Shivani Vakil

Romance

3  

Shivani Vakil

Romance

किस्मत कनेक्शन

किस्मत कनेक्शन

15 mins
271


स्नेहा एक सुंदर मुलगी. पहाताच आवडणारी, आकर्षक, कॉलेज मधे असल्यापासून मुलांना आवडणारी. हुशार, स्वभावही तसा शांतच. कॉलेज चे शिक्षण संपल्या पासून उदास असे. तशी आता दोन वर्षे होत आली ती शेवटच्या वर्षाला असताना तिची आई, रेखाताई यांच निधन झाले. विश्वासराव, तिचे वडिल यांना हा धक्का सहन झाला नाही ते गप्प गप्प रहात, घरातच असतं. जेमतेम वीस एकवीस वर्षाच्या वयात तीला वडीलांना सांभाळायची जबाबदारी अंगावर पडली.


आई असताना ते खूप आनंदी असतं, रेखाताई अशा अचानक जातील असे त्यांना स्वप्नातही कधी वाटले नाही. हळूहळू ते दोघे सावरले, पण विश्वासराव जास्त बोलेनासे झाले व आता 'साठी' आसपास असल्याने व्ही. आर. एस. घेऊन घरीच असत. खरतर त्यांच्या स्नेहाचे लग्न हा विषयच डोक्यात असे. पण तीचे लग्न झाल्यानंतर आपण एकटे होऊ या विचाराने ते चिंताग्रस्त होत. स्नेहाही आपले लग्न झाल्यानंतर बाबांचे कसे होणार हा विचार करून थकत असे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर ती एका चांगल्या खाजगी कंपनीत नोकरीला लागली. तिथल्या कामांमधे तरी तीचे मन रमत असे. तिच्या हुशारीमुळे तिला पटापट प्रमोशन मिळत गेली. शांत, मितभाषी व सुंदर असल्याने सर्वांशी तीचे जमत असे. प्रमोशन घेत घेत आता ती असिस्टंट मॅनेजर झाली होती. 

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

स्नेहाला जवळची अशी एकच मैत्रिण होती मिनल. शाळेत असल्यापासूनच त्या सोबत असत. ती शिक्षणात ठीकठाक होती. दिसायलाही चांगली होती. आता आई-वडील तीच्या लग्नाचंच बघत होते. तशा गरीब कुटुंबात वाढलेल्या मिनलच्या फार अपेक्षाही नव्हत्या. ती नोकरी करत नसे. तीला घरातील कामे  अतिशय उत्तमरीत्या जमत असत. कॉलेज सोडल्यानंतर त्या दोघी कधीतरी शनिवार रविवारी भेटत असत.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

शरद, स्नेहाच्या आँफीसमधे क्लार्क म्हणून काम करत असे. त्याचं आई वर प्रचंड प्रेम, चार वेळा तरी आईला फोन करुन विचारणार, " जेवली का? औषधं घेतली का? " कधी बाहेर गेली असेल तर "घरी आलीस का? " हे रोजचेच होते. तशी त्याची जाँईंट फॅमिली पण तरी हा आईची काळजी घेत असे. तसे त्याला घरातील सर्वच जण प्रिय होते.


त्याला स्नेहा खूप आवडे. तिचा साधेपणा व सौंदर्य, समजूतदारपणा मन लुभावणारा होता. पण ती कुठे व आपण कुठे, हे जमणे शक्य नाही हे त्यालाही चांगले माहिती होते. आपल्या घरात आई वडीलांचे करणारी साधी व घरात लक्ष देणारीच मुलगीच सुन म्हणून आईला पसंत पडेल हे ही तो जाणून होता. स्नेहा नाही म्हटलेतरी मोकळ्या वातावरणात वाढलेली, दिसायला सुंदर, हुशार आपल्यापेक्षा सगळ्यात ऊजवी, ती आपल्या घरात जुळवून घेऊ शकेल का ? शिवाय एकुलती एक म्हणून वडिलांची जबाबदारी आलीच! या एक ना दोन अनेक विचारांनी तो हैराण होत असे.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

"शरद, मोघे सरांनी हे चेंजेस सांगितले आहेत या लेटर मधे" स्नेहा त्याच्या जागेजवळ येऊन म्हणाली.

"हो देतो नविन करुन" शरद हसून म्हणाला.

तसे "ठीक आहे" म्हणत स्नेहा तिथून निघाली.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

आज सकाळी सकाळी गँस गेल्यामुळे विश्वासरावांची जरा पंचाईत झाली. आधीच उशीर झाला होता. दुध गरम करायला ठेवून स्नेहाला उठवायचे होते. "स्नेहा, ऊठ गं साडे सात वाजलेत " ते म्हणाले.

तशी स्नेहा उठली. विश्वासराव म्हणाले "आज तू कँटीन ला खा काहीतरी सकाळी, मी बघतो गँसचं, देतो आँर्डर"

तसं ती "ठीक आहे " म्हणाली व इलेक्ट्रिक टी पाँट मधे तीने दोघांना चहा केला. व आवरायला गेली.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

साधारण नऊ चाळीसच्या सुमारास ती आँफीस मधे आली, दहा चे आँफीस असे, काही खावे म्हणून ती कॅन्टीन मधे आली. तीथे सुजाता, शरद, महेश आधीपासूनच होते, सुजाताने तीला बोलावले " हाय स्नेहा, तु कशी आज ईथे? "

"काही नाही सहज, आज डबा नाही आणला, उशीर झाला, सो नाष्टा करावा म्हणून आले" स्नेहा हसुन म्ह णाली.

"ओ, ये बस ईथे" - सुजाता

स्नेहा तीथे बसली.

"अरे वा आज मॅडम आल्या! कधीच नसतात ईथे! , चहाला सुद्धा. " शरद म्हणाला.

" हो आज जरा प्राँब्लेम झाला, गँसही नव्हता. " असे म्हणत तिने आँर्डर दिली.

" काही मदत लागली तर सांगत जा मॅडम. आई घरी डबे करते, तुमच्या साठी आणला असता आज" - शरद म्हणाला.

"माझं राहू दे, वडिलांसाठी घेतला असता, पुढे कधी वाटले तर नक्कीच सांगेन. " स्नेहा म्हणाली

"ठीक आहेत ना वडील" सुजाता म्हणाली, ती मार्केटींग डीपार्टमेंट मधे काम करीत असे.

"हो ते ठिक आहेत, पण एकटे असतात म्हणून काळजी वाटते. " स्नेहा म्हणाली.

"काळजी करू नकोस, मिळेल तुलाही पार्टनर असा की घेईल काळजी त्यांची. " सुजाता म्हणाली.

दहा वाजत आले असे म्हणत सगळेच तिथुन खाणे संपवून उठले.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

शरद जागेवर जाऊन बसला खरा पण मनात स्नेहाचे विचार येत होते. साधी सालस सुंदर स्नेहा डोळ्यांसमोरून जातच नव्हती. तीच्याशी ओळख चांगली होती पण ती आणखी वाढवावी कशी? या विचारात तो होता. महेश त्याच्या शेजारी बसत असे, त्याने फक्त त्यालाच स्नेहा विषयी सांगितले होते. तो पण त्याला म्हणाला होता की तीचा विचार सोड. तुझं घर लहान, त्यात आई-वडील, भाऊ-वहिनी, मुले, बहिण सर्वांत लहान घरात ती अँडजस्ट करेल का? आणि ती सुंदर, हुशार, वरच्या पोझिशन वर आपली तर अजुन धड सुरुवात पण नाही. कसं जमणार हे? त्यात तिच्या वडिलांचं हवं नको बघावं लागणार, ती एकुलती एक म्हणजे जावयावर जबाबदारी. बघ बाबा!

शरद ला कळतं सगळं होतं पण वळत नव्हतं. ती समोर दिसली की ओळख वाढवावीशी वाटे. आज त्याने ठरवलं काम वेळेत आटपून घरी जाताना तिच्याशी बोलायचंचं.

शरद ठाण्याला रहात असे व स्नेहा मुलुंड ला त्यामुळे दादर ला ते लोकल ट्रेन ने येत असत.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

जसे सायं. ६.३० वाजले, स्नेहा जागेवरून उठली, काम संपवून साहेबांना सांगुन ती निघाली. तसा शरदही डीपा. हेड ला सांगुन निघाला. आँफीस पासून रेल्वे स्टेशन चालत १५-२० मीनीटे लागत असत. स्नेहा पायर्‍या उतरत असताना शरद ने तीला गाठले व म्हणाला " हँलो स्नेहा मॅडम! " ती हसली म्हणाली "हँलो, तुम्ही? आज लवकर? "

"हो आज जरा लवकरच निघालो" "स्टेशन लाच जाताय ना? " शरद म्हणाला

"हो घरीच " स्नेहा म्हणाली.

