STORYMIRROR

GODMALE MINAKSHI

Drama

3  

GODMALE MINAKSHI

Drama

मातृत्व

मातृत्व

6 mins
219

एक खेडं गाव होतं, त्या गावात शिरपती नावाचा एक 48 वयाचे व्यक्ती होते....त्यांना मुलं नव्हते त्यामुळे तो खुप दुःखी होता ..लग्नला 25 वर्ष झाले होते.. आता तर होती नव्हती आशा पण मावळली होती.. पण कमलाबाईला आताही ... वाटतं होतं ,,कधीना कधी त्यांना मुल होईल याची तिला भाबडी आशा होती...


गावातील सगळेच लहानथोर त्यांना शिरप्या मामा म्हणून ओळखत होते .. एका दिवशी त्याच्या घरी त्याच्या बहिणीनी ची मुलगी अली होती .. तीच नावं काव्या ती पुण्यात डॉक्टर होती... मामामामीला भेटायला म्हणून आली होती ...


तीच वय असेल साधारण 26/27 वर्ष .. मध्यम बांधा 5.5 उंची ,गव्हाळ वर्ण ,बोलके डोळे आणि नेहमी हसरा चेहरा.. आपल्या हास्यने ती समोरच्या व्यक्तीला आपलंसं करत असे... 


काव्या सुर्वे (M.B.B.,S.M.S.OBGY) आहे .

शिक्षण घेतल्यानंतर तिने ससून हॉस्पिटलमध्ये काही काळ प्रॅक्टिस केली .. आणि ती मामाकडे अली होती 

आणि तिने केवळ तिच्या मामासाठीच या विषयावर संशोधन चालू केलं 


मामीची केस स्टडी करायची होती आणि त्या दोघांच्या निराश झालेल्या आयुष्यात चैतन्य आणण्याकरिता ती आली होती...


मामीची केस हिस्ट्री बद्द्ल मामाशी डिस्कस करत होती पण मामा काय ऐकायला तयार नव्हते, त्यांच्या मते कमलाला ट्रीटमेंट दिली ,तर ती परत आस लावून धरल 

मागच्या वेळी एका बुवाबाजीच्या नादाला लागून तिने खुप मनस्ताप झाला होता , त्या तंत्र मंत्रा मूळे तिची कितीमोठी अशा पल्लवित झाली होती ...पण निराशा हाती लागली त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता ..


त्यामुळे मी परत तिला कोणत्याच गोष्टीतुन मनस्ताप घेऊ देणार नाही... मामाच्या वक्तव्याने तिला पण थोडी धाकधूक होत होती..पण तिने आपल्या गोड आणि गुंतागुंतीच भाषेत त्यांना समजवण्याचा शेवटचा प्रयत्न केला


मामाला तीने सांगितले, अनियमित रजःप्रवृत्ती किंवा रज:प्रवृत्ती न होणे Anovulatory cycle 

वयाच्या13-14 व्या वर्षी स्त्रीला प्रथम मासिक पाळी सुरू होते. सम्प्रेरकांच्या असंतुलनामुळे मासिक पाळीचे कालचक्र अनियमित होते. त्याच बरोबर मानसिक ताण,आहारातील वैषम्य, हार्मोन्सच्या गोळ्या वारंवार घेणे,वजनाचे चढउतार खुप जास्त प्रमाणात श्रम ,जीर्ण आजार,क्षकीरणाचा दुष्परिणाम अशा अनेक कारणांमुळे मासिकपाळी अनियमित होते ..


आता मामीला कोणते कारण असेल त्याची मला खोल चिकित्सा करावी लागेल.. गर्भशयातील अंतस्त्वचेला (Endorngitis) व बीजवाहिणीला शोध ,बीजवाहनात अडथळा ट्युबरक्यूलोसिस किंवा लैंगिक आजारामुळे होणारे जंतुसंसर्ग झाल्याने गर्भाशयाचा व बीज बहिणीच्या अंतस्त्वचेला सुज येते.


पॉलिसिसिस्टीक ओव्हरियन सिंड्रोम(PCOS) 

बीजकोशात साबुदान्याप्रमाणे कोष तयार होणे इत्यादी


सुमारे 40% महिलांना आजकाल हा विकार लहान वयातच झालेला आढळतो बदलत्या जीवनशैलीचा परिणाम,आहार,व्यायामाचा अभाव,चरबी वाढणे ,थोयराईड विकृती, मानसिक ताण ,विध्युत उपकरणांचा अतिवापर या कारणामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते .. 


मामला किचकट ऐकून ऐकून डोकं दुखायला लागले होते त्यामुळे मामा कंटाळून तयार झाले होते...


काव्या कॉलेजमध्ये टॉप होती ,त्याच बरोबर तिची इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास खुप प्रचंड होता ,येणाऱ्या अडचणी किती असतील ,असे न म्हणता अडचणी काय काय असतील ,त्याला पर्याय काय असेल, किती वेळ लागेल किती प्रमाणात ,आहेत मुबलक आहे का, असे नाना प्रकारच्या प्रश्नांची उकल करायला तिचं पॅशन होतं

कृत्रिम माध्यमे वापरून गर्भधारणा साधण्याची पद्धत वापरून तिला नवा इतिहास रचायचा होता..


वंध्यत्व वरच्या उपचार करण्यात तिला भलती आवड प्रजननक्षम कपल्समध्ये हे तंत्र खास जनुकीय कारणासाठी वापरला जाते

कचनळीतिल फलन पेशीं द्रव अंतर्गत शुक्राणूं अंत:क्षेपन ही काही सह्ययक तंत्र आहेत...


मामीला पुनः एकदा हुरूप आला होता ,या वेळेस तरी आई भवानी पाव ग बाई अस म्हणून तिने देवीला मनातून नमस्कार केला..


दोघाचे पूर्ण चेकप करून , मेडिसिन आणि व्यायाम, आहार याचे रेगुह्युलर चेकप आणि ट्रीटमेंट मुळे दोघानाही पॉजिटिव्ह रिज्जल्ट येईल अशी आशा होती 2,महिन्यानंतर परत चेक केलं ,म्हणावं तशी प्रोग्रेस दिसून येत नव्हती .. आणि मामीच्या शरीरात लक्षणीय बदल दिसत होते ,, 5,6 महिन्याच्या अवधी ने मामी ने खरोखरच गूड न्यूज दिली....


मामा मामी खुप खुश होते त्याच बरोबर गावातील सगळे जण खुप अंदात होते...

तिसऱ्या महिण्यात गर्भ खराब झाला ...कारण अंडणु गर्भशयाव्यतीरिक्त फॉलपियन नळी किंवा दुसऱ्या इतर ठिकाणी वाढू लागला त्यामुळे तो गर्भपात झाला ...


मामाला तर वाईट वाटलं पण मामीने परत धसका घेतला तिची प्रकृती बिघडली ..

काव्या हार मानायला तयार नव्हती ,नेमकं करणं काय असेल याचा शोथ घेणं गरजेचं होतं... पुन्हा ट्रीटमेंट सुरू झाली पण या वेळेस .. मामी पुण्यात अली होती तिची पूर्वी पेक्षा जास्त काळजी घेण्यात आली होती...


कृत्रिम गर्भधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या या निर्णयाला दोघांनी पाठिंबा दिला..

शरीराबाहेर घडवून आणलेली गर्भधारणा..मूळ लॅटिन इनव्हिट्रो या शब्दाचा अर्थ" काचेच्या उपकरणांमध्ये" असा होतो.कृत्रिम गर्भधारणा घडवून आणण्यासाठी शरीराबाहेर पेट्रिबशीमध्ये मानवी स्त्रीबीजांड आणि शुक्राणूं यांचा संयोग करण्यातयोतो त्याला 

" टेस्टट्युब बेबी" असे म्हणतात...प्रत्यक्षात गर्भधारणा त्या नळीत होत नाही ..


ज्या विवाहित जोडप्यांना प्रजनन अक्षमतेमुळे स्वतःचे मुल होत नसतील किंवा वारंवार गर्भपात होत असेल,स्त्रीचे वय जास्तीच असेल, अंडकोशामधील अंडाची संख्या कमी असणे, शुक्राणूंची संख्या अपुरी असणे, या कारणांमुळे मूल होत नसेलतर कृतीम गर्भधारणा हा उपाय करून बघायचा असे ठरवण्यात आले..


स्त्रीच्या नैसर्गिक प्रजनन चक्रातून अंडाशयांतून अंडी परिक्षानलिकेमध्ये गोळा केली जाते या सगळ्या प्रोसेसला 25ते30 मिनिटे लागतो गोळा केलेले अंडी  पूर्णवाढ झालेले आणि सुदृढ असलेले अंड आणि शुक्राणूंचे निषेचन सुक्ष्मअनुयोजनेना केले जाते.निषेचित फलितअंडी शरीराच्या तापमानास कार्बनडाय ऑक्साइडच्या वातावरणात उबवण यंत्रात ठेवली जाते

18 ते 48 तासां नंतर फलित अंड्याचे दोन पेशींमध्ये

विभाजन होते 72 तासानंतर बहुपेशीय गर्भ ,गर्भशयात रोवण्यास तयार होतो.


मामीच्या गर्भशयात रोपण केलं , तीला परतआनंद झाला तीने मनातुन चांगला रिस्पॉन्स दिला , .. आहार आणि व्यायाम ,औषद याची योग्य ती खबरदारी घेतली आणि सगळं सुरळीतपणे होईल अशी सगळ्याना आशा होती...


मामीला पाचवा महिना लागला आणि परत ...मिसकरेंज झालं ..मामीची अवस्था खूपच वाईट झाली 2वेळेस गर्भपात आणि शारीरिक अस्थिरता त्यामुळे त्या शारीरिक आणि मानसिक खचून गेल्या..


आता मात्र त्या चांगल्याच हदरल्या, मामीची कंडिशन बघता .. त्या कधीच आई बनू शकत नव्हत्या...


काव्या हार मानायला तयार नव्हती तिने ठरवलं म्हणजे ठरवलं ती मामा मामीला आईवडील बनवणार म्हणजे बनवणार...


तिने कॉलेजमध्ये सगळ्या प्रोफेसराना प्रॉब्लेम सांगितला त्यानाही कुठलाच चान्स दिसत नव्हता.. 


मुलगा दत्तक घेण्यासाठी मामी तयार नव्हत्याच त्यामुळे सगळे शांत बसले... गावात मात्र ही चर्चा जास्तच रंगली होती .. गावातील बाया वळून वळून तिच्या वर्मावर बोट ठेऊन तिला घायाळ करत होत्या ... तिने स्वतःला कोंडून घेतले..तिला स्वतःच्या नाकर्तेपणा छळत होता ..


काव्याने कसून संशोधन करणं चालू केलं सगळ्याना भेटून बोलून बघितले हाती मात्र निराशा लागली..

काव्याने मग शेवटी "कृतिम गर्भाशय " तयार करण्याचा ठरवले .. आईच्या उदरामध्ये नवाढवता ते कृत्रिम वातावरणात पुनरुत्पादक तंत्रज्ञान वापरून मुल जन्माला घालणे..


काव्याच्या मामीची दिवसेंदिवस मानसिकता ढासळत होती ,तिने बाळाचा ध्यास घेतला ...मामीची हालत बघून मामाही खचत होते...


काव्यांनी रितसर परमिशन घेऊन तिने पुण्यात लॅबमध्ये तिने गर्भाशय तयार केलं जे स्त्रीच्या गर्भाशयासारखंच होतं ... सगळ्या टेस्ट करून त्यामध्ये गर्भ रोपण करायचं 


मामा मामीला घेऊन आला पण त्याची मानसिकता नव्हती , परत व्यवस्थित नाही झाले तर मामी मरतील असंच त्याला वाटत होतं..


काव्या : मी समजू शकते मामा पण , माघार घेतली तर आपल्याला यश मिळेल का??? 

मग फक्त एकदाच ,शेवटचा उपाय करूया .. या नंतर मी कधीच स्वतःला डॉक्टर म्हणून घेणार नाही...


14 दिवस औषदची ट्रीटमेंट देऊन अंडाशय मधील अंडी आणि निर्जंतुक केलेलं शुक्राणूं याचे फलन करून ते मायक्रोमॅन्युप्लेशन तंत्रांचा वापर करून ते फलित अंडी बहुपेशीगर्भ गर्भपिशवीत रोवला गेला...


गर्भ रोपणा नंतर त्याला 14 दिवस निरीक्षण केले व्यवस्थित वाढ होत होती का याचे मूल्यमापन केले..


22 आढवडे खूप जिकरीची जवाबदारी होती...बघता बघता 6महिने उलटले , पिशवीतील भ्रुण चांगल्या प्रकारे वाढत होते... संभाव्य धोखा आता टळला होता...


काव्या आणि कमला मामी खुप आनंदात होत्या .. प्रयोग यशस्वी होण्यासाठी सगळेच आपापल्या परीने प्रार्थना करत होते नऊ महिने झाले त्या कृत्रिम गर्भपिशवीतुन त्या बाळाला काढण्यात आले ...


बाळ बाहेरच्या तापमानात आल्यानंतर त्याला श्वास घ्यायला जमत नव्हते .. त्याला तोंडा वाटे श्वास दिला आणि ते बाळ रडायला लागलं ...


मामा मामीला किती आनंद झाला असेल याची कल्पना करता येत नव्हती.. सगळ्या राज्यात ही बातमी पसरली सगळीकडे तिच्या कार्याचे कौतुक केलं जातं होतं..


मामा मामी ला काही दिवस बाळा साठी पुण्यातच राहायला सांगितले होते जेणेकरून त्याची योग्य प्रकारे काळजी आणि अभ्यास केला जाऊ शकेल ..


काव्याने तिच्या जिद्दीने बाळाचा जन्म घडवून आणला आणि तिच्या या प्रयोगासाठी पुरस्कार ही जाहीर केला होता ...सर्वत्र तिचं अभिनंदन केले या तिच्या यशस्वी प्रयोगामुळे तिची क्लासमेंट पायल ही खुप संतप्त होती 


कारण तिला हा प्रयोग करायचा होता या विषवी त्या दोघीही नेहमी चर्चा होत होती.. त्या विषयी माहिती मिळवली होती...


तिने मनातून निश्चय केला .. या काव्याला आयुष्यातुन उठवणार नाही ,तो परेन्त मी स्वस्थ बसणार नाही...


(क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from GODMALE MINAKSHI

Similar marathi story from Drama