.प्रमोद घाटोळ

Tragedy

2.8  

.प्रमोद घाटोळ

Tragedy

माझ्या वडीलांनी भूताला पहिलं

माझ्या वडीलांनी भूताला पहिलं

4 mins
1.7K


..

माझ्या वडीलांनी भूताला पाहिलं !!

मला बालपणातील बरेच प्रसंग आठवतात. काही तर चांगल्या प्रकारे मेंदूच्या खोबणीत विटून पडले आहे. त्यापैकी काहीएक आपणा समोर मी ठेवत आहे. बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी सांगितलेला हा प्रसंग / गोष्ट आहे. तिला सांगण्याचा माझा मानस अनेक दिवसांपासून चा आहे. मनुष्य आपण आणि आपले हे सर्वश्रेष्ठ समजतो. समजायला हवे, मात्र काही न पटणारे काळाच्या ओघात बुडवून पाहणे गरजेचे असते. नाहीतर त्यातील सत्यासत्य कळावयास मार्ग उरत नाही. त्याचे महत्त्व समाजहिताचे दृष्टीने अनन्य साधारण असते. त्यामुळेच हे लिहिण्याचे मी धाडस करतो आहे. आपणास पण ते करावेच असे वाटेन.

जीवनात आईवडील प्रत्येकाचे आदर्श असता तंच, आणि ते असावेत सुध्दा. बालपणी अनेक गोष्टी आपण त्यांच कडून ऐकीत असतो. त्यावेळी त्या गोष्टी आपणास फार आवडतात आणि त्याचा पगडा मेंदूवर बसतो. त्यापैकी कोणती खरी किंवा खोटी.. याचा जराही आपण विचार करत नाही. याचे महत्वाचे कारण ते आपणास तिर्थतूल्य अस तात. का बरे नसावे.? असावेतंच.मला पण आहे /होते.

माझ्या वडिलांनी सांगितले ला प्रसंग मी तुमचे समोर मांडीत आहे. त्यांनी मला त्यांच्या जीवनातील एक गोष्ट सांगितली. ती अशी... आमचे गाव.. मुळचे बासलापूर. त्याकाळी आमचेकडे काही म्हशी, बैल असे गुरंढोर होती. घरचे म्हशी, बैलं घेवून वडील त्यांना चरावयास नेई. त्यांचे सोबत इतरही गुराखी असायचे. त्यापैकी एक जाणता होता. तो होता तुक्या माई. त्याला करणी , जादूटोणा, भूतबला या बाबतची पक्की जानकारी होती असं ते सांगत.

शनिवारचा दिवस. त्या दिवशी तो.. माझ्या वडिलांना भूत दाखवनार होता. ठरल्याप्रमाणे ते टेकडीजवळच्या गायरानात गेले. दुपारचे बाराची वेळ. माझे वडील व तुक्यामाई टेकड़ीच्या पायथ्याशी आले. सूर्य डोक्यावर आला होता. तु क्यायाने आवाज ठोकला.. चाल ये बे भूता. त्याने काडीनं गोल घट फाडला अन् म्हणाला..शंकर राय त्या घटात उभा. अस म्हणत त्याने माझ्या वडीलांना त्या घटात उभं केलं. पाय तुले आता कसा दाखवतो भूतं.. असं म्हणत त्यानं आपली बासरी जादुची कांडी फिरवल्यागत दोन चार वेळा हवेत फिरवली. काहीतरी मनात पुटपुटला. .. मंतर शु करत हातातल पाणी माझ्या वडीलाचे डोळ्यावर झपक्यांन मारलं. पायरे शंकर भूत असं म्हणलं. तसाच माझ्या वडिला समोर भुतं गप्पक्यान उभा रायला. माझ्या वडीलांची घाबरगुंडी उडाली. आंगाचा थरकाप झाला. प्रत्यक्ष त्यांनी आपल्या समोर भूत उभा पाहिला. अक्षरशा खरोखर. त्याचे हातात मिठाईचे मोठ्ठे ताट होते. लगेच आवाज आला.. घे खाय आता मिठाई. समोर विचित्र.. भला मोठा.. आक्राळ विक्राळ भूत पाहूनत्यांच्या अंगाच पाणी झालं होतं

भर दुपारी भूत पाहिल्याची गोष्ट माझ्या वडिलांनी मला सांगितली. कोण नाय ठेवनार आपल्या बापावर विश्वास ? नक्कीच ठेवेल. आणि मी पण ठेवला. याचा अर्थ हाच कि वडील जे म्हनतान ते आपण सत्य मानतो. आणि नक्की हेच कारण ठरते अंधश्रद्धा दृढ होण्यामागे. माझी आई , माझे वडील किंवा वडीलधारे जर असे सांगतात तर ते खोटे असूच शकत नाही असं आमचं ठाम मत बनलं आहे. माझ्या वडीलांनी पण हेच केले. माझे वडील. मी सुद्धा त्यांच खरं मानलं. वडीलांचे आदर्श जरूर घ्यावे. मात्र चिकित्सक बनून. बालवयात ठिक आहे.. तेवढी जाण नसते. मात्र वयोपरत्व माणसात मॅच्युरीटी येते. अशा वेळी आपण त्यावर विचार करावा.ज्याला आपण मोठे होणे म्हणतो ते हे होय. नुस्त वय शरीर वाढणे मंजे मोठे होणे -नव्हेत.अशा वेळी मोठयाने सांगितलेल ते खरेच त सं असू शकते काय असा प्रश्न आपल्या मनाला विचारणे फार गरजेचे ठरते.जे सत्याला संजीवन देते. नाहीतर सत्य सर्वदा अंधारात राहण्याची दाट शक्यता असते.

वरील गोष्टीचा माझ्यावर फार मोठा परिणाम झाला होता. अंधार झाला की मी घराचे आंगणात कधीच एकटा येऊ शकलो नाही. कारण ते भूत माझ्या मनात एवढं पक्कं बसलं की काही केल्या ते निघच ना. मात्र पुस्तक माझे जाणकार गुरु झाले.परिवेशा नुसार माणूस बनत असतो हे मला पुस्तकातून उमगले. माझे वडील अक्षर शून्य होते. त्यांचा विवेक जागृत होईल अस कोणतही भान त्यांना त्या काळी, त्या स्थळी मिळालं नाही. त्यामुळे भुत न पाहता सुध्दा जणू काही आपल्या समोर भूत आहे असं म्हणनं.. त्यांच्या मनावरच्या पगडयान त्यांना भाग पाडलं.

त्यानंतर मी अनेक प्रयोग करून पाहिले भूत पाहायचे. मात्र मला भूत दिसलं नाही.जगात भूतं नाही.करणी नाही.जादू नाही. हे सर्व मनाचे भ्रम आहे आणि हे कायम करण्यामागे सर्वस्वी वडिलधारी मंडळीच आहे हे येथे प्रकर्षाने सांगावेसे वाटते. आतातर टि. व्ही. सारख्या माध्यमांनी अंधश्रद्धा पसरविण्याचा वसाच उचललेला आहे.

अशा गोष्टीत नाहक उर्जा खर्च होते. त्यापेक्षा मुलांना वाचनाकडे नेणे फार महत्वाचे असते. बालवय फार संस्कारक्षम असते. अशाच वेळी आपलेपण मनाला पोखरून टाकते.आपल्या माणसाची चुकीची ही गोष्ट आपण खोटी मानायला तयार चं होत नाही. मी जर Ghost Nonsense हा पाठ वाचला नसता तर मला सुद्धा वडीलांचे म्हणणे खरेच वाटले असते. वाचन किती गरजेचे आहे हे मी स्वतःचे अभवातून सांगू शकतो. माझे वडील, माझी आई, माझे आजोबाहे निश्चितच चांगले असतात. मात्र त्यांनी सांगितलेलं हे खरंच असेल कि नाही चाचपडणे हे ते एवढेच गरजेचे असते. हेही नक्कीच खरं कि ते तुमची फसगत करत नसतात. तो त्यांचा दोष नसून त्याला अनेक घटक कारणीभूत असतात.माझे वडील सांगतात तेच खरे . माझ्या बाबांसारखा गावात माणूसच नव्हता हा भाव आहे. तो प्रत्येक मानसाच्या मनात असला पाहिजे. निसंकोच असावा. आणि माझाही आहे. मात्र कळून जर .. माझे वडील म्हणतात तेच खरं असं म्हणणं चुकीचं आहे.म्हणजेच सत्याकडे डोळेझाक करणे तर त्यांच्याशी केलेली शुद्ध बेईमानी आहे.कृतघ्नता आहे. हे विसरून चालणार नाही. त्यांच्या मेहनतीची, विश्वासाची ती अवहेलना आहे हे ही तेवढेच खरे. ज्या विश्वासन त्यांनी तुम्हाला शिकवलं की माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा व्हावा. त्या विश्वासाशी केलेला फार मोठा दगा आहे. मी तस करनार नाही ही त्यांचे प्रती अर्पीलेली खरी श्रद्धा आहे.

आणि मी जर असं करत असेल तर हिच अंधश्रद्धा माझ्या पुढच्या पिढीला दान देऊन जातो . आणि समाज निर्मितीच्या कामात मोठा अडसर ठरतो हे येथे कबुल करणे गरजेचे समजतो आणि थांबतो. धन्यवाद


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy