.प्रमोद घाटोळ

Others

3  

.प्रमोद घाटोळ

Others

लव्ह बर्ड

लव्ह बर्ड

6 mins
1.0K



.    हातावरच्या नावाच कोंदण हळूच हृदयात शिरलं. कारण साक्षात मेनका असणारी नंदिनी सनीकडं कटाक्ष टाकत गालांत हसली होती . आकाशात दिसणारे चांदण्यांचे देखावे तिच्या चेहऱ्यावर उतरल्याचे त्याने प्रत्यक्ष बघीतले. आणि थोडा वेळ न कळत तो तिच्या मुखचंद्राकडे मोहित होऊन बघतच राहला. रात्रीच्या चंद्राच्या सौदर्याला फिक पाडणारी तिची कांता चंदन सुंगधाला मागे पाडणारी होती.डोक्यातील गजऱ्याचा घमघमाट मंदमंद दरवळत होता. मोहिनी बागेत सकाळची रपेट करणारा प्रत्येक जण तिच्याकडे पाहल्या विना स्वतःला अपूर्ण समजत होता. एकटक बघणारी बागेतील झाडे केवळ तिलाच न्याहळत होती .सकाळी वेलींवर उमललेली फुले तिच्याकडे बघत खजिल झाल्याचा आभास होत होता. हिरव्या तृणाला तिच्या पायांचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. सकाळी जागे झालेल्या भाटांनी या नवागतेच स्वागत आपल्या गोड गळ्यांनी सुस्वरे गायन करत केले होते. पानावरच्या साऱ्या दवबिंदूंनी नंदिनीचे रूप आपल्या आरशात मांडले होते. रस्त्यात असाणाऱ्या निर्जिव धोंड्यांना तिच्या पावलांनी धन्य झाल्याचे वाटत होते.

   सनी सकाळी नेहमी प्रमाणे बागेत मॉर्निंग वाकला आला होता. काल रात्रीला तो शेजारच्या देशमुख काकांच्या वाढदिवसा निमित्त हॉटेल पर्लमध्ये गेला होता. काकांचा हा अडूसष्टीतला वाढदिवस होता. ते शहरातील नामांकित ग्रेन मर्चंट होते. सनिच्या वडलांचा आणि त्यांचा अनेक वर्षापासूनचा अत्यंत निकटचा घरोबा होता. दोघांचेही जन्मगाव हे हाकेच्या अंतरावर होती. देशमुखांचे पार्डीचे कुटुंब अनेक वर्षापासून नाशिक शहरात वास्तव्यास आले होते. सनिचे वडील बारातेरा वर्षापूर्वी नाशिक शहरात बदलीवर आले होते. खेड्यात त्यांचे वडिलोपार्जित घरदार , शेतीवाडी होती. लहान भाऊ विनायक अजूनही गावातच राहत होता. केवळ देशमुख काकांच्या आग्रहास्तव सनीचे कुटुंब नाशकात सेट झाले होते. त्यामुळे सनीचे सर्व कुटुंबच देशमुख काकांच्या बर्थ डे पार्टीला उपस्थित होते. गाण्याची धून वाजत होती. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे हॉटेल पर्लचा परिसर दुमदुमला होता. सगळे जण देशमुख काकांना शुभेच्छा देत होते. रात्रीचे साडेअकारा वाजले होते. त्यामुळे सनी व त्याचे कुटुंब रात्री खूप वेळाने झोपी गेले होते. सकाळी उठायला वेळ झाल्याने सनी उशीरानेच बागेत आला होता.

   काल रात्री शुभेच्छा देत असतांना त्याची नजर अचानक नंदिनीवर पडली होती. ती देशमुख काकांच्या व्यापारी मित्राची मुलगी होती. तिला सनीने बर्थ डे च्या कार्यक्रमात प्रथमच पाहले होते. काकांना केक खाऊ घालतांना तिच्या हातावरचे नंदिनी नाव सनीने बघितले होते. काळ्या अक्षराचे ते कोंदण त्याच्या मनाच्या आंतरपटलावर खोलवर रुतले होते. काल रात्री त्याला उकड झोप लागली होती. त्यामुळे त्याचे डोळे लालभोर दिसत होते. नंदिनीच्या गालावरची लiली त्याच्या डोळ्यात अवतीर्ण झाल्याचा भास होत होता. तो इंजिनिअरींगच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता. सिव्हिल इंजिनिअर होऊन स्वतःचा व्यवसाय करावा असे त्याला वाटत होते. त्यामुळे बिझनेसच्या गप्पा देशमुख काकांकडून ऐकतांना त्याला फार हायसे वाटायचे. बाबांच्या बदलीमुळे वारंवार गाव बदलायचा अनुभव त्याने घेतला होता. त्यामुळे कशी फजिहत होते हे त्याने जवळून बघीतले होते. आपण आपल्या वडिलांप्रमाने बिऱ्हाड पाठीवर घेऊन फिरायच नाही. अस त्याने पाहिलेच ठरवल होत.

   रविवारचा दिवस असल्यामुळे मोहिनी बागेत जास्तच चलपहल दिसत होती. शंभर वर्षापूर्वी इंग्रजांनी या ठिकाणची मॉर्निंग झोन म्हणून निवड केली होती. शहराच्या अनेक भागातील लोक या ठिकाणी फिरायला येत होते .पूर्वी मोहिनी बाग शहरापासून दूर वाटायची.आता मात्र शहराचा आकार फुगल्यामुळे ती शहरा लगत आली होती. बागेतील रस्ते प्रशस्त होते. सगळ्या प्रकारची झाडे तिथे पाहावयास मिळत होती. तिच्या सुंदर रचनेमुळे व निसर्गरम्य वातावरणामुळे अख्खे शहर तिच्या प्रेमात पडले होते. सनी बागेत फिरतांना बाकावर बसलेल्या नंदिनीला पाहून चकित झाला होता. त्याचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. कारण काल सायंकाळी त्याने तिला पार्टीत पाहले होते. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच भेट होईन असा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता.

   सकाळच्या गारवा अंगाला झोंबत होता. त्यामुळे नंदिनीने अंगात श्वटर घातले होते. त्याचा केसरी रंग तिच्या रूपात अधिकच भर घालत होता. हवेच्या झुळकेमुळे तिचे केस भुरभुरत होते. चेहरा सकाळी उमललेल्या फुलागत टवटवीत दिसत होता. काल रात्रीचे स्मित तिच्या चेहऱ्यावर अजूनही कायमच होते. सनीला बघून ती खुदकन हसली. तोच त्याने हसवा चेहरा करत तिच्याकडे पाहले. नंदिनीनेही त्याला ' गुड मॉर्निंग .. म्हटले. तिच्या शेजारच्या बाकावर टेका घेत सनी आसनस्थ झाला. शब्दाचार सुरू झाला. ' तू कोणत्या कॉलेज मधे शिकते ' असे सनीने तिला विचारले. त्याचे कडे बघत नंदिनीने उत्तर दिले' लव्ह बर्ड... मध्ये . चेहऱ्यावर स्मित उमटवत तिने त्याच्या हृदयाला स्पर्श केला.बोलता बोलता बाकावरच अंतर कमी झालं. गोष्टीत खुमारी भरली. दोघेही आपण अनोळखी असल्याचे देहभान विसरले. भेटीचे रुपांतर प्रेमात झाले.

   नंदिनी सनीच्या शेजारचे विठ्ठल नगरात राहत होती. तिचे वडील फ्रुट व्यावसायिक होते. त्यांचे मार्केटमध्ये दुकान होते. नंदिनी त्यांची एकुलती एक मुलगी होती. ती आर्ट कॉलेजला शिकत होती. इंजिनिअरींग कॉलेजच्या पाश्चिमेला असणारे आर्ट कॉलेज शहरातील नामांकित म्हणून गणल्या जात होते. आज ख्रिसमस मुळे कॉलेज बंद होते. त्यामुळे नंदिनी व सनी यांनी शहराबाहेरच्या ट्रि गार्डनमध्ये भेटायचे ठरवले. दुपारचे एक वाजले होते. नंदिनी ट्रि गार्डनमध्ये गुलमोहरा लगतच्या तणशीच्या झोपडीत येऊन थांबली होती. सुंदर व आखीव झोपडीत उन्हाचे कवडसे पडले होते. कवडश्यात तिचे रूप बिल्लोरी काचासारखे चमकत होते. कानातील कर्णफुले झुंबरा सारखी डूलत होती.आज तिने पंजाबी बाणा परिधान केला होता. अंगावरचा दुपट्टा हवेमुळे उडत होता. तिचे सुडौल अंग जणू कुण्या कारागिराने कोरलेल्या अप्रतिम कलाकृति सारखे भासत होते.आल्या पासून तिचे लक्ष सारखे रस्त्यावर होते. अजून पर्यंत सनी आला नव्हता. त्यामुळे तिच्या मनाची अगतिकता फारच वाढली होती. तेवढ्यात सनी येतांनी तिला दिसला. त्याला पाहताच नंदिनी खूश झाली.आज प्रेमातील नियोजीत पहिलीच भेट होती. सनीने आपली दुचाकी बाजूला उभी केली. डिक्कीतील दांडी असलेला लाल गुलाब काढला. तोच नंदिनीने आवाज दिला ... ये सनी , तुझे बाबा... सनी बुचकाळला.नंदिनी मस्करी करत खुदकन हसली. ती त्याची थट्टा करत असल्याचे त्याच्या ध्यानात आले. तिचा मस्करीखोर चेहरा बघत काही वेळ तो स्तब्ध झाला. आपल्या हातात गुलाबाचे फुल आहे हेही तो विसरला.

   रस्त्याचे दुसऱ्या कडेला त्यांच्याच सारखे प्रेमीयुगल उभे असल्याचे सनीच्या लक्षात आले. त्यामुळे हातातील गुलाब नंदिनीचे हातात देत ते तेथून दुसरीकडे चालते झाले. तिच्या रेशमी हाताच्या स्पर्शाने रेशिम गाठीचे स्वप्न त्याच्या डोळ्यात तरळू लागले. गोड गुलाबी गप्पा मारत ते गार्डनच्या एकांत स्थळी पोहचले.एकमेकांच्या बोलण्यातून परस्परांच्या स्वभावाची ओळख झाली.आकाशातील अवकाळी जमलेल्या मेघराजांनी जलाभिषेक करत त्यांच्या प्रेमाची साक्ष नोंदवली. दोघेही प्रेमाच्या वर्षावात एकमेकांना आलिंगण देत चिंब चिंब झाले. नंदिनी मनासारखा प्रियकर मिळाल्यामुळे अत्यानंदी झाली. तिच्या आयुष्यात सनीने न कळत प्रवेश केला होता. सनी तिच्या केसांना कुरवाळत म्हणाला, 'नंदिनी तू मला खूप आवडते. तुला पाहताच मी तुझ्या प्रेमात पडलो. आय लव्ह यू नंदिनी ' . सगळीकडे निवांत होते. नंदिनी सनीच्या स्पर्शाने भावविभोर झाली होती. ओल्या मातीच्या गंधाने ट्रि गार्डन दरवळून गेला होता. सनीच्या नजरेत नजर मिळवत नंदिनी जागलेल्या संवेदनांची साक्ष देत होती.

   त्या रात्री सनीला स्वप्न पडले. दोघांच्या लग्नाचा मुहुर्त निघाला. लग्नाची तारीख काढण्यात आली. शहरातील हनी मॅरेज हॉल मध्ये मोठया थाटात लग्न सोहळा पार पडला . सनी व नंदिनी हनीमून साठी महाबकेश्वरला गेले. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे महाबळेश्वर वर धुक्याची जणू की चादर ओढल्यागत भासत होते. दोघांनी हॉटेल ग्लोरी मध्ये मुक्काम केला. हॉटेलच्या खिडकीत दिसणाऱ्या अप्रतिम सौदयाचा मोह दोघांनाही आवरला नाही. दोघेही खिडकीतून झाकून पाहत असतांना सनीने नंदिनीला अलगद उचलले. अंSSहं म्हणत नंदिनीने रजा मंदिचा होकार दिला. मधुचंद्राची या प्रथम संध्येला सनीने मोगऱ्याच्या कळ्यांचा गजरा आपल्या हाताने गुंफला होता. आपल्या चिमटेत धरुन तो त्याने तिच्या डोळ्यांच्या पुढे धरला. गजऱ्यातील प्रत्येक कळीला न्याहळत नंदिनी आपल्या मनातील प्रत्येक कळीला फुलवत होती. येणाऱ्या क्षणांच्या प्रतिक्षेत तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. कमऱ्यातील मंद शुभ्र प्रकाशात सनीचे ते अंग अंग एकटक डोळ्यांनी बघत होती. त्याच्या प्रेमात धुंद असणारी नंदिनी , स्वतःला पत्नीच्या रूपात पाहतांनी खूप विभोर झाली होती. तिच्या पापण्यांची गती मंदावली होती. तिने सनीला पूर्णाकृतीत आपल्या लोचनाच्या आड सामावले होते. डोळयांच्या पापण्यांवर प्रत्यक्ष चंद्र प्रकाशमान झाला होता. तोच सनीने आपल्या हातातील गजरा तिच्या वेणीत खोचला. तिच्या ओठांचे चुंबन घेत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. दोघेही एकमेकांना मिठी मारत सदैव एक दुसऱ्याचे झालेत.

     कॉलेजच्या अभ्यासक्रमा सोबत प्रेमाची बाराखडी शिकणारे हे प्रेमीयुगल आता चर्चेचा विषय झाले होते. सनीला अभ्यासा सोबत आपल्या घरची कामे सुद्धा करावी लागत होती . त्याचे वडील रिटायर्ड झाले होते. त्यांच्या डोळ्यांनी फारसे दिसतही नव्हते. त्यामुळे ते बाहेर फार कमीच वेळा निघत. महत्वाची सर्वी कामे सनीच करत होता. त्यासाठी तो कधी कधी नंदिनीची मदत घ्यायचा. त्याला मदत करतांना नंदिनीला खूप आनंद व्हायचा. कारण या निमित्ताने तिला सनी बरोबर फिरण्याची संधी मिळायची. दोघांनाही एकमेकांचा हातभार व्हायचा. फुलपाखरा प्रमाणे बागडणारे हे प्रेमीयुगल रोमॅन्स, मौज करतांना अनेकांनी बघीतले होते.स्वप्नांच्या परिक्रमेत असणारी नंदिनी व सनीची जोडी शहरातील आता बऱ्याच परिचितांच्याही ओळखीची झाली होती. प्रेमाचा मनमुराद आनंद लुटतांना जगण्याच वेडेपण कस असते हा प्रत्यक्ष अनुभव वसाहतीतील लोकांनी यांच्या रूपाने बघीतला होता. त्यामुळे लोक त्यांना आता लव्ह बर्ड म्हणू लागले होते.


Rate this content
Log in