sujata siddha

Abstract Romance

3  

sujata siddha

Abstract Romance

कल्याणी खरच तू अस्तित्वात आहे

कल्याणी खरच तू अस्तित्वात आहे

8 mins
740


“खुळा आहेस का तू अभ्या ? “ माझा कलीग विभव मला वेड्यात काढत होता , आम्ही दोघेही एका नामवंत रिअल इस्टेट कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करायचो ,कुठंआहे माहितीये का आमची साईट? एका जंगलात,..जंगलम्हणजे प्रॉपरजंगल बरंका ? भोर च्या पुढेसाधारण४० एक कि.मी. वर , जवळ जवळ २००एकरांचंजंगल आहे , पण develop केलेलं, शहराच्या जंजाळात राहून पकलेल्या ज्या लोकांना सुरक्षित राहून काहीतरी थ्रिल्लिंग करावं असं वाटतं त्यांच्यासाठी इथे फार्म हाऊस आणि मचाण बांधलेले .बांबू हाऊसआणि टेन्टस पण आहेत ,विकत घ्या नाहीतर रेन्टवर , ज्याला जे आवडेल त्याच्यात त्याने राहावं, दोन दिवस निवांत यायचं , शौक असेल तरशिकार करायची नाहीतर जंगलात राहायची मजा अनुभवूनरिफ्रेश होऊन आपापल्या घरी जायचं , भोर गावातली चार-पाच कुटुंब तिथंदिवसा कामाला येतात , आपल्याला हवं ते खायला प्यायला करून देतात , सगळी व्यवस्था बघतात आणि रात्री गावात परत जातात, 

      साईटवरची स्वयंपाकीण ‘आशा’ , तिला सगळे आशा ताई म्हणतात , तिला जसं काही अन्नपूर्णेचं वरदान आहे , जो पदार्थ करेल तो चवीला एक नंबर ,’ , कांदा भजी , भरलं वांग , हिरव्या मिरचीचा झुणका , आणि नॉन व्हेज तर अशी काही बनवते कीमी तिच्या नवऱ्यासमोरच ‘य ‘ वेळा तिच्या हाताचा मुका घेऊन म्हणतो , “आशा ताई यु आर ग्रेट !..“ मग ती लाजून आत पळते ,काय म्हणता नवरा काही बोलतनाही ? अरे हॅट , काय बिशाद त्याची , आपल्यापुढे काही बोलायची , बबन तर आपला यार आहे , आपण कधी कुणाला कमी नाही लेखलं , Bishops मधूनशिकलो असलो ,म्हणून काय झालं ? ६ -२ ‘’ उंची , घारेडोळे , रोज जिम ला जाऊन मिळवलेली sculpted body , आणि अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी सिनिअर सेल्स मॅनेजरची पोस्टहे सगळं जरी असलंतरी आपण माज नाही केला हा कधी त्याचा , आणि सगळ्यात महत्वाचं ,आपल्याकडे कला आहे समोरच्याला बघता बघता खिशात घालायची . उगाच नाही वाजवून ऐंशी हजार पगार घेत , साईट व्हिझिट ला येणारे मोठे लोक जसे आपल्या प्रेमात आहेतना , तसेच सगळे कामगार आणि ड्रायव्हरसुद्धा आपले यार -दोस्त आहेत , फिदा असतात सगळे आपल्यावर! 

तुम्हाला म्हणून सांगतो, झाडावरून नुकत्याच काढलेल्या ताज्या लालभडक तिखट लावलेल्या , डझनभर कैरीच्या फोडी कंपनीच्या डायरेक्टर आणि सिईओ च्या आधी मला मिळतात साईटवर गेलं की आणि तलंग कोंबडी शिजवली ना की सगळयांच्या आधी माझ्यासाठी लपवून झाकून बाजूला ठेवली जाते , असा थाट असतो आपला साईटवर , तलंग कोंबडी माहितीये ना? नाही ?..., बास का राव ? SSS अहो तलंगम्हणजे कवळी कोंबडी , तारूण्यात नुकतच पदार्पण केलेली . तर मी काय सांगत होतो हा, असंच एकदा साईटवर निघालो होतो मी कस्टमर ला घेऊन, तेव्हाच ती दिसलेली ,’ गोरी गुलाबी कांती , हरणासारखे टपोरे डोळे , लांबसडक चमकदार केसांत डोकावणारी सोनेरी छटा ,१६-१७ वर्षांची , सडपातळबांधा आणि ताडमाड उंच , तिला बघता क्षणी मला वाटून गेलं कि हीचती जिच्याशी लग्न करायचंय मला !!

“खुळा आहेस का तु अभ्या ? “ विभव मला विचारत होता , कुठं दिसली तुला ती ? 

“साईट वर जाताना ,वाढाणे - जोगवाडी , च्या रस्त्यावर ती दिसली मला , खुराड्यातून बाहेर पळून अचानक तिची कोंबडी आमच्या गाडीच्या पुढे आली म्हणून ती जोरात पळत आली आणि आपल्या कोंबडीला पटकन उचलून छातीशी धरत , आमच्याकडे हसून बघत ती आत घरात पळाली , तिथंच कलेजा खल्लास झाला आपला यार विभ्या !... “

विभवला मी हे सांगताच त्याने कपाळावर हात मारून घेतला , “ होपेलेस आहेस एक नंबरचा अभ्या तू , अरे दिसायला चांगली असेल म्हणून काय झालं , कुठं तु , कुठं ती ? एकापेक्षा एक सरस , उच्चशिक्षित , गल्लेलठ्ठ पगार मिळवणाऱ्या मुली सांगून येताहेत तुला , आणि तुला कोण आवडलं तर हि तलंग कोंबडी !...“ विभव खो खो हसत म्हणाला . 

“ विभव यार, चेष्टा नको करूस , खरच मला लग्न करायचंय तिच्याशी …” 

“काकूंना सांगितलंस का घरी ? बिनपाण्याने काढतील तुझी .. “  

“नाही सांगितलं ,पण मम्मी तुला माहिती नाही कशी आहे, तिला आवडो न आवडो , मला आवडली आहे म्हटल्यावर ती काही विचार नाही करणार जास्त , काहीही झालं तरी ती माझ्याबरोबर असते नेहेमी.”

“मग झालं तर ,अडचण कशाची म्हणायची? उडवून टाका बार! ..” विभव अजूनही चेष्टेच्या मूडमध्ये होता, त्याला खोटंच वाटत होतं .मी एक उसासा सोडला , तीन दिवसांपूर्वी ती दिसल्या पासूनअसंच होतंय होमला , एवढ्या मुली फिरवल्या आजपर्यंत , पण कधी कुणासाठी इतका वेडा नव्हतो झालो , seriously !.. आता उद्याची साईट व्हिझिट विभ्याची , गुरूवारी माझा weekly off म्हणजे थेटशुक्रवारी भेटणार ती मला , तोपर्यँतझोपेचं खोबरंराव !!!... 

         अभय या शुक्रवारी तू जाणार आहेस ना साईट वर ? आमचा बॉस विचारत होता , “हो सर मीच जाणार आहे , का काही प्रॉब्लेम ? “ “अरे प्रॉब्लेम काही नाही , आज तुझ्याबरोबर येणारी व्यक्ती well known actress आहे मराठीतली , तू सवयीप्रमाणे तिला flirt करायला जाऊ नकोस , “ आमचा बॉस हसत म्हणाला . 

मी मनात उसासा टाकून म्हटलं ‘बॉस...आता ऐश्वर्या जरी आली तरी मी flirt करणार नाही , आपल्याकडे आता हार्टचनाही राहिलंते गेलं त्या ‘तलंग’ कडे , “

        तर अशा तऱ्हेने तलंग’ ने आपल्यावर जादू गेली आणि आठवड्यातून सातही दिवस माझ्या फेऱ्या व्हायला लागल्या साईटवर , पण गमंत म्हणजे त्या दिवसानंतर ‘तलंग मला दिसलीच नाही , आता माझं हसणं बोलणं पार बंद झालं , एकच ध्यास लागला ‘तलंग ‘ चा . दोनदा ती ज्या खोपटातून बाहेर पळत आली होती तिथे उगाच पाणी प्यायला जाऊन पण आलो , आणि झोपडीतल्या आंधळ्या म्हातारीशी ढीगभर गप्पा मारून आलो , हळूच ‘तलंग’ चा विषय पण काढला , काय म्हणता डायरेक्ट कसं विचारलं ? नाही हो , समोरच्याला कळू न देता माहिती कशी काढायची हे नाही जमलं तर कसला डोंबलाचा सेल्स मॅनेजर मी , गुंतवून ठेवलं म्हातारीला गप्पांमध्ये , आणि मग हळूच विचारलं , ‘आजी तुम्हाला दिसत नाही , मग एखादी कोंबडी पळून बाहेर रस्त्यावर गेली आणि गाडीखाली आली तर ? “

तेव्हा आजी म्हणाली ,”त्ये आनी कसं हुईल ? नात हाये कि माझी मस चपळ ,धावत जाऊन उचलून आनती . “ 

“मग आत्ता कुठे आहे ती ? “ मी विचारलं 

“रानात गेली हाये, यील कि संध्याकाळ पत्तर . “

“नाव काय तिचं आजी ? “

“तुला कशाला पायजे बाबा तिचं नाव ?” 

“अहो भेटली रानात तर धाडतो तिला घरी “

“कल्याणी …. “ असं म्हणून म्हातारी जमिनीवर दोन्ही हात टेकवून उठली आणि चाचपडत काठी घेऊन पाखरांना हुसकायला अंगणात टाकलेल्या वाळवणाकडे गेली . उसासे टाकत मी घरी आलो , चला नाव तर कळालं , प्रगती आहे ‘अभय सरदार’ तुमची , मी स्वतःची पाठ थोपटत म्हणालो.

    त्या दिवसापासून रोज साईटवर जायला लागलो,वाढणे- जोगदेव रस्ता आलाकि विश्रांती घ्यायला म्हणूनगाडी  

थांबवायची आणि चहा पिता पिता चौकशा करायच्या.पण कल्याणी परत काही दिसली नाही, असंच एकदाएक गावकरी भेटला, त्यालाचहा पाजला ,आणि चौकशा सुरू केल्या,“समोरच्या झोपडीतली आजी एकटीच राहते का हो ? ““नाय बा ,पोरगा हाये कि तिचा ,आन नातं बी हाये तिला .”

“ कुठं असती नातं ? “

“बापाबरीबर जाती नव्ह का रानात ? “

“ कल्याणी ? “

“अंगा अशी , तुम्हाला बरीच माहिती दिसतीया म्हातारीची आनीनातीची , कायराव काय ईचार ? “ गावकऱ्याने डोळे बारीक करून, एक भिवई उडवत मला विचारलं ,आणि मी चक्क लाजलो , हे म्हणजे आक्रितच . 

“नाय हो ,सहज विचारलं , लग्न बिग्नाचा काही विचार नाही का नातीच्या ?”

“हॅहॅहॅ गावकरी हसला , ते आनी कशाला ? अजून आठ तर वर्षांची हाये , मोप टाईम हाय अजून .”

“ऑ SSSSS “ हे काय भलतंच ? आता परत म्हातारीकडे खोपट्यात जाऊन चौकशी करणं आलं , आता ती खटम्हातारी दाद देईल का ? चांगलंच लफडं झालं राव !.. यावेळेस विभ्याला मस्का लावला , नाही नाही म्हणताम्हणता तो दोन बिअर आणि एक नॉनव्हेज वर तयार झाला , विभ्या एक नंबरचा डामचीक आणि खत्रूड आहे . एक ग्रिहाईक पटवता येत नाही त्याला म्हातारी कसली दाददेतीये , आला तोंड वेंगाडून , आता मलाच काहीतरी खटपट केली पाहिजे . गेलो परतसाईटवर ,तिथून येताना बबन ला सांगून एक कोंबडी मागवली आणि जाताना वाढणे-जोगदेव च्या रस्त्यावर थांबलो , कल्याणीच्या घराच्या दिशेने कोंबडी सोडली , आधीच बाबावरलेली आणि घाबरलेली ती कोंडी पाकपाक करत इकडे तिकडे धावायला लागली , मग मी पळत तिच्या मागे गेलो आणि तिला पकडली , म्हातारी खोपटातून बाहेर आलीच होती , तिच्या हातात कोंबडी देऊन म्हणालो , “घ्या आजी तुमची कोंबडी , आली असती आत्ता गाडीखाली “

“चॅक ...माझी न्हाय हि “हाताने चाचपडत ती म्हणाली , आता आली का पंचाईत , मी कुठे घरी घेऊन जाऊ कोंबडीला? मम्मी म्हणेल आता कोंबड्या पाळायच्या का मी ? परत नेऊन साईटवर सोडावी म्हणून मी तिच्या हातातून घ्यायला गेलो तशी म्हातारी कोंबडी सोडायला तयार नाही म्हणते कशी ,”आता आलीच हाय आपणहून तर र्हाऊ दे हिथच , “ 

डॅम्बीस म्हतारी !..

“ आजी तुमची नातं कुठं दिसत नाही , गेली का रानात ? “

“ आत्ताच ग्येली कि सैपाक करत हुती इतका वेळ “

“आठ वर्षाच्या नातीला स्वयंपाक येतो ? “ मी पण डामचीक पणे विचारलं . 

“आठ कुठली मस अठरावर्षाची हाये , सगळी कामं करतीकि ,आता लग्नाला आली नव्ह का ? तू आनि का बाबा चौकशा करतुयास नातीच्या माझ्या ? “

आता मी आनंदलो , बागडलो , म्हातारीच्या पुढ्यात मांडी घालून बसलो , “आजी मला लग्न करायचंय तुमच्या नातीशी .तुमच्या नातीला मी खूप सुखात ठेवीन . मी एक चांगल्या घरातला , कमावता चांगलामुलगा आहे ,“ मी उगाचच केसावरून शक्यतो पुढचं झुलुप न विस्कटता हात फिरवत, सभ्य चेहरा करत म्हणालो . 

म्हातारी विचारात पडली , संध्याकाळी तिचा बा आला कि बोलते म्हटली आणि मी तरंगत च घरी आलो , मम्मीला सगळं सांगायचं असं ठरवून .. पण मम्मी म्हणजे भारीच आहे आपली , तिला आधीच माझ्या बदललेल्या वागण्यावरून संशय आल्यामुळे तिने विभ्या कडे सगळी चौकशी केलीच होती , विभ्यापण चोंबडला होता तिला सगळं , तर ती त्याच्याबरोबर जाऊन तिकडे चौकशी करून आलेली , फक्त मी आपणहोऊन विषय काढायची वाट बघत होती , तिने तर माझी विकेट च उडवली , मला म्हणते , तुला भास झाला , “कल्याणी नावाची मुलगी लहान आहे आठ वर्षांची .” 

मी पैजेवर तिला म्हटलं कि मी आजच म्हातारीशी बोलून आलो , तर मला म्हणते म्हातारीला खूळ लागलंय , असं कसराव म्हातारी खुळीअसली तरी मी खुळा नाहीये ना , या या माझ्या डोळ्यांनी पहिली तिला मी , आणि ती तिच्या खोपटात जाईपर्यँत बघत होतो आम्ही एकमेकांना , आणि मम्मी म्हणतीये कि ती नाही ? 

         आज महिना झाला मी मुक्काम ठोकूनआहे म्हातारीच्या खोपटात , मी आणि म्हातारी सोडून सगळे म्हणतायत कि कल्याणी नाही , ती आठ वर्षांची परकरी पोर इकडून तिकडून नाचते माझ्यासमोर , तिचा बाप , मम्मी , गावकरी , विभ्या ,आमचा बॉस , झालंच तर बबन , आशा ताई , ड्रायव्हर ,सगळे आळीपाळीने येऊन मला समजावून सांगतायत ‘कल्याणी ‘ नाही , तिचा बाप तर मला म्हटला की या पोरीच्या जन्माआधी तिला एक मोठी बहीण होती , तिचं नाव कल्याणी होतं. ती गेल्यावर१० वर्षांनी हि झाली म्हणून हीच नाव तेच ठेवलं , हिच्यावेळेला बाळंत होताना कल्याणीची आई गेली. मग मला दिसली ती कोण होती ? मी वर्णन केल्यावर तिच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं , म्हणतो अशीच दिसायची माझी पोर .

शक्यच नाही, मी देव मानत नाही तसं भूतं खेतं हि मानत नाही, ती मला दिसली, माझ्याकडे बघून हसली आणि याच घरात पळताना मी तिला पाहिलं, ती येईलच कधीना कधी, असा मला ठाम विश्वास वाटतो, पण या बाकीच्या लोकांमुळे राव कधीकधी बॅलन्स जातो एकदम, वाटतं हे म्हणतात तेच खरं असेल तर? मग मी असेल नसेल तेवढं बळ एकवटून तिला हाक मारतो.. तिला हाक मारतो खूप कळवळून विचारतो ‘कल्याणी खरंच तू अस्तित्वात आहेस ना गं ? “


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract