ऊंच माझा झोका
ऊंच माझा झोका
ऊंच माझा झोका
जीवन जगण्याची ऊर्जा देणारी,नित्य साऱ्यांना हवीहवीशी,नाविन्याचा ध्यास घेऊन पडत धडपडत ध्येय गाठणारी एक सामान्य श्रीया..
साधारण २५-२६वर्षे वयाची.घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच म्हणुन हुशारीने वाणिज्य पदवी पुर्ण करुन घराला हातभार लावण्यासाठी अर्धवेळ काँलेजातचं कारकुनी करुन तिने उत्तम गुण संपादन केले.अनुभवाच्या जोरावर पदवीनंतर एका नामवंत सी.ए च्या हाताखाली टँक्सेशनची कामे करु लागली.ह्यातचं तिने मनात सी.ए व्हायचं ठरवलं .कुणालाही न सांगता ती पाञता परीक्षेस बसली.एकदा अपयशी झाली.तेव्हा तिच्या सरांनी व घरच्यांनी तिला म्हटलंही सीए होणे म्हणजे कारकुन होण्याइतपत सोपे नव्हे.
तरिही कामे करता करता माहिती घेत श्रीयाने परीक्षा दिल्या व ऊत्तम यश मिळवुन सीए झाली.
सीए झाल्यानंतरही गप्प न बसता एमपीएससी परीक्षेची पुर्व तयारी चालु करत श्रीया नृत्याची आवड जोपासण्यासाठी कथ्थक शिकु लागली.सतत प्रयत्न करत राहिल्याने श्रीयाला एमपीएससीमध्येही यश मिळालं नी ती विक्रीकर विभागाची प्रमुख आयुक्त झाली ,ईतकचं नव्हे तर राज्यस्तरीय कथ्थक स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यत पोेहोचली.अशा ह्या सर्व गुणसंपन्न युवतीच्या स्वप्नांचा झोका आयुष्यात उंचच ऊंच गेला.तो केवळ तिच्या अथक प्रयत्नाने व आशावादी स्वभावामुळेच...म्हणुनच म्हणावेसे वाटते..
झोका स्वप्नांचा
जाईल ऊंचच ऊंच
आशेचे पंख लावता
घेईल क्षितिजापार झेप..