STORYMIRROR

सानिका कदम

Inspirational

3  

सानिका कदम

Inspirational

कठीण समय येता

कठीण समय येता

2 mins
269


   काल रात्री 12 नंतर मला फोन आला . ती खूप रडत होती. घाबरली होती. मी विचारले तिला... काय झालं.शांत हो. तिच्या बोलण्यावरून समजून आले होते, की ती खूप टेंशन मध्ये होती. आणि तिने काही खाल्लं ही नसेल, तिला म्हणाले थोडं पाणी पी. आणि सांग मला काय झालं ते......तेव्हा समजलं मला की, दोन रात्र तिच्या लेकाला खूप ताप आणि डोकेदुखी चालू होती. डॉक्टर ने जेवढ्या टेस्ट तिला सांगितल्या त्या सर्व केल्या आणि आता रिपोर्ट पाहून ते म्हणत होते की कोरोना टेस्ट करायची आहे . कोरोना टेस्ट ऐकून च ती खूप घाबरली होती. तेव्हा मी माझ्या परीने तिचे टेन्शन दूर करण्याचा प्रयत्न केला .ते सर्व रिपोर्ट तिला मी मला पाठवायला सांगितले. तिने रिपोर्ट पाठवले .तेव्हा साडे बारा वाजले होते .म्हटलं एवढ्या रात्री कोण जागे असेल .म्हणून मी लॅबमध्ये जॉब करत असताना माझ्या मित्र मैत्रिणी चा ग्रुप होता. 'दृष्टी लॅब' खर तर ह्या ग्रुप वर मी गेले वर्ष दोन वर्षे तरी बोलले नव्हते. फक्त कुणाचा वाढदिवस असेल किंवा कोणता स्पेशल दिवस असेल तर शुभेच्छा देण्यापूरता हा ग्रुप चालू होता. केव्हा तरी फोन वर बोलणं व्हायचं. पण माझ्या मैत्रिणीचा रडलेला आवाज आणि तिचं टेन्शन ने मी पण काळजीत पडले होते. म्हणून मी त्या ग्रूप वर 'hi' पाठवले . कोण जागे आहे का आता ? काही सेकंद झाले असतील आणि हो बोल ना सानिका काय झालं? असा अजित चा रिप्लाय आला .मी लगेच wup कॉल केला. आणि माझ्या मित्राला सर्व सांगितलं त्याने रिपोर्ट पाठव म्हणाला. तसं मी पुन्हा ग्रुप वर बघते तर सर्वांचे मेसेज काय झालं सानिका बोल....मग ग्रुप वरच रिपोर्ट पाठवले रिपोर्ट बघून त्यांनी सांगितलं की अग सानिका crp थोडा high आहे .तस काही काळजी करू नको असे तिला सांग. त्यांनी जी माहिती दिली जे उपाय संगीतले ते सर्व मी तिला फोन करून सांगितले. तिच्याशी सर्व बोलल्यामुळे ती पहिल्या केलेल्या फोन पेक्षा आता खूप बरी वाटली होती .....खरंच आपल बोलणं समोरच्याला खूप मोठा धीर देऊन जात इतका धीर की स्वतः ला सावरण खूप सोप्प होत..खरच मित्र मैत्रिणी असणे खुप गरजेचे आहे. मी ज्या ग्रुप वर वर्ष दोन वर्षे बोलले सुद्धा नव्हते तेच जुने मित्र मैत्रिणी आज माझा एक मेसेज वाचून सर्व एकत्र येऊन जेव्हा बोलले. तेव्हा खरंच खूप भारी वाटलं. खरं सांगू मी खूप भाग्यवान आहे. मला असे खूप मित्र मैत्रिणी आहेत जे मेसेज वाचता रिप्लाय देतात आणि रिंग वाजताच कॉल उचलतात. हो आणि काही असे ही आहेत जे मेसेज आठ आठ दिवस वाचत ही नाहीत .ते त्यांच्याच विश्वात रमलेले असतात.असो पण मित्र असावे आणि ते खरे असावे. आयुष्यातील अर्ध टेन्शन हे मित्र मैत्रिणींमुळेच दूर होत ...... 


    मी

   माझ्या

  शब्दांत

  मांडताना,

 गेले दिवस

 अनुभवताना,

 मैत्रीत पुन्हा

  लिहिताना,

  डोळ्यात

    हर्ष

     रे.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational