.प्रमोद घाटोळ

Others

3  

.प्रमोद घाटोळ

Others

लाजवणारं अडाणीपण

लाजवणारं अडाणीपण

4 mins
1.5K


अमरावतीच्या शेजारच्या खेडयात बाबाराव नावाचे सद्गृहस्थ राहत होते. अत्यंत साधी पण स्वच्छ राहणी असा त्यांचा खाक्या होता. मोठया भारदस्त पण मायाळू व सत्य शब्दात बोलणारे बाबाराव मला खूप आवडतं. त्यांची प्रत्येक कृती मनाला मोह घालणारी होती. कधी स्वप्नातही या माणसाने कुणाच वाईट चिंतलं असल असं मला वाटत नाही.एवढा सज्जन माणूस. पान तांडयावर मजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. कधीही आळस न करता नियमित मजूरी करणे त्यांचा छंद होता. त्यामुळे गावात कुणीही त्यांना वाईट म्हणत नसे. आणि सतत आपल्या कामात राहत असल्याने चुगली चहाळी करायला त्यांना वेळ नव्हता. त्यामुळे कुणाशी भांडण तंटा असा विषयच उद्भवला नाही.

दोन मुली व एक मुलगा अस पाच माणसांच हे कुटुंब शहाण्याला लाजवेल असंच म्हणाव लागेल. गरीब असून श्रीमंतपण जपणाऱ्या या कुटुंबाचा गावातील लोकांना हेवा वाटायचा. ज्याचे घरी वीस वीस एकर शेती होती तोही त्यांच्या सारखा सुखी न०हता. त्यालाही उस्नपास्न मागासाठी दुसऱ्याच्या दारावर जाव लागत होत. पण बाबारावाच्या कुटुंबावर कधीही अशी पाळी आली नाही.

बाबाराव आपल्या अंगणात कारली, दोडकी, कोवळं , मुंगना, शेंगाचे वेल अशा प्रकारच्या भाज्या पिकवायचे. गावात दररोज साथ भरायची . तिथं आपल्या अंगणात निघालेले कारले, दोडके, शेंगा बाबाराव ठोकंन विकायचा. त्यातून आलेल्या पैशात त्यांचा किरकोळ घरखर्च चालायचा. मोलमजूरीतूनही गाठीला पैसा जोडायचा.मात्र त्याने आपल्या मुलीला न् मुलाला कधी साथीत बसवलं नाही. तीन एकरातील कोरडवाहू शेतातीला वर्षाला येणाऱ्या उत्पन्नाच्या पैशाची बचत करायचा. पाहिजे तेवढा पुरेसा पण नेमकाच खर्च करणे याचे कसब बाबारावांनी आत्मसात केले होते. एक कप चहाला लागणारी साखर, चहापत्ती, दूध , इंधन याचा बारीक हिशोब त्यांना करता येत होता. परंतू कधी प्रसंगी शेजाऱ्याला , गरजूला ते धावून मदतीला जात होते.मुलगा एकटा असल्याने त्याला पाहिजे ते बाबाराव घेऊन द्यायचे. शाळेत नियमित जायला सांगायचे.परंतू उत्तम शाळेत जायचा कंटाळा करायचा. त्यामुळे बापाला वाईट वाटे. पण काय करणार?

पाहता पाहता मुली मोठया झाल्या. उत्तम दाढी मिशीचा झाला. मात्र तो काही शाळा शिकला नाही. गावात दोस्ता मित्रा सोबत फिरणे . गावाच्या शेवटी असणाऱ्या प्लॉटावरच्या दोस्ता सोबत राहणे, उनाळक्या करणे, रात्री घरी उशीरा येणे अशी त्याची दिनचर्या बनली. त्यामुळे बाबाराव काळजीत पडले. त्यातंच मोठी मुलगी काडीमोड करून बापाच्या मंजे बाबारावांच्याच घरी माहेरी राहत होती. तिचेही दुसरे लग्न करुन देण्यासाठी बाबाराव सक्षम होते. पण तिच्या नकारापुढे त्यांचा नाईलाज झाला होता.तर मधली मुलगी शहरात राहत होती. जशी दिसला सुंदर तशीच बुद्धीने चतुर होती. तिने उत्तमचे लवकरात लवकर लग्न करायचा सल्ला आपल्या वडिलोना दिला.

बाबा रावांनी उत्तमच्या लग्नाची तयारी सुरू केली. आता तो गावातच वरलीच्या कामावर मजूरीने काम करत होता. स्वभावाने चांगला, दिसाला सुंदर असा उत्तम वाया जातो की काय याची बाबा रावांना चिंता खायची.आता याचे लग्न करून टाकावं असं बाबारावांनी ठरवलं. त्या वर्षी घरच्या तिनं एकरात त्यांना पिकं सुद्धा समाधानकारक झाल होतं. जवळच्या नातेवाईकाला घेऊन उत्तम साठी मुलगी पाहणे सुरु झाले. एका गरीबाची मुलगी बाबारावोना सून म्हणून पसंद पडली. लगेच बोलचाल, साक्षगंध व लग्नाची तारीख ठरवण्यात आली व एप्रील महिन्यात उत्तमचे लग्न पार पडले.

आता बाबारावांचा जीव भांड्यात पडला होता. पण अजूनही उत्तमची दिनचर्या तिच असल्याने त्यांना काळजी वाटत होती.एकुलता एक मुलगा मटन खाणे, दारू पिणे,वरली मटका खेळणे अशा कामी लागल्याने बाबाराव दुःखी होते. त्यामुळे त्यांनी उत्तमला कामधंद्या निमित मुली जवळ शहरात पाठविले.

उत्तम दुसऱ्याचे दुकानात नोकर म्हणून काम करू लागला. बाबारावांनी त्याला जावायाच्या खुल्या प्लाटात तात्पूरते वेळूफाट्याचे झोपडीवजा घर बांधून दिले. शहरातील बाजारातून आपल्या डोक्यावर टिनपत्रे घेऊन त्याने त्याच्या घराचे छ्त बांधले. बाबाराव हिशोबात अतिशय काटकसरी होते. त्यांना आण्या रूपायाचा बारीक सारीक हिशोब समजत होता. त्यामुळे त्यानी उतारवयात भविष्यासाठी आपल्या पुरती पुंजी पहिलेच लावून ठेवली होती. परावलंबी व बेहिशोबी जीवनाचा त्यांना फार टिटकारा होता .

उत्तमही त्याच संस्कारात जगल्यामुळे वडीलांचे काटकसरीपण सहजच त्याच्या रक्तात भिनले होते. त्यामुळे थोड्याच दिवसात तो सुद्धा बापासारखा काटकसरीचे जीवन जगू लागला. बापाची रूपया जोडण्याची कला त्याला अवगत झाली. शिवाय दुकान मालक सिंधी असण्याचा त्याला जीवनात फार मोठा फायदा झाला. तो आता नोकरीबरोबरंच आपला घरून कुटीर व्यवसाय करू लागला. त्याला धंद्यातील अनुभवाने एक नवी दिशा दिली. तो स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करू लागला. त्याने शहरात स्वतःचे घर बांधले. आतातर उत्तमकडे स्वतःचे दुकान पण आहे.

कधीकधी खेड्यावरुन बाबाराव आपल्या मुलाचा हालचाल पाहायला त्याच्या कडे यायचे. मुलात झालेला सुधार पाहून त्यांना फार हायसे वाटायचे. आता उत्तमची परिस्थिती उत्तम झाली होती. सूनबाई शहरात खुश होती. मात्र तिनेही आपला रंग बदलवला होता. तिला सासऱ्याचे अधुनमधून येणे खटकायला लागले होते. हे बाबारावांच्या लक्षात आले. आणि त्यांनी उत्तमच्या घरी कधीच न येण्याचा निश्चय केला. शांताबाई व बाबाराव आपल्या स्वतःच्या घरातच आखरी क्षणापर्यंत राहले.सून वेडगळ स्वभावाची असल्याचे शल्य सदैव त्यांच्या उरात होते.मात्र आपल्या तोंडातून सूनीबद्दल कधीही वाईट शब्द त्यांनी काढला नाही. सदैव मुलाच्या सुखात सुख मानणारे बाबाराव खरच आदर्श देव माणूस होते. बाबारावांचे अडाणीपण सुशिक्षिताला दिपवणारे होते.


Rate this content
Log in