"चला मग बरोबरच जाऊ" शरद म्हणाला.

आणि ते दोघे चालू लागले.

"घरी तुम्ही आणि बाबा दोघेच असता का? " शरद

"हो" स्नेहा म्हणाली.

"रागावू नका मॅडम, पण तुम्ही खुप छान दिसता" शरद म्हणाला.

तसे स्नेहाने चमकून त्याच्याकडे पाहिले, व मग " धन्यवाद! " असे म्हणाली.

बऱ्यापैकी एकट्या रहाणार्‍या स्नेहालाही कोणाशी बोलत जाणे बरे वाटत होते.

"तुम्हाला किती वर्ष झाली आँफीस मधे " तिने विचारले.

"चार वर्षे " शरद म्हणाला. 

५ मी. दोघेही शांत होते. 

"पण मी तुमचा एवढा हुशार नाही ना ! म्हणून एकाच जागेवर आहे. " शरद हसून म्हणाला.

"घरची जबाबदारी, सगळ्यांच, नोकरी सांभाळून ग्रँजुएशन कंपलिट केलं." शरद म्हणाला.

"हमम" स्नेहा म्हणाली. 

" आई मेसचे डबे करते, कधी लागला तर सांगा मॅडम मी स्वतः आणून देईन घरी. शिवाय काही मदत लागली तर कधीही सांगा " तो म्हणाला.

स्नेहाने नुसती मान डोलावली.

आणि त्यांनी स्टेशनमधे प्रवेश केला. तसे ते लोकलकडे वळाले. 

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

स्नेहा लोकलमध्ये बसली, तिच्या मनात शरदचे विचार होते. किती साधा आहे शरद, सगळ्यांना मदत करत असतो. काळजी घेतो. स्वतःचा विचार कमी करून दुसऱ्यांचा विचार पहीले असतो, त्यामुळे स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देत नाही.

विचारात ती घरी आली, तर गँस आला होता, बाबांनी कुकरही लावला होता.

"चहा करते आपल्याला " ती म्हणाली.

"हो चालेल! " - बाबा

फ्रेश होऊन चहा झाल्यावर तिने पोळी भाजी केली. व ते जेवायला बसले. जेवताना बाबा म्हणाले." स्नेहा अगदी हिच्यासारखी झालीय भाजी पोळी. " " आता तु आहेस तो पर्यंत ठिक आहे. पण तुझ्या लग्नाचं बघायलाच हवं आता. "

"मी जाईन तिथे तुम्हालाही बरोबर घेऊन जाईन बाबा, ईथे एकटं नाही ठेवणार मी ही माझी अटी आहे बाबा! नाहीतर मी लग्नच करणार नाही " ती म्हणाली.

अशी कुठे अट ठेवतात का बाळ? बाबा म्हणाले.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

दुसर्‍या दिवशी ही आँफीस संपल्यानंतर शरद स्नेहाबरोबरच निघाला. " मॅडम " म्हणून हाक मारली. तशी स्नेहा हसली.

"चला" म्हणाली.

"आजही लवकर" ती म्हणाली

"हो आज वाढदिवस आहे बहिणीचा म्हणून....तीला भेट घ्यायची आहे" शरद म्हणाला

"अरे वा छान" - स्नेहा

"मॅडम ड्रेसच कापड घ्यायचंय. २मी. फक्त दुकानात येऊन सांगता का, कोणतं चांगलय प्लिज या ना! " शरद म्हणाला.

स्नेहाने एक अबोली रंगाचे कापड सिलेक्ट केले त्यालाही ते आवडले. 

ते पँक होईपर्यंत ते थांबले तेव्हा ती म्हणाली "किती छान, तुमच्याकडे किती मोठ कुटूंब आहे एकटे पणा नाहीच अजिबात, नाहीतर आमच्या घरी मी आणि बाबा, मला त्यांची आणि त्याना माझी काळजी सतत.! " ती एकदम बोलून गेली. 

"हो आमच्याकडे घर लहान आणि माणसं खुप असचं आहे, आई वहिनी, दिवसभर कामात असतात. बहिण शिकतेय." तो म्हणाला.

"घरात माणस असली की किती भरल्यासारखं वाटत नाही घर? " स्नेहा म्हणाली.

"हो खरचं" शरद म्हणाला.

"आमच्या कडे मी आणि वडील, त्यातून पुढे कसं होतय काय माहित. आई नसल्यामुळे खचले आहेत वडील त्यांना एकट सोडून फक्त ऑफिसलाच येते मी, बाकी कुठे जास्त जात नाही" स्नेहा म्हणाली.

"काळजी करु नका, मॅडम. होईल सर्व ठीक " शरद

ती आपल्याशी मोकळे पणाने बोलतेय बघून शरद खुष झाला. चालत चालत स्टेशनही जवळ आले, लोकल दिसली, तसे दोघेही आपापल्या डब्याकडे निघाले.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

असेच दिवस जात होते, आठवड्यातून दोन तिन वेळा शरदने स्नेहाबरोबर जाऊन ओळख वाढवली. पण थोड्याफार जुजबी विषयांपुढे संभाषण होत नसे. श्रावण महिना लागला, श्रावणात रविवारी शरद कडे सत्यनारायणाची पूजा होत असे. तसे त्याने स्नेहाला व तिच्या वडिलांना आमंत्रण दिले व आवर्जून तिर्थप्रसादास येण्यास सांगितले. तिनेही होकार दिला.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

शनिवारी तीने बाबांना आमंत्रण असल्याचे सांगितले. व वडीलांना म्हणाली की जाऊ, जरा तुम्हालाही बरे वाटेल. आज जरा ती नेहमीपेक्षा लवकरच घरी आली होती, मीनलला फोन केला. चल ग येतेस का पाणीपुरी खाऊन येऊ. बाबांना सांगून ती बाहेर पडली. दोघी भेटल्या गप्पा मारत बसल्या. मीनल ने आँफीस ची चौकशी केली, कसं चाललं आहे तुझं? स्नेहा ने ही जुजबी सांगीतले. स्नेहाने तिला विचारले की लग्नाचे कुठवर आलेय, अजून बघत आहेत असे म्हणाली. मग थोड्या गप्पा मारत त्या घरी आल्या.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

रविवारी दुपारी साडेचार पाच ला ते आँटोने शरद कडे ठाण्याला निघाले. त्याचे एक बैठे घर होते. दोन-तिन खोल्यांच्या घरात शरद व त्याचे कुटुंबीय राहत होते. मॅडम आल्याचे पाहून शरदला फार आनंद झाला. त्याने त्यांचे स्वागत केले, घरातल्यांशी ओळख करुन दिली, देवदर्शन झाल्यावर वेफर्स, साबुदाण्याची खिचडी, प्रसाद देऊन त्यांना बसवले, त्याचे वडील स्नेहाच्या बाबांशी गप्पा मारू लागले. शरद आले गेल्यांकडेही बघत होता. स्नेहाशी त्याच्या आई वहिनी यांनी थोडी विचारपूस केली. नंतर स्नेहा सगळ्याचं निरिक्षण करु लागली. मोठी जाँईंट फॅमिली त्यात लहान घर आज ना उद्या शरदचा संसार वाढणार, त्यांच्यात सामावणारी मुलगीच हवी शरदसाठी. शरद चे भाचे मंडळी ईकडे तिकडे फिरत होते. शरद त्याना कडेवर घेऊन स्नेहा ची परत विचारपूस करण्यासाठी आला. मॅडम, बघा हे असं आहे आमच्याकडे, घर भरलेलं असतं नेहेमी.

तेवढ्यात एक रुबाबदार युवक तिर्थप्रसाद घेण्यासाठी आला.

"अरे या या निखिलसर या!! " शरदने स्वागत केले व त्याला बसवले, तो स्नेहाच्या समोरच बसला.

तसे दोघांचे लक्ष एकमेकांकडे गेले, दोघेही ओळख नसताना हसले. 

तो युवक खुप देखणा होता व बराच शिकलेलाही असावा असा विचार स्नेहाने केला.

"हे निखिलसर, आपले डाँक्टरसाहेब हं मॅडम!, खुप गुण आहे यांच्या हाताला, देवच आहेत अगदी. आई आजारी होती तेव्हा यांनीच वाचवल तिला. आता एकदम ठणठणीत झालीय.

तसे स्नेहा व निखिल परत हसले.

"आणि या कोण? " निखिल म्हणाला

"या आमच्या मॅडम " असे म्हणून शरद हसला.

"अरे वा...म्हणजे..! " निखिल

"अरे नाही, या आमच्या आँफीस मधल्या सिनीयर मँडम ! हुशार, कर्तबगार! "शरद म्हणाला

नंतर शरद सरबत आणतोच, म्हणून आत गेला तसे निखिल व स्नेहा एकमेकांनकडे बघून मधूनमधून स्मित हास्य करत होते.

शरद सरबत घेऊन आला तेव्हा ते एकमेकांकडे बघून हसत असल्याचे त्याच्या नजरेतून सुटले नाही.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

ऑटोमधून घरी येताना स्नेहाच्या मनात निखिलचेच विचार होते. उद्या शरदकडे त्याची आणखी चौकशी करावी का ?असा विचार तिच्या मनात आला.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

दुसर्‍या दिवशी ऑफिस संपल्यानंतर तीने शरदला विचारले. "निघायचं का? " तस शरदही आनंदाने निघाला. बरोबर जाताना स्नेहाने विचारले की "काय आवरले का घरातले सर्व? छान झाला कालचा कार्यक्रम! "

" हो हो, उशीर झाला रात्री। पुष्कळ लोक येत होते" शरद म्हणाला.

"ते तुमच्या कडे आले होते ते कसले डाँक्टर आहेत ?"

"ते होय, ते एम.बी.बी.एस आहेत. ठाण्यालाच क्लिनीक आहे, मागे आईला बर नव्हतं तेव्हा शेजारच्यांनी सांगितले ते चांगले आहेत म्हणून त्यांच्याकडे नेलं तेव्हा काही टेस्ट सांगितल्या पण दोन दिवसात बरी झाली आई. खुप गुण आहे त्यांचा. ईथे मुंबईत एकटेच आहेत. फी पण खुप नसते. त्यांचं ईथे कोणीच नाही म्हणून मीच त्यांना डबा पोचवतो, दोन वर्षेच झाली आहेत प्रॅक्टीस करत आहेत.  

अजुन लग्नही झाले नाही. माणूसकी म्हणालं तर लाख आहे. "

स्नेहा निखिल ची चौकशी करतेय हे त्याच्या लक्षात आले. 

पण स्टेशन जवळ आले म्हणून त्यांनी निरोप घेतला व लोकल पाशी गेले.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

त्यानंतर दोन-तिन दिवसांनी शरद डबा द्यायला पावणे नऊ ला निखिल कडे आला. 

"डाँक्टरसाहेब साहेब डबा ठेवतो! ", शरद म्हणाला

"अरे थांब दोन मीनीट आलोच" निखिल म्हणाला

तसा शरद थांबला, निखिलचा स्वत:चा एक टुमदार थ्री. बी एच के चा फ्लॅट होता. तसेच त्याचे क्लिनीक सध्या भाड्याने होते पण लवकरच तो स्वतःचे घ्यायच्या विचारात होता. दिसायला आकर्षक निखिलचे सगळे स्वकष्टार्जित होते तसेच तो एकटाच होता. त्याला एक बहीण होती ती ही लग्न होऊन डोंबिवलीला रहात असे तीचे कुटुंबीय हेच त्याचे नातलग. चार वर्षांपूर्वी वडील व दोन वर्षांपूर्वी आई निवर्तले होते तेव्हापासुन बहीण तीचे मिस्टर, मुले व असे शरद सारखे जीवलग, त्याचा आधार होते. तो ही होतकरु होता. पैसा काळजीपूर्वक वापरत असे. परीस्थितीने त्यालाही बरेच शिकवले होते. शिस्तप्रिय तर तो होताच, शिवाय कोणतेही व्यसन नव्हते.

"अरे अंघोळीला गेलो होतो, बस ना ऊभा का ?, काकूंना सांग कालची भेंडी भाजी एकदम मस्त झाली होती. " निखिल म्हणाला.

"साहेब सांगत जा, कोणती भाजी पाहिजे आई बनवत जाईल, हक्काने सांगायचं !! " शरद म्हणाला

"हो अरे बरं, पण मला एक सांग त्या परवा दिवशी आलेल्या मॅडम कुठे ठाण्यात रहातात का? " नाही आधी कधी पाहिल्यासारखे वाटले नाही त्यांना. " निखिल

"त्या मुलुंड ला रहातात त्या पुजेसाठी आल्या होत्या वडिलांबरोबर " शरद हसून म्हणाला.

"अच्छा ठीक आहे, मला त्या खुप चांगल्या वाटल्या"- निखिल म्हणाला.

"आहेतच त्या शांत, मनमिळाऊ, हुशार, वडील व त्या दोघेच आहेत. म्हणून अजून लग्नाच बघत नाहीत त्या. लग्नानंतर वडिलांना सांभाळणाराच जीवनसाथी हवा अशी अट आहे त्यांची. " शरद म्हणाला

"चला साहेब निघू का आँफीसला जायचय दोन डबे पोचवून, गाडी मिळाली पाहीजे "असे म्हणत शरद निघाला.

निखिल विचार करु लागला, मुलगी चांगलीच आहे घरंदाजही आहे. आणि तीची अट काय आपल्यासाठी फार नाही. माझ्या कडे आडकाठी घ्यायलाही कोणी नाही, मी एक डॉक्टर आहे, आजारी पेशंट म्हणून डॉ ने सेवा केलीच पाहिजे. घरही मोठय माझं पण माणसंच नाहीत घरात. राहीले ते तरी माझी काही हरकत नाही पण ही मुलगी मला आवडली आहे.

ताई ला सांगून बघावे का बोलायला ? असा विचार त्याने केला. बघूया कसे जमतेय तसे.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

शरदने जवळपास पळतच लोकल पकडली नेहेमीप्रमाणे बसायला जागा नव्हतीच दुसर्‍या दारात जाऊन ऊभा राहीला तसे स्नेहा व निखिल यांचे विचार येऊ लागले, किती अनुरुप आहेत ते दोघे, एकमेकांना सांभाळून घेतील, थोडेफार सारख्याच वातावरणात वाढलेले. हुशार, कर्तबगार. आपल्या हुशारीने, संस्कारने, व्यक्तिमत्वाने समोरच्याला भुरळ पाडतात दोघेही. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दोघेही एकमेकांना आवडत आहेत असे वाटते. एकमेकांच्या चौकशा करत असतात. 

दादर स्टेशन आले तशी त्याची विचारांची तंद्री तुटली.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

त्यानंतर दोन दिवस असेच गेले. तिसर्‍या दिवशी स्नेहा बरोबरच तोही निघाला. 

"बाबांना या शनिवारी डाँ. निखिल कडे चेक अप करुन घेईन म्हणते. " स्नेहा म्हणाली.

"हो हो नक्कीच " असे म्हणत शरद ने त्यांच्या क्लिनीकचा पत्ता , फोननं दिला. "जेव्हा याल तेव्हा मलाही सांगा मी ही तीथे येईन" असे तिला म्हणाला.

त्यानंतर दोघे स्टेशन येईपर्यंत शांतपणे चालू लागले.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

घरी आल्यानंतर तिने अपाँईंटमेंट साठी निखिल च्या नंबर वर फोन केला, तिला शनिवारी संध्याकाळी त्याने अपाँईंटमेंट दिली.

निखिल तिला परत भेटता येणार म्हणून खूप खुश झाला.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

डाँ. निखिल ने विश्वासरावांना तपासले, त्याने काही औषधांचा कोर्स दिला व टाँनीक लिहून दिली व जास्त विचार करुन टेंशन घेऊ नका असे सांगितले. व त्या चौघांसाठी चहाही मागवला. शरदही तीथे होताच.

त्यांना सोडायला ते सर्व बाहेर आले, पण ईतर रुग्ण असल्यामुळे निखिलला जास्त वेळ बोलता आले नाही.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

घरी आल्यावर बाबा जरा खुश वाटत होते, म्हणाले चांगले वाटले मला हे डाँ. त्यांचा गुण चांगला आहे तेच ना!, व्यक्तिमत्व ही फार छान आहे. स्नेहा ला तर निखिल पहील्या भेटीतच आवडला होता. 

तिने निखिल ला 'थँक्स' चा मेसेज केला. लगेच त्याने

'वेलकम' चा मेसेज केला. असे हळूहळू त्यांचे फोनवर संभाषण वाढू लागले. ओळखही वाढली.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

कधीकधी शरद स्नेहा बरोबर जाताना स्नेहा त्याच्या बरोबर निखिलचा विषय काढत असे त्यांच्यात होणारी जवळीक बघून आपण आता विषय कसा काढावा हेच त्याला समजत नसे.

शरदला आपण आवडतो व त्याला आपल्याशी असे काही बोलायचे आहे याची स्नेहालाही अजिबात कल्पना नव्हती.

आपण बरेच आधीच बोलायला हवे होते, असे शरदला वाटू लागले, पण आपण तिला घरी बोलावल्याने गोष्टी अशा काँप्लिकेटेड होतील असा त्याने विचारही कधी केला नाही.

खरेतर निखिलच तिला योग्य आहे हेच त्याचे मनही त्याला सांगत होते.

चालता चालता स्नेहाला अचानक मीनलचा फोन आला "कुठे आहेस म्हणाली?"

"मी रस्त्यातच आहे" - स्नेहा म्हणाली

"अग मी खरेदीला आलीय दादरला म्हटलं बरोबर जाऊ घरी." मीनल म्हणाली.

"अग मग कुठे आहेस तू?" आम्ही स्टेशनपासून १०मी वर आहोत सुविधा मार्केट च्या ईथे, ये आम्ही थांबतो.

तसे फोन कट करुन ती थांबली व म्हणाली माझी खास मैत्रिण ईथे आलीय म्हणत स्नेहा खुश झाली होती. स्वभावानेही खुप छान आणि दिसायलाही, तिचेही लग्नाचे बघताहेत पण अजून ठरले नाही. तिला असे मिळून मिसळून रहायला फार आवडते, पण मला ते जमत नाही.

तेवढ्यात मीनल लांबून हात करत येत होती, आल्यावर दोघी भेटल्या.

"अरे वा बरीच खरेदी काय विशेष? " स्नेहल म्हणाली.

"नाही गं ताई ला भेटायला आले तर केली थोडी" मीनल म्हणाली

तेवढ्यात शरद कडे तिने बघीतले, "हे शरद, माझ्या आँफीस मधे काम करतात."

"नमस्कार " असे ती हसून म्हणाली. 

शरदनेही तीला नमस्कार केला.

ती साधी असली तरी त्याला तिला भेटून आनंद झाला, तिच्या कडच्या पिशव्या बघून त्याने एखादी द्या मी धरतो, असे म्हणाला.

स्नेहा म्हणाली चला "ईथे कोल्ड कॉफी घेऊया छान मिळते. " तसे ते 'कँड बी' मधे गेले.

शरद बराच गप्पा मारत होता, मिनलही हसून त्याला प्रतिसाद देत होती. 

कॉफी संपवून गप्पा मारत ते स्टेशन वर पोहचले, व शरदचा निरोप घेऊन त्या लेडीज डब्याकडे गेल्या.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

गाडीत बसल्यावर मीनल म्हणाली "कोण आहेत ग ते किती गप्पा मारतात मस्त"आणि तुझ्या बरोबर कसे?"

स्नेहा म्हणाली "अगं शरद म्हणून आहेत, खुप मदतीला धावून जाणारा स्वभाव आहे, आणि मोठ कुटूंब आहे त्यांचं, स्टेशन पर्यंत येतो आम्ही बरोबर कधी कधी, पण काय गं, तु का एवढी विचारतेस?

आवडले की काय तुला? "

तशी मीनल हसली " आवडण्यासारखे आहेत ते "

गरीब कुटुंबातल्या मीनल ला शरद आवडणे स्वाभाविक होते. तसा बोलघेवडा, कामसू शरद सर्व साधारण मुलींना आवडण्यासारखा होता.

त्याच्याविषयी गप्पा मारत मारत दोघी घरी आल्या.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

दुसर्‍या दिवशी निखिलने स्नेहाला फोन केला व ऊद्या दुपारी लंच ला भेटूया का विचारले.

स्नेहा ही 'हो' म्हणाली

"ठीक आहे, मी येतो दादरला काम संपले की, मग जाऊ" निखिल म्हणाला.

स्नेहा खुष झाली.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

दुपारी जेवणाच्या सुट्टीत तीला शरद दिसला, तिने त्याची गंमत करायचे ठरवले. 

"काय माझ्या मैत्रिणीवर काय जादू केलीत तुम्ही? "

"नाही म्हणजे अगदी घरी जाई पर्यंत तुमचा विषय ती सोडतच नव्हती. तिला आवडलात तुम्ही असेच म्हणत होती " स्नेहा हसून म्हणाली.

"काहितरीच काय तुमचं मॅडम? "शरद लाजला

चला मी कोणाला तरी आवडलो हा विचार त्यांच्या मनात आला आणि खूष झाला.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

शरदने महेशला लंचला आज बाहेर जाऊ असे सांगितले, तसे दुपारी ते निघाले. त्याने महेशला सांगितले की स्नेहा व निखिल एकमेकांना आता खुप चांगलेच आवडू लागलेत आणि अनुरुपही आहेत.

आणि मग लाजत लाजत त्याने मीनल विषयी सविस्तर सांगितले.

महेशने सर्व ऐकुन त्याला सांगितले की पळ पटकन, त्या मीनलचं लग्न ठरायच्या आत तिला मागणी घाल.  आता ईथे तरी उशीर करू नकोस बाबा. " आणि चांगले आहे एकदम मॅचिंग मिळाली आहे तुला तीच"

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

ईकडे स्नेहालाही निखीलचा पाऊण वाचता फोन आला तशी तीने अर्धा दिवस सुट्टी घेतली, व शरदला जस्ट सांगून जावे म्हणून ती तीथे गेली पण तो नव्हता. मग ती खाली उतरली तर निखिलने त्याच्या कार चे डोअर तिच्या साठी उघडले, तशी ती हसली व कारमधे बसली. एका पाँश रेस्टॉरंट मध्ये ते दोघे गेले. तिथे तिला विचारुन काही मेन्यू ची आँर्डर दिल्यावर निखिल ने तिचा हात हातात घेतला व म्हणाला " स्नेहा, मला तू बघीतल्यावरच खुप आवडलीस, मला लग्न करायचे आहे तुझ्याशी! "

स्नेहा लाजली, निखिल प्रत्येक बाबतीत तीच्यापेक्षा उजवा होता दिसायला, शिक्षणात, संस्कारांनी,

"मलाही तुम्ही खुप आवडलात. पण तुम्हाला माहिती आहे की माझे बाबा एकटे.... "

"हो, माझी काहीच अडचण नाही, आपल्या घरी ते रहातील. मी ताई ला सांगतो पुढचं सर्व ठरवायला. व तुला हवी ती सर्व मोकळीक आहे, तुला हवे तर तू नोकरी करू शकतेस, नसेल तर नाही केलीस तरी काही हरकत नाही."

लंच नंतर दोघेही पिक्चरला गेले, व प्रेमाच्या गप्पांमधे मश्गुल होऊन गेले. संध्याकाळी साडेसातला निखिलने तिला घरी सोडले.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

स्नेहा अतिशय आनंदाने जीने चढत होती, घरी आल्यावर बाबांनी दार उघडले तसे पर्स खाली ठेवून बाबांच्या गळ्यात पडली तसे विश्वासराव गोंधळले.

"काय झाले बेटा. " ते म्हणाले

"बाबा डाँक्टर निखिलने लग्नाची मागणी घातलीए व त्यांना माझी अट पण मंजूर आहे. तुम्ही माझ्याबरोबरच रहाणार बाबा. मी खुप खुष झालेय. "

ती सांगत असताना विश्वासरावांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. किती दिवसांनी ते दोघेही खुष झाले होते. 

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

कधी एकदा हे सर्व शरदला सांगतेय असे झालेय मला. दुसर्‍या दिवशीही तीने लवकरच येऊन शरदला पेढा देऊन कॅन्टीन मधे ही बातमी दिली व म्हणाली "तुमच्यामुळेच मला डॉक्टरसाहेब भेटले व आज माझ्या आयुष्यात आनंदही तुमच्यामुळेच आहे. मी एकटी असताना तुम्ही माझ्या सोबत असायचा. तसे मला मदतीला तुम्ही नेहेमी तत्पर असायचात त्यामुळेच आज हा दिवस दिसला. "तिचे हे बोलणे ऐकून शरदच्या डोळ्यात दोन अश्रु आले.

स्नेहा म्हणाली "हे काय?" "आनंदाश्रू आहेत हे मॅडम" तो म्हणाला. तुम्ही खुश आहात ना मग मी पण खुप खुश आहे आणि एक मॅडम, "तुमच्या त्या मीनल मॅडम आहेत ना त्यांना सांगाल का? "

"काय? " स्नेहा म्हणाली

"की मलाही त्या खुप आवडल्या" स्नेहाने आश्चर्यचकीत होऊन त्याला आणखी एक पेढा भरवला.

दोन्ही गुड न्यूज मीनलला कधी एकदा सांगतोय असे स्नेहाला झाले.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance