माय मराठी...
माय मराठी...
माय मराठी.... जिचा करावा साऱ्यांनीच सन्मान
एकेक दिवस संपतो ,
संपताना शिकवतो काहीबाही
जे कळते आपल्यास द्यावे इतरांनाही
मनामनाचे द्वंद संपताना व्यक्त होण्याचे माध्यम म्हणजे भाषा. भाषेच्या शोध जनकाचे केवढे उपकार आपल्या तमाम जनतेवर आहेत हे जेव्हा जेव्हा व्यक्त होतो तेव्हाच उमगते .मुळात आपल्याला समजणे, समजलेले इतरांपुढे मांडणे हे कौशल्याचे काम आहे या कौशल्यात पारंगत व्हायचे असल्यास आपण आपल्या अंतर्मनाशी संवाद साधणे फार महत्त्वाचे असते. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचे भाषण ऐकतो तेव्हा तेव्हा आपणा सर्वांना असे वाटते अरे मी सुद्धा असे बोलू शकतो ,माझे विचार मांडू शकतो मग आपणही जोमाने लिहितो, वाचतो बोलण्याचा प्रयत्न करतो पण तरीही आपल्याला उत्तम वक्ता होणे जमेलच असे नाही त्यासाठी आपले आपल्या मातृभाषेवर अर्
थात थेट मनातून व्यक्त होणारया आपल्या माय मराठीवर आपले नितांत प्रेम असायला हवे.माझ्या मते मराठी ही मनामनातून व्यक्त होणारी गीताई आणि अविरत अशी व्यक्त अशी एक कस्तुरी आहे.आपल्या या मराठी राज्यभाषेचा आपण सातत्याने सन्मान करायला हवा ,आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीस या भाषेचा आदर व्हावा यासाठी त्यांना स्वभाषेवर प्रभुत्व मिळण्यासाठी एक पालक म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या इवल्या चिमुकल्यांना मायभाषेच्या अस्तित्वाची ओळख घराघरातून करून द्यायला हवी. विविध श्लोक अभंग ,ओवी, पोवाडे, सण उत्सवाचे महत्व, वारी ,गड किल्ले सफरी यातून आपल्या सौभग्याशाली इतिहासाची मधुराणी असलेली माय मराठी आणि या माय मराठीची गोडी वाढावी किंबहुना ती जगावर साम्राज्य करणारी व उत्कट वात्सल्याने ओथं बलेल्या तेजोमय ज्ञानावलीची जननी म्हणून सर्वपरिचित होण्यासाठी प्रत्येकाने राजभाषा गौरवदिनी निदान आपापल्या लेकरांना दिवसभर तरी सर्व संवाद मराठीतून करण्यासाठी उद्युक्त करून माय भाषेचा आपापल्याने परीने सन्मान करायला हवा .कारण मी मराठी माय मराठी माझी मनोर्मी फक्त आणि फक्त मराठी.