली.सर्वांना वाटल तो त्या आजीची विचारपूस करायला येणार.
त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव नक्कीच झाली असेल.यानंतर तो आणी त्याचे मित्र असे वागणे कायमचे सोडून देतील.
मी ही त्या आजीकडे जायला निघाले.पण सर्व विपरीत घडले.त्या मुलाने त्या आजीची विचारपूस न करता,आपल्या गाडीला कुठे क्रॅश झाले का?काही तुटलं वगैरे तर नाही हे चेक केले आणी "जस्ट चिल ब्रो म्हणत,मित्रांना इशारा केला,आणी तो आणी त्याचे मित्र कानात हेडफोन लावून भरकन तिथून निघून गेले.
इकडून तिकडून चार ,पाच माणसे गोळा झाली.त्यांनी त्या आजीला उचलले.मी त्या आजीला पाणी दिले.आणी त्यांना ऑटोमध्ये बसवून दिले.
राग अनावर झाला,वाटल कशी ही आजची पिढी.हल्ली माणुसकी चा पार विसर पडताना दिसतोय.आणी यांचे पालक एवढ्या लहान वयामध्ये कसे काय बाईक ,मोबाईल हाती देतात??.
यांना समजून सांगणारे नाहीत की ही पिढी समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही.या घटनेने खूप मोठे रूप घेतले असते,एखाद्याचा जिवसुद्धा गेला असता.मग त्या मुलांनी कसे एवढे हलके झाले,त्यांना त्याच्या वागणुकीचा पच्छाताप का झाला नाही.
पालकांनी खरच आपल्या पाल्याप्रती खूप सतर्क राहायला हवे.आजचा छोटा हट्ट ही पाल्याची जिद्द बनणार नाही याची काळजी घ्यावी.आणी सर्वात महत्वाचं म्हणजे वस्तू नाही तर माणसे जपायला शिकविण्याचा आग्रह पालकांनी धरावाच.
