STORYMIRROR

Goraksha Karanjkar

Inspirational

3  

Goraksha Karanjkar

Inspirational

खैरे गुरूजी

खैरे गुरूजी

2 mins
215

नमस्कार गुरुजी...

 तुमचे "इयत्ता सातवी " या व्हाट्सअप ग्रुप मध्ये स्वागत आहे, खरं तर हा ग्रुप तयार करण्याचे कारण म्हणजे तुमचा सहवास. आता तुमचा सहवास प्रत्यक्षात लाभणे म्हणजे अवघडच. परंतु या ग्रुपच्या माध्यमातून तरी तुमचा सहवास आम्हा सर्वांना मिळावा हा प्रयत्न.

  गावांमध्ये आणि शेजारी रहायला असलो तरी आम्ही सर्वजण एकत्र भेटतो असे कोणाचेच आणि कधीही झालेले नाही म्हणून सगळ्यांबरोबर एकत्र ग्रुपच्या माध्यमातून का होईना जोडलं जावं हा आम्हा सर्वांचा प्रयत्न आहे.

  सातवी संपली आम्ही आठवीला दुसरीकडे गेलो तिथे गुरुजी म्हणणे बंद झाले तिथे सर आणि बाई असे म्हणायला लागलो तेव्हा मात्र आम्हाला खूप भारी वाटले मनात आम्हाला आनंद झाला की शिक्षकांना सर म्हणण्यात आम्ही पुढारलो असे वाटायला लागले. आता तर आमची मुले शिक्षकांना टीचर म्हणायला लागले आहेत. पण खरं सांगू जसा आईला मम्मी म्हणण्यापेक्षा आई म्हणणं जेवढा जिव्हाळा, आपुलकी, जवळीकता निर्माण होते तसेच शिक्षकांना गुरुजी म्हटल्याशिवाय आपले पण आणि आनंद मिळत नाही. म्हणून तर पूर्वीपासून गुरु शिष्याचे नाते अबाधित आहे. पूर्वी शिक्षकांना गुरुजी का म्हणायचे हे आता समजते. हे नातेच वेगळे असते.

  ज्याप्रमाणे आपण सगळे शिवाजी महाराज म्हणण्याऐवजी आपण नेहमी *छत्रपती शिवाजी महाराज* असा उल्लेख करतो, तसेच आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आपणास फक्त गुरुजी असे म्हणताच येत नाही. आमच्या तोंडात आपोआप *खैरे गुरुजी* असेच म्हटले जाते.

 आज आम्ही सर्वजण जो तो आपापल्या कामांमध्ये प्रथम स्थानी काम करत आहे. आपल्या वर्गातील सर्वच्या सर्व मुले गणितात आजही हुशार आहेत. याचे कारण फक्त गुरुजी तुम्हाला जाते. आजही येवढ्या 30-32 वर्षां नंतर तुम्हां व तुमच्या सारखी वडीलधारी माणसां बरोबर बोलण्याची सभ्यता जो आदर आपोआप येतो.तो म्हणजे तुमचीच शिकवण आहे. खरं तर आमच्यापैकी खूप जणांच्या वडिलांना सुद्धा तुम्ही शिकवले होते. हे ही आम्ही विसरलेलो नाही आहोत. आणि आम्हांला त्याचा अभिमान आहे. मी तर ही गोष्ट अभिमानाने माझ्या मुलांना सांगतो.

  तुमचे या ग्रुपमध्ये परत एकदा स्वागत करून आम्हा सर्वांच्या वतीने तुम्ही या ग्रुपमध्ये राहून आम्हाला पाठबळ आणि आशीर्वाद द्यावेत ही विनंती करतो. 

तुमचाच आज्ञाधारक..



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational