मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

3.5  

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

मी स्वातंत्र्यसेनानी बोलतोय!

मी स्वातंत्र्यसेनानी बोलतोय!

2 mins
188


क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके ह्यांचा स्मृतिदिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला.... आम्ही स्वातंत्रसेनानी ना.... सत्कार मूर्ती म्हणून आमंत्रित केले..... म्हणून गेलो कार्यक्रमाला.....(असेही आम्ही शोभेपुरते मर्यादित झालोय म्हणा)आजकाल अशा कार्यक्रमांची यादीच असते या पुढाऱ्यांकडे... त्या निमित्ताने त्यांना स्वतःचा, स्वतःच्या पक्षाचा प्रसार करता येतो ना... माझा विरोध कार्यक्रमाला नाहीच... पण त्याचे भांडवल केले की त्रास होतो...असो... मुद्दा हा नाहीच खरं तर....

     

भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यायासाठी, त्यासाठी प्राणाची ही पर्वा न करणार, देशभक्तीन सळसळणारं रक्त आमच्या पिढीच होतं. तो काळच वेगळा होता. परकीय सत्तेला भारतातून घालवणे तसे सोपे काम नव्हतेच. प्रत्येकाच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द पेटून उठली होती. जो तो आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत होता. मीही त्यापैकी एक. हातात हात देऊन एकसंघ होऊन आम्ही झटलो. स्वातंत्र्य, शिक्षण, समानता आशा विविध विषयांवर जागृती होत गेली. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाले.


     आज एवढ्या वर्षानंतर मला हा प्रश्न पडला आहे की, आम्ही जो त्याग केला, यातना सहन केल्या त्याच फलित ते काय?ही.... ही अशी पिढी??जिच्या मनात आई वाडीलांबद्दल आदर उरला नाही, देशभक्ती वगैरे तर फार दूरची गोष्ट झाली हो.... वास्तव उघड्या डोळ्यांनी पाहावं लागत आहे हीच शोकांतिका आहे खरं तर... स्त्रियांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या हक्कासाठी झटणाऱ्या प्रसंगी अंगावर चिखल, दगड घेणाऱ्या आपल्या सावित्रीबाईंच्या भारतातील स्त्रिया केवळ त्यांना स्वतंत्र मिळाल म्हणून व्यसनाधीन होऊन राजरोसपणे वावरतातआणि मग आकस्मित घटनेस बळी पडतात... तेव्हा मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. अर्थात सर्वच स्त्रिया तशा नसतात... पण हे सत्य आहे आणि ते नाकारता येणार नाही. मुलींबरोबर मुलांनीही सातच्या नंतर बाहेर जाणे टाळले तर अशा भयंकर घटनांवर आळा बसेल.


       स्वतंत्र भारतासाठी लढताना प्रत्येकाच्या मनात एकसंघ भारताची कल्पना होती. त्याचे रूप बदलत आहे.आज परिस्थिती एवढी बिकट आहे की या पुढाऱ्यांपेक्षा इंग्रज बरे होते की काय?अशी शंका येते. काय.... काय म्हणावं आजच्या संस्कृतीला?पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यात अखंड बुडालेला आजचा समाज भारतीय परंपरा, संस्कृती यास कायमचा मुकू नये एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि ती टिकवणे सर्वस्वी येणाऱ्या पिढीवर अवलंबून आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातून सुरुवात केली पाहिजे. माझ्या सारख्या अनेकांनी देशासाठी कष्ट घेतले त्यामुळे स्वातंत्राची फळे चाखता आली... आमच्या पिढीने स्वातंत्र्यासाठी जे बलिदान दिले आहे ते टिकवण्याचे दायित्व आता पुढच्या पिढीचे आहे. तुम्ही आपल्या या सुंदर संस्कृतीचे ज्ञानामृत तुमच्या पिढीला देऊन समृद्ध करा.....मग बघा... आपला भारत कसा सुजलाम सुफलाम दिसेल तो !!


वंदे मातरम!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational