माझे Quotes.
माझे Quotes.


तुझ्यावर केलेलं,
हे माझं प्रेम आहे की आकर्षण,
माहित नाही...
पण तुझ्या पासून दुरावण्याच्या भीतीने,
त्रास खूप होतो...
मला वाटायचं तू आणि मी,
यातच सर्व काही असतं,
पण नाही...
तू वेगळं असतं आणि मी वेगळं असतं...
आयुष्याचा शेवट काही,
तुम्हांला सांगून नाही येणार...
म्हणून स्वतःची काळजी घ्या,
आणि मनसोक्त जगून घ्या...
तू ना माझ्या आयुष्यात,
विजेच्या लाईट सारखी आहे...
तू नसल्यावर माझ्या आयुष्यात सर्विकडे,
फक्त आणि फक्त अंधार असतो...
आयुष्यात गमवण्यासारखं खूप काही असतं,
पण आपल्याला काय गमवायचं,
आणि काय सांभाळून ठेवायचं,
ते आपल्या हातात असतं...
आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा,
आपल्या ओळखीचाच असतो...
पण मात्र आपल्यालाच,
उशीर झालेला असतो...
आपण त्याला ओळखायला...
आयुष्यात जर प्रेम केलं असेल,
तर त्रास सहन करण्यास तत्पर राहा...
प्रेमात तेव्हढी एकच गोष्ट अशी आहे,
ती न मागता मिळते...