STORYMIRROR

vjay patil

Drama Inspirational

3  

vjay patil

Drama Inspirational

*कथा: आज्जींनी ऋण फेडले, का केले?*

*कथा: आज्जींनी ऋण फेडले, का केले?*

4 mins
199

असेच माझ्या आयुष्यात एक घटना घडली होती.

अगदी अचानक.

ती घटना घडून काही दिवस असेच गेले.त्यानंतर ती घटना मी जवळ जवळ विसरून गेलो होतो.आणि अचानक एका रविवारच्या दुपारी माझ्या बंगल्या समोर एक लाल दिव्याची गाडी उभी राहिली.एक रुबाबदार व्यक्तिमत्वाचा माणूस त्यातून बाहेर पडला.त्यांच्या अंगावर पोलिसी युनिफॉर्म होता.पोलिस म्हंटल्यावर नॉर्मली आपण जरा घाबरतो !!माझे तसेच झाले.पण त्यांच्या हातात पुष्प गुच्छ होता. म्हणून भीतीयुक्त प्रश्न चिन्ह माझ्या चेहऱ्यावर असावे."अमित सरदेसाई आपणच का?"त्यांनी मला विचारले."हो" माझे उत्तर."मी सुभाष करमरकर.मी इथे एस.पी. म्हणून काम पहातो."त्यांनी आपला परिचय दिला.पोलिसात येवढ्या मोठ्या पोस्ट वर असलेला गृहस्थ आपल्याकडे कसा हे मला कळेना !!"नमस्कार सर." मी म्हणालो."कसे येणे केलेत?" मझ्या आवाजात थोडी भिती होती. बहुदा एस पी साहेबांना ते जाणवले.ते पुष्प गुच्छ पुढे करत मला म्हणाले."आधी याचा स्वीकार करा".मी तो असमंजसपणे घेतला.मी अनिभिज्ञ!!"अहो सांगतो" ते म्हणाले."एक ग्लास पाणी मिळेल?"मी खजील झालो. भिती पोटी मी त्यांना पणी पण नाही विचारले."

मी श्रीमती शालिनीताई करमरकर यांचा एकुलता एक मुलगा".पाण्याचा ग्लास खाली ठेवत ते म्हणाले.मला आजूनही संदर्भ लागेना."माफ करा मी नाही समजलो" - मी."अहो काही महिन्यांपूर्वी ज्या वृध्द बाईंना तुम्ही मदत केली होती त्यांचा मी मुलगा!!" - एस पी साहेब.आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.आणि आश्चर्य पण वाटले की ते माझ्याकडे का आले असतील?पण त्याचे उत्तर काही मिनिटांत मला मिळाले.एस पी साहेब पुढे म्हणाले -"माझी आई माझ्या बरोबर नाही राहू शकली, कारण तिचे आणि मझ्या बायकोचे आजिबात पटत नव्हते.शेवटी कंटाळून स्वतः होवून तिने वृध्द आश्रमाचा रस्ता धरला." "मला अतिशय दुःख झाले. पण तिच्या हट्टा पाई आणि तिची आणि माझ्या बायकोची रोज होणारी भांडणे बघून मी पण तयार झालो."मला पण खूप वाईट वाटले.ते मनापासून बोलत होते.त्यांच्या डोळ्यात पाणी होते."ती गेली त्या दिवशी मला वृद्धाश्रमातून फोन आला की तुमच्या आई हार्ट फेल नी गेल्या.मी धावत वृद्धाश्रमात पोचलो.तिथे कळाले की तिने आपली सर्व प्रॉपर्टी वृद्धाश्रमाच्या नावावर केली. ते कागदपत्रं तिने वृद्धाश्रमाच्या स्वाधीन केली आणि त्याच क्षणी तिला हार्ट अटॅक आला आणि ती गेली."माझे पण मन सुन्न झाले."त्या वृद्धाश्रमातील ऑफिस मध्ये काम करणाऱ्या बाईंनी सांगितले की त्या दिवशी सकाळी माझ्या आईला घेवून तुम्ही आश्रमात गेला होता.""तुम्ही त्या दिवशी तिला आधार देवून वृद्धाश्रमातील ऑफिस मध्ये नसते नेले तर कदाचित वृद्धाश्रमातील पायऱ्यांवर ती गेली असती !!""ऑफिस मधल्या बाईंनी तुमचे नाव व कुठे रहातो हे सांगितले होते.""पण पुण्यात फक्त येवढ्या माहिती वरून तुम्हाला शोधणे खूप आवघड होते.पण मी पोलिसात असल्या मुळे मला ते जमले.तुमचे आभार मानणे मला गरजेचे वाटले.खरेच धन्यवाद."त्यांनी हात जोडले.मला आता सर्व उलगडा झाला होता.माझ्याशी हस्तांदोलन करत ते म्हणाले - "या माझ्या ऑफिस मध्ये. हे माझे कार्ड.""ओळख राहुदे."मी हसलो."हो नक्की येईन" म्हणालो.ते चहा न घेता निघून गेले होते.आणि मी स्टूल वर ठेवलेल्या त्या *ऋण वजा पुष्प गुच्छा* कडे पहात राहिलो.......

आणि ती घटना फ्लॅश बॅक सारखी माझ्या डोळ्या समोरून सरकली......####आज जरा उशिराच झाला होता उठायला.

अंगावरची चादर फेकून, आळस देत उठलो एकदाचे.पण रविवार असल्यामुळे थोडे रेंगाळत काम चालू होते.ब्रश वगैरे करून चहाचा सीप घेत सवयी प्रमाणे आजचा पेपर चाळला.उठलो.गडबडीत ट्रॅक सूट घातला,आणि सकाळच्या जॉगिंग साठी बाहेर पडलो.सुट्टी दिवशी पण जॉगिंग ला सुट्टी नसते माझ्याकडे !!

त्या असाव्यात ८० वर्षाच्या.हात थरथरत होते,पाय लटपटत होते,खांद्याला शबनम,कसे तरी वृद्धाश्रमाच्या,पायऱ्या चढत होत्या. जॉगिंग ला जात असताना मी त्यांना पहिले .तसे पण मला कोणालाही मदत करायला आवडते. त्या तर ८० वर्षाच्या आज्जी होत्या.आपसूकच मी पुढे सरसावलो.मदत करावी म्हणून.त्यांच्या जवळ गेलो. खूपच अशक्त होत्या त्या.कसला तरी संस्कृत श्लोक त्या पुटपटत होत्या.चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या मात्र एक तेज होते.“आज्जी हात देवू का?”मी त्यांना हळुवार पणे विचारले.पण बहुदा त्यांनी ऐकले नसावे,किंवा त्यांना ऐकायला कमी येत असावे.मी आणखी जवळ गेलो आणिथोड्या मोठ्याने पण आदबीने विचारले –“आज्जी हात देवू का?”अत्ता मात्र त्यांनी ऐकले असावे,कारण,त्यांनी होकारार्थी मान हलवली होती. मी तत्परतेने त्यांचा हात पकडला,त्यांच्या खांद्याला लटकाणारी शबनम,मी घेतली पण,मला ती शबनम,फारच हलकी लागली.त्यांना हळुवार आधार देत,वृद्धाश्रमा मधील ऑफिस मध्ये त्यांना घेवून गेलो.काही वेळात ऑफिसच्या मॅडम तिथे आल्या.त्या मॅडम नी माझे आभार मानले.माझे नाव त्यांनी विचारले. मी त्यांना माझे नाव व कुठे रहातो हे सांगितले होते.मग मी आज्जींना "जावुका?" म्हणून विचारले,त्यांनी आशीर्वाद सारखा,हात वर केला.ती कृतज्ञापूर्वक मुक सहमती असावी बहुदा.मी तिथून समाधानाने जॉगिंग साठी परतलो.मनात विचार आले की आज मी एक पुण्य काम केले.एका असहाय्य आज्जींना मी मदत केली होती.बऱ्याच दिवसांनी शांत झोप लागली, त्या रात्री.सकाळी उठलो,आणि नेहमीच्या सवयीने हातात चहाचा कप घेत,हळू हळू चहाचे घोट घेत,पेपर चाळत होतो.अचानक एका बातमीकडे माझे लक्ष वेधले गेले.आणि -मात्र, माझ्या पाया खालची,जमीन सरकली -८० वर्षाच्या एक वृद्धा शालिनीताई करमरकर यांचे दुखःद निधन - अशी ती बातमी होती.सोबत काल ज्यांना मी मदत केली होती त्या वृध्द आज्जींचा फोटो होता!!आणि बातमीत होते,कालच त्यांनी आपली,जमीन आणि घर वृद्धाश्रमास,दान केले होते.मनात विचार आला,की त्यांनी आश्रमाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला,की आश्रमावर त्यांनी ऋण केले होते?पेपर मध्ये दिले होते -त्यांच्या मागे एक मुलगा,जो क्लास वन ऑफिसर आहे,पण त्याच्या जवळ त्या,रहात नव्हत्या !!मी पेपर मध्ये न लिहलेले पण वाचू शकलो.चटकन डोळ्यात पाणी तरळले,काल मी त्यांना नाही,त्यांनी आश्रमास मदत केली होती !!काल त्यांना हात देताना जी शबनम मी घेतली होती,ती शबनम किती जड होती,हे आज कळले होते मला.......


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama