STORYMIRROR

Shriya @storymirror

Drama Inspirational Others

3  

Shriya @storymirror

Drama Inspirational Others

सानिकाची गोष्ट

सानिकाची गोष्ट

5 mins
258

सानिका! समिधा आणि विनायक जोशींची एकुलती एक मुलगी. विनायक मुळचा नगरचा पण मराठी विषय घेऊन बी.ए. झाल्यावर त्याच्या काकांच्या मदतीने अभ्यास करून तो बँकेची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि त्याला महाराष्ट्र बँकेत नोकरी मिळाली. समिधा नाशिकची पण तीसुद्धा बी. एससी. झाल्यानंतर वर्षभराने तिचं आणि विनायकचं लग्न झालं. त्यांचं लग्न झालं तेव्हा विनायकची नोकरी लागून साधारण पाच वर्ष झालेली आणि त्याने पुण्यातच एक छोटंसं घर घेतलेलं. मग दोघांचाही छोटासा संसार सुरु झाला. साधारण ३ वर्षांनी सानिकाचा जन्म झाला. मग बाळाचे लाड करणं, काळजी घेणं यातच त्यांचा वेळ जायचा. सानिका ६ वर्षांची झाल्यावर तिला पुण्यातल्याच हुजूरपागा या शाळेत एडमीशन मिळाली आणि मग तिची शाळा, विनायकची नोकरी आणि घरातलं आवरून हातात वेळ असल्याने समिधाने ट्युशन घ्यायला सुरुवात केली. तसंही ती बॉटनी घेऊन बी.एससी. झालेली त्यामुळे तिच्याकडे विद्यार्थी यायला लागले. 


सानिकाला लहानपणापासून तिच्या बाबांकडून गोष्टी ऐकायला आवडायचं. विनायकसुद्धा छान रंगवून गोष्टी सांगायचा. शाळेत जाणारी सानिका आता मोठी व्हायला लागली होती. ती दुसरी - तिसरीत असताना त्यांनी तिला सायकल शिकवली आणि मग स्विमिंग क्लासला घातलं. साधारण ४ थी ते ९ वीच्या वर्षांत सामिधाच्या आग्रहाखातर तिने स्कॉलरशिप, होमी भाभा, गणिताची प्रज्ञा - प्राविण्य अशा वेगवेगळ्या स्पर्धा - परीक्षा दिल्या. साईड बाय साईड, सायकल आणि स्विमिंग हे आवड म्हणून चालू होतंच. मग आला तो दहावीचा टप्पा. शाळा, क्लास आणि टेस्ट सिरीजच्या मदतीने सानिकाला छान मार्क्स मिळाले.


तिला गोष्टी ऐकायला आवडत असलं तरी बाबासारखी वाचनाची फार आवड नव्हती आणि आईसारखा विज्ञानात रसही. तिने साधारण अंदाज घेऊन कॉमर्स घ्यायचं ठरवलं. सानिकाला गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सला एडमीशन मिळाले. हा नवा टप्पा होता आयुष्यातला. कॉलेजला गेल्या गेल्या पहिल्याच आठवड्यात तिला लक्षात आलं की इथे नुसतीच अभ्यासात हुशार असणारी नाही पण अभिनय, वादन, चित्रकला, क्रिकेट अशा वेगवेगळ्या गोष्टीत प्राविण्य मिळवलेली मुलं होती. जरा इन्फ़िओरिटी कॉम्प्लेक्स आला तिला पण मग तिने ठरवलं की आपण रेग्युलर सायकलिंग आणि स्विमिंगमुळे बऱ्यापैकी फिट आहोत आणि तिने NCC जॉईन करायचा निर्णय घेतला.


जेवढं वाटलं तेवढं हे सोपं नव्हतं. कॉलेजची लेक्चर्स, NCC चा सराव, येण्याजाण्यामुळे थकून जायला व्हायचं. पण तिने ११ - १२ वी आणि एफ.वाय. बी.कॉम. अशा तीन वर्षांत NCC पूर्ण केलं आणि मग पुढची दोन वर्ष कॉलेजच्याच NSS मध्येसुद्धा काम केलं. २१ व्या वर्षी ती बी.कॉम. झाली आणि मग पुढे काय करायचं हा विचार करताना तिने न्यूजपेपरमधली जाहिरात वाचली. मुलींनासुद्धा सैन्यात संधी मिळते हे तिला माहित होतंच आणि तिने ठरवलं की येत्या डिसेंबरच्या परीक्षेला आपण बसायचं. तिने रोजचा सराव सुरु केला.


विनायकला आपली मुलगी बी.कॉम. झाल्यानंतर खूप आनंद झालेला पण तिने जेव्हा हे आर्मीमध्ये जाण्याच्या पर्यायाविषयी सांगितलं तेव्हा त्याला जरा धक्का बसला. समिधाची इच्छा होती की सानिकाने यापुढे एमबीए किवा एम.कॉम. करावं आणि नोकरीचा विचार करावा. पण सानिकाने त्या दोघांना सांगितलं की ती आता डिसेंबरमध्ये ही परीक्षा देणार होती आणि त्यात जर काही नाही झालं तर मग एमबीए किंवा एम.कॉम. हे पर्याय होतेच.


सानिकाचं आता रुटीन बदललं. रोजचा व्यायाम, संतुलित आहार, परीक्षेच्या थिअरी पेपरचा अभ्यास असं सगळं चालू झालं. मग लेव्हल १ झाली, त्यानंतर लेव्हल २ आणि शेवटी SSB ची मुलाखत! मुलाखत बंगलोरला होती. तिच्याबरोबर समिधा आणि विनायकसुद्धा बंगलोरला आलेले. मुलाखत देऊन जरा दोन दिवस तिथे आजूबाजूचं पाहून ते तिघेही पुण्याला परत आले. सानिकासाठी हा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे तिने एम. कॉम.साठी काय करावं लागेल याची चौकशी वगैरे करायला सुरुवात केली. जर काही नसतं झालं तर ती आता २२ व्या वर्षी येत्या जुलैपासून एम.कॉम.ला सुरुवात करणार होती. पण काही दिवसांनी रिझल्ट लागला आणि सानिका त्यात सिलेक्ट झाली. आता एप्रिलपासून तिचं OTA चेन्नईला साधारण १ वर्षाचं ट्रेनिंग सुरु झालं.


विनायक आणि समिधा यांना आनंद झाला असला तरी त्यांच्या मनात धाकधूक होती. सानिका काही फारवेळ कुटुंबापासून लांब राहिली नव्हती. कॉलेजच्या दिवसातले छोटे छोटे कॅम्प होते पण आता OTA चं खडतर प्रशिक्षण असणार होतं तेही जवळपास वर्षभर आणि सानिका तर २२ वर्षांची होती. शेवटी सगळं काही रेडी करून तिच्या शाळा, कॉलेजमधल्या मित्र - मैत्रिणींना भेटून ती चेन्नईला गेली. OTA मध्येपण तिच्याचसारख्या निवड झालेल्या भारतातल्या अनेक मुली होत्या. स्पर्धातर होतीच पण तिथे हळूहळू तिची अनेकीशी मैत्री झाली. ट्रेनिंग दरम्यानसुद्धा अनेक आव्हानं होती. आई - बाबांची आठवणही यायची तिला. शेवटी ते ते ट्रेनिंग पूर्ण करून ती घरी आली. Now, she became Lieutenant Sanika Joshi!


फक्त २३ वर्षांची होती ती तेव्हा आणि त्यानंतर पुढची १० वर्ष ती इंडिअन आर्मीमध्ये असणार होती. पासिंग आउट परेडला समिधा आणि विनायकला किती अभिमान वाटलेला तिचा! तिला आर्मी जॉईन करून दोनेक वर्ष झाली तेव्हा तिच्या आईच्या म्हणण्यानुसार विचार करून तिने इकोनोमिस्ट असलेल्या ऋषिकेशच्या स्थळाला होकार दिला. ऋषिकेश आणि त्याचे पेंडसे कुटुंबीय यांना खूप अभिमान होता सानिकाचा पण तिचं काम आणि त्याचं फायनान्स फिल्डमधलं काम यात खूप फरक होता त्यामुळे त्यांना एकमेकांसाठी फार वेळ देता आलाच नाही आणि लग्न उगाच कटू वळणावर जाण्याआधी त्यांनी २ वर्षात शांतपणे परस्पर संमतीने डिवोर्स घेतला. साधारण अठ्ठावीस वर्षांची झाली तेव्हाच तिला कॅप्टनचा हुद्दापण मिळालेला. मग कॅप्टन सानिका जोशी यांच्या आयुष्यात अनेक आव्हानं आली. फिल्डवर काम होतं. जगू की मरू असे अनुभव होते आणि मग दोन वर्षांनी परत एकदा तिने तिच्या बाबांचं ऐकून अमेय देसाईशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमेय जाहिरात क्षेत्रात काम करायचा. कमर्शिअल आर्टिस्ट होता तो. पण परत तेच. जरी त्याला तिच्या कामाची कल्पना होती तरी ती घरी असली की बरेचदा त्याचं काम असायचं, डेडलाईन असायची, त्यामुळे शेवटी लग्न टिकवणं काही जमलं नाही दोघांना आणि २ वर्षांनी त्याची परिणती डिवोर्समध्ये झाली. 


मग वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग, मिशन्स यातच तिने पुढची काही वर्ष दिली. पण या सगळ्यात वैयक्तिक आयुष्यात २ डिवोर्स आणि त्यानंतर येणारी कठीण फेज ही होतीच. ३३ व्या वर्षी तिची आर्मीमधली १० वर्षांची शाॅर्ट सर्विस पूर्ण झाली. त्याच वर्षी तिने बी.एड. होण्यासाठीची परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण झाली. मग २ वर्ष बी.एड. करण्यात गेली. अर्थात बी.एड. करत असतानासुद्धा नातेवाईक - मित्रमैत्रिणींशी बोलताना तिने पुन्हा लग्नाचा विचार करावा असा सूर असायचा पण १० वर्षांची सर्विस, २ लग्न - २ डिवोर्स आणि मग नुकतंच पूर्ण केलेलं बी.एड. या सगळ्याचा विचार करून तिने नोकरी मिळवणं हे ध्येय ठेवलं. कारण सर्विस असली तरी पैसे लागतात आयुष्यात, हे तिला माहित होतं, शिवाय बाबांची बँकेतली ३८ वर्षांची सर्विस संपून ते ५ वर्षांपूर्वीच निवृत्त झालेले.


मग तिला पाचगणीतल्या सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूलमध्ये मुलाखतीसाठी बोलावलं आणि तिथे तिची निवड झाली. मुलींसाठी असलेली, महाराष्ट्रातल्या अग्रगण्य बोर्डिंग स्कूलमध्ये ही शाळा होती. फक्त एकच होतं की तिला त्यासाठी पाचगणीला येऊन राहावं लागणार होतं. ६० वर्षांची आई आणि ६५ वर्षांचे बाबा असे दोघे पुण्यात आणि ती साताऱ्याला असं होणार होतं पण विनायक आणि समिधाला त्यांच्या मुलीचा फार अभिमान होता. शेवटी ती साताऱ्याला आली आणि तिच्या आयुष्यातलं नवं पर्व सुरु झालं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama